राहुल द्रविडला क्रेडिट मिळतं कारण त्याला त्याची भूक नाही, इरफान पठाणचा निशाणा कुणावर?
या विजयाचे हिरो ठरलेले वॉशिंग्टन सुदर, शार्दुल ठाकूर, ऋषभ पंत, नवदीप सैनी, मोहम्मद सिराज हे टॉपचे खेळाडू माजी कर्णधार राहुल द्रविडच्या मार्गदर्शनाखाली खेळले.
नवी दिल्ली : भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाला त्यांच्याच मैदानात 2-1 ने परभूत करून बॉर्डर गावस्कर ट्रॉफी आपल्या नावे केली. या विजयाचे हिरो ठरलेले वॉशिंग्टन सुदर, शार्दुल ठाकूर, ऋषभ पंत, नवदीप सैनी, मोहम्मद सिराज हे टॉपचे खेळाडू माजी कर्णधार राहुल द्रविडच्या मार्गदर्शनाखाली खेळले. (irfan pathan says aus vs ind rahul dravid gets credit because he does not crave)
यामुळे ऑस्ट्रेलियामधील या यशामुळे द्रविडला याचं श्रेय दिलं जात होतं. राहुल द्रविडने मात्र त्याचे श्रेय घेण्यास नकार दिला आहे. तो एका मुलाखतीत त्यान दिलेल्या माहितीनुसार, तो म्हणाला की, ‘मला विनाकारण क्रेडिट मिळत आहे. या यशासाठी खेळाडूंचं कौतुक केलं पाहिजे. त्यांच्या मेहनतीचा परिणाम.’ यामध्ये सगळ्यात विशएष म्हणजे या विजयानंतर राहुल द्रविड अनेक दिवस सोशल मीडियावर ट्रेंड करत होता. लोक राहुल द्रविडला विजयाचा खरा नायक म्हणत होते.
Rahul Dravid gets credit cos he doesn’t crave it…
— Irfan Pathan (@IrfanPathan) January 24, 2021
यासंबंधी आता भारतीय वेगवान गोलंदाज इरफान पठाणनेही यावर एक ट्विट केलं आहे. यामध्ये त्याने लिहलं की, ‘सगळ्या यशाचं श्रेय राहुल द्रविडला जात आहे. पण त्याला त्याची भूक नाही’ असं ट्वीट इरफान पठाण यांनी केलं आहे. यातून त्यांना नेमकं काय सुचवायचं आहे. याबद्दल अद्याप समजून शकलेलं नाही. दरम्यान, द वॉल म्हणून ओळखल्या जाणारे द्रविड ज्यूनिअर संघाचे कोच होते. त्यांच्या मार्गदर्शनाखाली पृथ्वी शॉच्या नेतृत्वात भारताने 19 वर्षांखालीलचे विजेतेपद जिंकले आहेत. (irfan pathan says aus vs ind rahul dravid gets credit because he does not crave)
संबंधित बातम्या –
Ajinkya Rahane | विराट आणि अजिंक्यमध्ये कॅप्टन्सीसाठी टक्कर? काय म्हणतो अजिंक्य !
Shikhar Dhawan | पक्ष्यांना दाणे टाकल्याने शिखर धवन अडचणीत, ‘बर्ड फ्लू’मुळे कारवाईची टांगती तलवार
(irfan pathan says aus vs ind rahul dravid gets credit because he does not crave)