गुजरातला जाणारे पाणी अडवणार; जयंत पाटील नाशिक दौऱ्यावर

राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील नाशिक दौऱ्यावर आले आहेत. नाशिकमधील ग्रामीण भागातील पाणी योजनांची पाहणी करण्यासाठी ते आले आहेत. (Irrigation Minister Jayant Patil on nashik tour)

गुजरातला जाणारे पाणी अडवणार; जयंत पाटील नाशिक दौऱ्यावर
Follow us
| Updated on: Nov 17, 2020 | 4:01 PM

नाशिक: राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील नाशिक दौऱ्यावर आले आहेत. नाशिकमधील ग्रामीण भागातील पाणी योजनांची पाहणी करण्यासाठी ते आले आहेत. शिवाय गुजरातला वाहून जाणारे पावसाचे पाणी अडवण्यासाठी करण्यात येणाऱ्या उपाय योजनांचा आढावाही जयंत पाटील घेणार आहेत. (Irrigation Minister Jayant Patil on nashik tour)

नाशिकमध्ये मोठ्या प्रमाणावर पाऊस पडत असल्याने पावसाचे हे पाणी गुजरातला वाहून जाते. हे पाणी गिरणा आणि गोदावरी खोऱ्यात वळविण्यासाठी राज्य सरकारने हालचाली सुरू केल्या असून त्याचाच आढावा जयंत पाटील आजच्या नाशिक दौऱ्यात घेत आहेत. त्यांनी आज त्रिभूवन या आदिवासी बहुल भागाची पाहणी केली. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधून त्यांचे प्रश्न समजून घेतले. तसेच त्यांना येणाऱ्या अडचणी तात्काळ सोडवण्याचे आदेश त्यांनी संबंधितांना दिले. यावेळी आमदार नितीन पवार, जे. पी. गावित यांच्यासह जलसंपदा विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

प्रस्तावित त्रिभूवन धरणासाठीची जागा संपादित करण्यात आली आहे, असं सांगतानाच स्थानिकांच्या पाण्याचा प्रश्न आधी सोडवणार, त्यानंतरच इतरत्र पाणी वळवणार असल्याचं त्यांनी सांगितलं. राज्यात हळूहळू सर्व उद्योग व्यवसाय सुरू होत आहेत. त्यामुळे राज्याची तिजोरीही लवकरच भरेल, असं सांगतानाच स्थानिकांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी योजना आखण्यात येणार असल्याचंही त्यांनी सांगितलं.

पाणी आडवा, वळवा आणि शेतीला द्या

दरम्यान, विधानसभेचे उपसभापती नरहरी झिरवळ यांनी पाटील यांच्याकडे काही मागण्या केल्या आहेत. येथील शेतामध्ये नागलीचं सर्वाधिक उत्पादन घेतलं जातं. या भागात सर्वाधिक पाऊस पडतो पण तरीही शेतीला पुरेसं पाणी मिळत नाही. या भागात नॅचरल फिल्टर असलेलं पाणी आहे. त्यामुळे पाणी आडवा, वळवा आणि शेतीला द्या, अशी मागणी झिरवळ यांनी केली आहे.

संबंधित बातम्या:

शिवाजी पार्कवर शपथ घेऊन एक वर्ष पूर्ण, पुढची चार वर्षं कशी जातील ते भाजपला कळणार नाही : जयंत पाटील

मंदिरं उघडण्याची ‘हीच ती वेळ’, सरकार पुढील चार वर्ष दिवाळी साजरी करणार : जयंत पाटील

(Irrigation Minister Jayant Patil on nashik tour)

महाराष्ट्राची चिंता वाढली;7 वर्षीय मुलासह 13 वर्षीय मुलीला HMPVची लागण
महाराष्ट्राची चिंता वाढली;7 वर्षीय मुलासह 13 वर्षीय मुलीला HMPVची लागण.
मुडेंनी राजीनामा दिला? राजीनाम्याच्या प्रश्नावर म्हणाले, 'योग्य वेळी'
मुडेंनी राजीनामा दिला? राजीनाम्याच्या प्रश्नावर म्हणाले, 'योग्य वेळी'.
HMPV Virus : तुम्हाला 'ही' लक्षणं दिसताच सावध व्हा अन् अशी घ्या काळजी
HMPV Virus : तुम्हाला 'ही' लक्षणं दिसताच सावध व्हा अन् अशी घ्या काळजी.
मुंडेंच्या भेटीनंतर दादा-फडणवीसांमध्ये बैठक, राजीनाम्याचा दबाव वाढला
मुंडेंच्या भेटीनंतर दादा-फडणवीसांमध्ये बैठक, राजीनाम्याचा दबाव वाढला.
आता माझ्या भावना मेल्यात, नाराज असलेले छगन भुजबळ नेमकं काय म्हणाले?
आता माझ्या भावना मेल्यात, नाराज असलेले छगन भुजबळ नेमकं काय म्हणाले?.
आधी पैसे देणाऱ्यांवरच कारवाई करा, बच्चू कडूंचा सरकारला घरचा आहेर
आधी पैसे देणाऱ्यांवरच कारवाई करा, बच्चू कडूंचा सरकारला घरचा आहेर.
राजीनाम्यावरुन दबाव? मुंडे दादांच्या भेटीला, चर्चेत नेमकं काय ठरलं?
राजीनाम्यावरुन दबाव? मुंडे दादांच्या भेटीला, चर्चेत नेमकं काय ठरलं?.
मुंडे यांनीच 3 कोटींची खंडणी मागितली, सुरेश धसांचा खळबळजनक आरोप अन्...
मुंडे यांनीच 3 कोटींची खंडणी मागितली, सुरेश धसांचा खळबळजनक आरोप अन्....
मुंडेंना अजितदादा पाठिशी घालताय? बीड प्रकरणासंदर्भात धसांचा मोठा दावा
मुंडेंना अजितदादा पाठिशी घालताय? बीड प्रकरणासंदर्भात धसांचा मोठा दावा.
राजीनाम्याची मागणी सुरू असताना धनंजय मुंडे तडकाफडकी दादांच्या भेटीला
राजीनाम्याची मागणी सुरू असताना धनंजय मुंडे तडकाफडकी दादांच्या भेटीला.