कोरोना विषाणूवर लस तयार, इस्त्रायलच्या संरक्षण मंत्र्यांचा दावा
जगभरात थैमान घालणाऱ्या कोरोना विषाणूंचा सर्वनाश करणारी लस (Covid 19 virus vaccine) निर्माण केल्याचा दावा इस्त्रायलचे संरक्षण मंत्री नाफताली बेन्नेट यांनी केला आहे.
जेरुसलम : जगभरात थैमान घालणाऱ्या कोरोना विषाणूंचा सर्वनाश करणारी लस (Covid 19 virus vaccine) निर्माण केल्याचा दावा इस्त्रायलचे संरक्षण मंत्री नाफताली बेन्नेट यांनी केला आहे. इस्त्रायल इन्स्टिट्यूट ऑफ बायोलॉजिकल रिसर्च (IIBR) टीमने कोरोना व्हायरसच्या अँटिबॉडीज तयार केले आहेत, असं बेन्नेट यांनी सांगितलं आहे. इस्त्रायलच्या IIBR या संस्थेने कोरोनाचा नाश करणारी लस विकसित केली आहे. या लसीच्या विकासाची स्टेज पूर्ण झाली असल्याचा दावा बेन्नेट यांनी केला आहे (Covid 19 virus vaccine).
IIBR ही इस्त्रायलची गुप्त संस्था आहे. या संस्थेत होणाऱ्या प्रयोगांची माहिती कुणालाही दिली जात नाही. या संस्थेची प्रयोगशाळा इस्त्रायलच्या नेस जियोना या भागात आहे. इस्त्रायलचे संरक्षण मंत्री नाफताली बेन्नेट यांनी या प्रयोगशाळेला नुकतीच भेट दिली. त्यानंतर कोरोनावर लस विकसित झाल्याची माहिती त्यांनी जगाला दिली. याबाबतचे वृत्त ‘टाम्स ऑफ इस्त्रायल’सह अनेक वृत्तसंस्थानी प्रकाशित केले आहे.
Israel’s Defense Minister Naftali Bennett on Monday said Israel’s defense biological research institute had developed an antibody to COVID-19 and that they had moved to patent and mass-produce the Coronavirus vaccine approaching international companies. pic.twitter.com/VXZovyxFxn
— Ariana News (@ArianaNews_) May 5, 2020
“IIBR या संस्थेने तयार केलेली अँटीबॉडी मोनोक्लोनल पद्धतीने कोरोना व्हायरसवर हल्ला करते. ही लस रुग्णाच्या शरीरातील सर्व कोरोना विषाणूंचा सर्वनाश करते. त्यामुळे विषाणू शरीराच्या इतर भागात पसरत नाही”, अशी माहिती बेन्नेट यांनी दिली.
Defense minister claims Israel’s biological institute developed virus vaccine Naftali Bennett hails ‘amazing achievement; his office says shadowy defense research facility moving to patent antibody, approaching international companies to mass produce it https://t.co/YI5TS3plUS
— Eye On Antisemitism (@AntisemitismEye) May 5, 2020
“आम्ही आंतरराष्ट्रीय पातळीवर या लसीच्या उत्पादनाबाबत जगभरातील विविध कंपन्यांसोबत चर्चा करणार आहोत. मला इस्त्रायल इन्स्टिट्यूट ऑफ बायोलॉजिकल रिसर्चच्या संपूर्ण टीमचा अभिमान वाटतो”, असं नाफताली बेन्नेट म्हणाले. दरम्यान, या लसीचं क्लिनिक ट्रायल किंवा ह्यूमन ट्रायल झालं आहे का? याबाबत बेन्नेटे यांनी कोणतीही माहिती दिलेली नाही.
IIBR ही संस्था इस्त्रायलच्या संरक्षण मंत्रालयाच्या अखत्यारित येते. लसीला परवानगी देण्याबाबतच्या कायदेशीर प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. कायदेशीर प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर या लसीचं मोठ्या प्रमाणात उत्पादन केलं जाणार आहे. इस्त्रायलच्या संरक्षण मंत्र्यांचा हा दावा खरा ठरला तर या लसीचा जगभराला फायदा होऊ शकतो.
जगभरता 36 लाखांपेक्षा जास्त लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. यापैकी 2 लाख 52 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. जगभरातील 100 पेक्षा जास्त वैज्ञानिक संस्था कोरोनावर लस तयार करण्याचा प्रयत्न करत आहेत. भारतातही लस तयार करण्याचा प्रयत्न सुरु आहे.
संबंधित बातम्या :
दारुला परवानगी, मॉर्निंग वॉकला का नाही? पुण्याच्या रहिवाशाचं आयुक्तांना पत्र
Malegaon Corona Update | मालेगावला कोरोनाचा विळखा, पाच दिवसात 152 रुग्णांची वाढ