उत्तर महाराष्ट्रातील 81 हॉस्पिटलवर आयकर खात्याच्या धाडी, सर्च ऑपरेशन सुरु

नाशिक : आयकर विभागाने उत्तर महाराष्ट्रात सर्च ऑपरेशन हाती घेतले असून, एकमागोमाग एक धाडी टाकण्यास सुरुवात केली आहे. नाशिक, धुळे आणि जळगाव या तीन जिल्ह्यातील 81 हॉस्पिटलमध्ये सर्च ऑपरेशन करण्यात येत आहे. या हॉस्पिटलमध्ये कोट्यवधींच्या संशयास्पद नोंदी आढळल्या आहेत. नाशिक, धुळे आणि जळगाव या तिन्ही जिल्ह्यातील 81 हॉस्पिटल, डायग्नोस्टिक सेंटर आणि पॅथॉलॉजी लॅबमध्ये आयकर विभाग […]

उत्तर महाराष्ट्रातील 81 हॉस्पिटलवर आयकर खात्याच्या धाडी, सर्च ऑपरेशन सुरु
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 4:22 PM

नाशिक : आयकर विभागाने उत्तर महाराष्ट्रात सर्च ऑपरेशन हाती घेतले असून, एकमागोमाग एक धाडी टाकण्यास सुरुवात केली आहे. नाशिक, धुळे आणि जळगाव या तीन जिल्ह्यातील 81 हॉस्पिटलमध्ये सर्च ऑपरेशन करण्यात येत आहे. या हॉस्पिटलमध्ये कोट्यवधींच्या संशयास्पद नोंदी आढळल्या आहेत.

नाशिक, धुळे आणि जळगाव या तिन्ही जिल्ह्यातील 81 हॉस्पिटल, डायग्नोस्टिक सेंटर आणि पॅथॉलॉजी लॅबमध्ये आयकर विभाग तपासणीकडून केली जात आहे. 129 ठिकाणावरुन छाननीसाठी कागदपत्रे जमा करुन, संशयास्पद नोंदींची छाननी सुरु आहे. या सगळ्या हॉस्पिटलना 7 दिवसात नोटीस पाठवली जाणार आहे.

राज्यातील पाच जिल्ह्यातील अधिकाऱ्यांचा या आयकर विभागाच्या पथकात सहभाग असून, त्यात 16 अधिकारी, 265 कर्मचारी या सर्च ऑपरेशनमध्ये सहभागी आहेत, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

दरम्यान, चार-पाच दिवसांपूर्वी नाशिकमधील लोटस हॉस्पिटल भंडारी डायग्नोस्टिक प्रथमेश डायग्नोस्टिक आणी विंचूरकर डायग्नोस्टिक या बड्या सेंटरमध्ये आयकर विभागाने सखोल चौकशी सुरु केली होती. या हॉस्पिटलमधील डॉक्टर कट प्रॅक्टिस करत असल्याची गोपनीय माहिती आयकर विभागाला मिळली होती आणि त्याच माहितीच्या आधारे आयकर विभागाने थेट हॉस्पिटलवर धाडी मारण्यास सुरवात केली होती.

एकंदरीत उत्तर महाराष्ट्रात आयकर विभागाने मोठं सर्च ऑपरेशन सुरु केलं आहे. अत्यंत मोठं ऑपरेशन असल्याने स्थानिक पोलिसांचीही यात मदत घेतली जात आहे.

'चुकीच्या पद्धतीने...', धसांचा धनंजय मुंडेंनंतर पंकजा मुंडेंवर आरोप
'चुकीच्या पद्धतीने...', धसांचा धनंजय मुंडेंनंतर पंकजा मुंडेंवर आरोप.
पुरुष वेश्या.. मुंडेंच्या राजीनाम्यावर बोलताना 'या' आमदाराची जीभ घसरली
पुरुष वेश्या.. मुंडेंच्या राजीनाम्यावर बोलताना 'या' आमदाराची जीभ घसरली.
'मनगटात दम असेल तर कामाने मोठे व्हा', जानकरांना महिला नेत्याचा सल्ला
'मनगटात दम असेल तर कामाने मोठे व्हा', जानकरांना महिला नेत्याचा सल्ला.
'शरद पवार गटाकडून दादांना मिसकॉल येतात', NCP च्या आमदाराचा गौप्यस्फोट
'शरद पवार गटाकडून दादांना मिसकॉल येतात', NCP च्या आमदाराचा गौप्यस्फोट.
'बाप-लेकीला सोडा अन्...', शरद पवारांच्या खासदारांना कोणाचा प्रस्ताव?
'बाप-लेकीला सोडा अन्...', शरद पवारांच्या खासदारांना कोणाचा प्रस्ताव?.
दादर स्टेशनवर तरूणीचे कापले केस, काढला पळ; माथेफिरूला पोलिसांकडून अटक
दादर स्टेशनवर तरूणीचे कापले केस, काढला पळ; माथेफिरूला पोलिसांकडून अटक.
फेसबूक अन् इंस्टाग्राम वापरताय? आता होणार मोठा बदल, झुकेरबर्ग म्हणाला
फेसबूक अन् इंस्टाग्राम वापरताय? आता होणार मोठा बदल, झुकेरबर्ग म्हणाला.
मुंबईकरांची चिंता वाढली; HMPV चा शिरकाव, 6 महिन्याचं बाळ पॉझिटीव्ह
मुंबईकरांची चिंता वाढली; HMPV चा शिरकाव, 6 महिन्याचं बाळ पॉझिटीव्ह.
सव्वालाख मुंबईकरांना गंडा, मालक पसार, टोरेस फसवणूक प्रकरणात मोठी अपडेट
सव्वालाख मुंबईकरांना गंडा, मालक पसार, टोरेस फसवणूक प्रकरणात मोठी अपडेट.
महायुतीतील मनसेची युती कशी फिस्कटली? कारण देत राज ठाकरे स्पष्ट म्हणाले
महायुतीतील मनसेची युती कशी फिस्कटली? कारण देत राज ठाकरे स्पष्ट म्हणाले.