Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘मी बँकेचा पाव-आणाही घेतला नाही, तरीही आरोप’, राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्याची खदखद

राज्य सहकारी (शिखर) बँक घोटोळ्याप्रकरणी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह 65 संचालकांना क्लीन चीट मिळाली आहे. यामध्ये जळगावचे राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी खासदार ईश्वरालाल जैन यांचंदेखील नाव आहे (Jalgaon NCP leader Ishwarlal Jain on Shikhar Bank case),

'मी बँकेचा पाव-आणाही घेतला नाही, तरीही आरोप', राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्याची खदखद
Follow us
| Updated on: Feb 20, 2021 | 10:00 PM

जळगाव : राज्य सहकारी (शिखर) बँक घोटोळ्याप्रकरणी चौकशीसाठी माजी न्यायमूर्तींच्या अध्यक्षेखाली नियुक्त करण्यात आलेल्या समतीने नुकताच आपला अहवाल दिला आहे. यात राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह 65 संचालकांना क्लीन चीट मिळाली आहे. यामध्ये जळगावचे राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी खासदार ईश्वरालाल जैन यांचंदेखील नाव आहे. जैन यांनादेखील या प्रकरणी दिलासा मिळाला आहे. याप्रकरणी क्लीन चीट मिळाल्यानंतर त्यांनी ‘टीव्ही 9 मराठी’सोबत बातचित करुन आपली खदखद व्यक्त केली (Jalgaon NCP leader Ishwarlal Jain on Shikhar Bank case).

‘उशिरा का होईना आम्हाला न्याय मिळाला’

“सीता ज्याप्रमाणे अग्नी परीक्षा देवून बाहेर पडल्या त्याप्रमाणे आम्हीही बाहेर पडलो आहोत. याबतीत माझे उदाहरण द्यावयाचे झाल्यास मी कधी पाव-आणाही या बँकेतून घेतला नाही. बँकेच्या कोणत्याही सवलती घेतल्या नाही. तरीही 25 लाख रुपये रीकवरी माझ्याकडून काढण्यात आली. कशासाठी हे करण्यात आले? जे माझ्या बाबतीत झाले तेच इतर संचालकांच्या बाबतीत झाले. शेवटी चौकशी होऊन क्लीन चीट मिळाली. उशिरा का होईना आम्हाला न्याय मिळाला”, अशी भूमिका ईश्वरालाल जैन यांनी मांडली (Jalgaon NCP leader Ishwarlal Jain on Shikhar Bank case).

‘राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कमकुवत करण्यासाठी हे राजकारण’

“महाराष्ट्र राज्य सहकारी (शिखर) बँकेत कोणताही घोटाळा झाला नव्हता. केवळ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कमकुवत करण्यासाठी हे राजकारण करण्यात आले”, असा आरोप ईश्वरालाल जैन यांनी यावेळी केला. “राष्ट्रवादी काँग्रेसची ताकत कमकुवत करण्यासाठी हे राजकारण करण्यात आले. अन्यथा संचालक मंडळ बरखास्त करण्याची गरज नव्हती. चौकशी करण्याची गरज नव्हती. कारण सर्व व्यवहार पारदर्शी होता. सर्वच पक्षाचे लोक तेथे प्रतिनिधी म्हणून आहेत. हे सर्व त्या ठिकाणी बसून व्यवहार करताहेत, तर काय चुकीचे होणार आहे? जे काही घडलं ते राजकारणातून घडले आहे आता ते सर्व निवळले आहे”, अशी प्रतिक्रिया जैन यांनी दिली.

शरद पवार यांना याच प्रकरणी ईडीची नोटीस

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना याच प्रकरणी ईडीने नोटीस बजावली होती. त्यानंतर राज्यात खळबळ उडाली होती. त्यावेळी शरद पवार स्वतः ईडी कार्यालयात जाण्यासाठी निघाले होते. मात्र तत्कालीन पोलीस अधिकाऱ्यांच्या विनंतीवरून त्यांनी जाणे रद्द केले होते. या बँकेच्या चौकशीसाठी राज्यात महाविकास आघाडी सरकार आल्यानंतर निवृत न्यायमूर्तींच्या नेतृत्वाखालील फेब्रुवारी 2020 मध्ये समिती नेमण्यात आली होती. क्लीन चिट मिळालेल्या संचालकात जळगाव जिल्हा बँकेचे माजी चेअरमन आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी खासदार ईश्वरालाल जैन हे देखील आहेत.

हेही वाचा :

पंतप्रधान नरेंद्र मोदी बँकांबाबत कधी कोणता निर्णय घेतील सांगता येत नाही : अजित पवार

जब-जब मैं बिखरा हूँ, दुगनी रफ्तार से निखरा हूँ, धनंजय मुंडेंचा शायरीतून इशारा

मंत्री अदिती तटकरेंच्या जिल्ह्यात 15 हजार महिला अपात्र
मंत्री अदिती तटकरेंच्या जिल्ह्यात 15 हजार महिला अपात्र.
'हो, ते वक्तव्य बरोबर होतं, समजलं?', 'त्या' व्हिडिओवर अजितदादा संतापले
'हो, ते वक्तव्य बरोबर होतं, समजलं?', 'त्या' व्हिडिओवर अजितदादा संतापले.
कोरटकर प्रकरणावरून विरोधक सत्ताधारी भिडले
कोरटकर प्रकरणावरून विरोधक सत्ताधारी भिडले.
अजितदादांच्या 'त्या' व्हिडिओवर गुलाबराव पाटलांची मिश्किल टिपणी
अजितदादांच्या 'त्या' व्हिडिओवर गुलाबराव पाटलांची मिश्किल टिपणी.
'तसा एक नेपाळी महाराष्ट्रात फिरतोय', परबांची राणेंवर नाव न घेता टीका
'तसा एक नेपाळी महाराष्ट्रात फिरतोय', परबांची राणेंवर नाव न घेता टीका.
मराठी असल्याने डायमंड असोसिएशनने नाकारलं सभासदत्व
मराठी असल्याने डायमंड असोसिएशनने नाकारलं सभासदत्व.
माझ्या बाळाला फक्त..., शिंदेंनी मदतीचा हात पुढे करताच आईला अश्रू अनावर
माझ्या बाळाला फक्त..., शिंदेंनी मदतीचा हात पुढे करताच आईला अश्रू अनावर.
माझ्यावर कोणाचाही दबाव नाही; दिशाच्या वडिलांचं मोठं विधान
माझ्यावर कोणाचाही दबाव नाही; दिशाच्या वडिलांचं मोठं विधान.
साताऱ्यातील त्या मजूर कुटुंबातील चिमुकल्याचा वैद्यकीय खर्च शिंदे करणार
साताऱ्यातील त्या मजूर कुटुंबातील चिमुकल्याचा वैद्यकीय खर्च शिंदे करणार.
संतापजनक... कचऱ्यात 6 ते 7 अर्भकं, राज्य महिला आयोगाकडून दखल अन्...
संतापजनक... कचऱ्यात 6 ते 7 अर्भकं, राज्य महिला आयोगाकडून दखल अन्....