जळगावच्या बोदवडमधील भाजपच्या 11 नगरसेवकांचा शिवसेनेत प्रवेश, पण धक्का नेमका कुणाला?

आज बोदवडमधील 11 नगरसेवकांनी हाती शिवबंधन बांधलं आहे. पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांच्या उपस्थितीत भाजपच्या 11 नगरसेवकांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. महत्वाची बाब म्हणजे हे नगरसेवक एकनाथ खडसे समर्थक होते. त्यामुळे हा धक्का नेमका कुणाला? अशी चर्चा आता जळगावच्या राजकीय वर्तुळात पाहायला मिळतेय.

जळगावच्या बोदवडमधील भाजपच्या 11 नगरसेवकांचा शिवसेनेत प्रवेश, पण धक्का नेमका कुणाला?
गुलाबराव पाटील, पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री
Follow us
| Updated on: Sep 24, 2021 | 8:48 PM

मुंबई : जळगाव जिल्ह्यात भाजपला लागलेली गळती काही थांबण्याचं नाव घेत नाही. ज्येष्ठ नेते एकनाक खडसे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर भाजपचा गड असलेल्या जळगावात भाजपला मोठे धक्के बसत आहेत. आज बोदवडमधील 11 नगरसेवकांनी हाती शिवबंधन बांधलं आहे. पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांच्या उपस्थितीत भाजपच्या 11 नगरसेवकांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. महत्वाची बाब म्हणजे हे नगरसेवक एकनाथ खडसे समर्थक होते. त्यामुळे हा धक्का नेमका कुणाला? अशी चर्चा आता जळगावच्या राजकीय वर्तुळात पाहायला मिळतेय. (11 corporators from Bodhwad in Jalgaon district join ShivSena)

आज भाजपच्या बोदवडच्या नगरपालिकेचे नगराध्यक्ष आणि त्यांच्यासोबत 11 नगरसेवक यांनी आमदार चंद्रकांत पाटील यांच्यावर विश्वास ठेवत भाजपला सोडचिठ्ठी देत शिवसेनेत प्रवेश केलाय. पूर्वी मुक्ताईनगरचे 6 नगरसेवक शिवसेनेते दाखल झाले होते. आज मुक्ताईनगरचे गटनेतेही शिवसेनेत दाखल झाले आहेत. याचाच अर्थ तिथल्या आमदारांनी केलेली कामं आणि जनतेचा मिळवलेला विश्वास आणि उद्धव साहेबांच्या कामगिरीवर विश्वास ठेवून त्यांनी आज शिवसेनेत प्रवेश केलाय. येणाऱ्या काळात मुक्ताईनगर जिल्हा परिषदेमध्येही अशीच स्थिती राहील, असा दावा मंत्री गुलाबराव पाटील यांनी केलाय.

धक्का नेमका कुणाला? तुम्हीच समजून घ्या…

दरम्यान, यावेळी हा धक्का भाजपला आहे की एकनाथ खडसे यांना? असा प्रश्न पत्रकारांनी विचारला. त्यावेळी धक्का धक्का असतो. तो कुणाला हे तुम्ही ओळखून घ्या, असं वक्तव्य गुलाबराव पाटील यांनी केलंय. तसंच हे नगरसेवक भाजपच्या तिकीटावर निवडून आले होते. त्यामुळे हा धक्का भाजपलाच असल्याचं मी मानतो, असं पाटील म्हणाले.

जळगावात भाजपच्या नाकावर टिच्चून शिवसेनेचा महापौर

याआधी, जळगाव महानगरपालिकेतील महापौरपदाच्या निवडणुकीत (Jalgaon Mayor election) शिवसेनेने भाजपच्या नाकावर टिच्चून विजय मिळवला होता. या निवडणुकीपूर्वी भाजपच्या 27 नगरसेवकांनी बंडखोरी केली होती. त्यामुळे शिवसेनेने अपेक्षेप्रमाणे विजय संपादित केला. त्यामुळे महापौरपदी शिवसेनेच्या जयश्री महाजन यांचा विजय झाला.

या निवडणुकीत बहुमतसाठी 38 मतांची गरज होती. जयश्री महाजन यांनी 45 मते मिळाली. तर भाजपच्या प्रतिभा कापसे यांना 28 मते मिळाली. तर उपमहापौरपदाच्या निवडणुकीत भाजपचे बंडखोर उमेदवार कुलभूषण पाटील यांनी बाजी मारली. शिवसेनेचा हा विजय जळगावमधील गिरीश महाजन यांच्या वर्चस्वाला धक्का मानला गेला.

20 वर्षानंतर गुलाबराव पाटील पहिल्यांदाच एकनाथ खडसेंच्या घरी

राजकारणातील एकमेकांचे प्रतिस्पर्धी असलेले शिवसेना नेते गुलाबराव पाटील आणि राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्यातील संवादाला सुरुवात झाली आहे. 29 ऑगस्ट रोजी 20 वर्षात पहिल्यांदाच गुलाबराव पाटील हे खडसेंच्या मुंबईतील घरी गेले. यावेळी दोघांनी मनमोकळ्या गप्पा मारल्या. या भेटीनंतर गुलाबराव पाटील यांनी मीडियाशी संवादही साधला. खडसेंना शह देण्याची या मागची कोणतीही खेळी नसल्याचं गुलाबराव पाटील यांनी स्पष्ट केलं होतं.

जळगाव जिल्हा बँक निवडणुकीचे वारे आता वाहू लागले आहेत. ही निवडणूक बिनविरोध करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. पालकमंत्री, शिवसेना नेते गुलाबराव पाटील यांनी यात पुढाकार घेतला आहे. याशिवाय सहकार क्षेत्रात वर्चस्व असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांचीही निवडणूक बिनविरोध करण्याची अपेक्षा आहे. त्यामुळे सर्वच पक्षाच्या नेत्यांच्या गाठीभेटी सुरू आहेत. स्वतः गुलाबराव पाटील हे सुध्दा नेत्यांच्या भेटी घेत आहेत. जळगाव जिल्हा बँकेवर सध्या एकनाथ खडसे यांचे वर्चस्व आहे. पाटील यांनी नुकतीच खडसेंच्या मुंबईच्या घरी जाऊन त्यांची भेट घेतली. 20 वर्षात प्रथमच आपण खडसेंच्या मुंबईच्या घरी गेलो, असं पाटील यांनी या भेटीनंतर स्पष्ट केलं होतं.

इतर बातम्या :

भाजपकडून फॉल्स प्रपोगंडा राबवला जातोय, महागाई, बेरोजगारीवरुन जयंत पाटलांचा घणाघात

‘सोमय्यांबाबत पहिल्या दिवशी जे घडलं ते चुकीचंच’, अजित पवारांची स्पष्ट कबुली!

11 corporators from Bodhwad in Jalgaon district join ShivSena

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.