Jalgaon Suicide | मॉर्निंग वॉकला गेलेल्या दाम्पत्याची आत्महत्या, कॉलेजसमोरच्या विहिरीत उडी

61 वर्षीय भागवत उर्फ बाळू दिगंबर पाटील आणि 54 वर्षीय विमलबाई भागवत पाटील यांनी हे टोकाचं पाऊल उचललं. (Jalgaon Yawal Couple Commits Suicide while going for Morning Walk)

Jalgaon Suicide | मॉर्निंग वॉकला गेलेल्या दाम्पत्याची आत्महत्या, कॉलेजसमोरच्या विहिरीत उडी
Follow us
| Updated on: Jun 17, 2020 | 1:40 PM

जळगाव : मॉर्निंग वॉकसाठी जात असल्याचे सांगून घराबाहेर पडलेल्या दाम्पत्याने आत्महत्या केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. जळगाव जिल्ह्यातील यावल शहरात राहणाऱ्या पाटील दाम्पत्याने कॉलेजसमोर असलेल्या घराच्या विहिरीत उडी घेऊन आयुष्य संपवलं. (Jalgaon Yawal Couple Commits Suicide while going for Morning Walk)

यावल शहरातील फैजपूर रस्त्यावरील एका शेतात आज (बुधवारी) सकाळी 7 वाजताच्या सुमारास ही धक्कादायक घटना घडली आहे. 61 वर्षीय भागवत उर्फ बाळू दिगंबर पाटील आणि 54 वर्षीय विमलबाई भागवत पाटील यांनी हे टोकाचं पाऊल उचललं.

भागवत पाटील आणि विमलबाई पाटील हे यावल शहरातील सुतारवाडा भागातील रहिवासी होते. ते बुधवारी सकाळी पावणेसहा वाजता मॉर्निंग वॉकसाठी जात असल्याचे सांगून घराबाहेर पडले होते. फैजपूर रस्त्यावरील महाविद्यालयाच्या समोर असलेल्या निर्मल चोपडे यांच्या शेतातील विहिरीत दोघांनी उडी घेऊन आत्महत्या केली.

पाटील दाम्पत्याच्या आत्महत्येचे कारण अद्याप समजलेले नाही. हा प्रकार सकाळी सात ते साडेसात वाजताच्या सुमारास निर्मल चोपडे यांच्या शेतात गेलेल्या एका व्यक्तीच्या लक्षात आला. त्याने फैजपूर रस्त्यावरून ये-जा करणाऱ्या काही लोकांना त्याबाबत सांगितले. नंतर यावल पोलीस ठाण्यात घटनेची माहिती देण्यात आली.

हेही वाचा : Jalgaon Murder | मुक्ताईनगरमध्ये माजी सभापतींची गळा चिरुन हत्या

घटनेची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले. नंतर पाटील कुटुंबीयांना घटनेची माहिती देण्यात आली. घाबरलेल्या कुटुंबीयांनीही घटनास्थळी धाव घेतली. (Jalgaon Yawal Couple Commits Suicide while going for Morning Walk)

घटनास्थळी शहरातील नागरिकांचा मोठ्या संख्येने जमाव जमला होता. काही वेळानंतर दोघांचे मृतदेह विहिरीतून बाहेर काढण्यात आले. यावल ग्रामीण रुग्णालयात ते विच्छेदनासाठी नेण्यात आले.

दरम्यान, भागवत पाटील आणि विमलबाई पाटील यांनी आत्महत्या का केली? याचे कारण समोर आलेले नाही. परंतु पोलिसांनी केलेल्या प्राथमिक तपासात ही घटना कौटुंबिक वादातून घडली असावी, अशी शक्यता वर्तवली जात आहे. (Jalgaon Yawal Couple Commits Suicide while going for Morning Walk)

'बहुमत मिळाल्यानं गांगरून गेलेत', मनसे नेत्याची महायुतीवर सडकून टीका
'बहुमत मिळाल्यानं गांगरून गेलेत', मनसे नेत्याची महायुतीवर सडकून टीका.
...म्हणून भूजबळांना महायुतीच्या मंत्रिमंडळातून डावललं, कारणं आली समोर
...म्हणून भूजबळांना महायुतीच्या मंत्रिमंडळातून डावललं, कारणं आली समोर.
बोट अपघात 13 मृत्यू, मृतांच्या नातेवाईकांना सरकारकडून किती लाखांची मदत
बोट अपघात 13 मृत्यू, मृतांच्या नातेवाईकांना सरकारकडून किती लाखांची मदत.
'महिलांना 2100 रू. कधी देणार? लाडक्या बहिणी वाट बघताय, आता...'
'महिलांना 2100 रू. कधी देणार? लाडक्या बहिणी वाट बघताय, आता...'.
एलिफंटाला जाणारी बोट उलटली, समुद्रात काय झालं? अपघात नेमका कसा झाला?
एलिफंटाला जाणारी बोट उलटली, समुद्रात काय झालं? अपघात नेमका कसा झाला?.
आंबेडकरांबाबतच्या वक्तव्यावरून शाहांची कोंडी, अडकले वादाच्या भोवऱ्यात
आंबेडकरांबाबतच्या वक्तव्यावरून शाहांची कोंडी, अडकले वादाच्या भोवऱ्यात.
'फडणवीस तुम्हाला सरपंचाच्या...',देशमुखांच्या हत्येचे पडसाद विधानसभेत
'फडणवीस तुम्हाला सरपंचाच्या...',देशमुखांच्या हत्येचे पडसाद विधानसभेत.
गेट वेहून एलिफंटाला जाणारी बोट उलटली, बोटीत 35हून अधिक प्रवासी अन्...
गेट वेहून एलिफंटाला जाणारी बोट उलटली, बोटीत 35हून अधिक प्रवासी अन्....
दादांच्या राष्ट्रवादीला कोणती खाती? खात्यांच्या नावाची यादीच आली समोर
दादांच्या राष्ट्रवादीला कोणती खाती? खात्यांच्या नावाची यादीच आली समोर.
दादांचे दोन नेते भिडले, उन्मतपणा खपवून घेणार.., मिटकरींचा कोणाला इशारा
दादांचे दोन नेते भिडले, उन्मतपणा खपवून घेणार.., मिटकरींचा कोणाला इशारा.