जलयुक्त शिवार योजनेची चौकशी सुरू, मराठवाड्यातून सुरुवात; भाजपच्या अडचणी वाढणार?

माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महत्त्वकांक्षी जलयुक्त शिवार योजनेच्या चौकशीस सुरुवात झाली आहे. (Jalyukt shivar scheme probe start from aurangabad)

जलयुक्त शिवार योजनेची चौकशी सुरू, मराठवाड्यातून सुरुवात; भाजपच्या अडचणी वाढणार?
Follow us
| Updated on: Dec 12, 2020 | 10:40 AM

औरंगाबाद : माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महत्त्वकांक्षी जलयुक्त शिवार योजनेच्या चौकशीस सुरुवात झाली आहे. मराठावाड्यातून ही चौकशी सुरू झाली असून त्यामुळे भाजपच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. (Jalyukt shivar scheme probe start from aurangabad)

मराठवाड्यात जलयुक्त शिवार योजनेची जिल्हानिहाय चौकशी होणार आहे. एकूण 2 हजार 417 कोटी रुपयांच्या कामांची चौकशी करण्यात येणार आहे. मराठवाड्यात 6 हजार 20 गावांमध्ये जलयुक्तची कामे झाली होती. यावेळी अनेक गुत्तेदार आणि मजूर संस्थांनी घोटाळे केल्याचा संशय असल्याने ही चौकशी करण्यात येणार आहे.

पावणे दोन लाख कामे संशयाच्या भोवऱ्यात

मराठवाड्यातील जलयुक्त शिवार कामाची जिल्हानिहाय चौकशी करण्यासाठी जलसंधारण आणि आयुक्त कार्यालयातील अधिकाऱ्यांची समिती स्थापन करण्यात आली आहे. ही चौकशी समिती जलयुक्तचे जिल्हानिहाय रेकॉर्ड तपासणार आहे. मराठवाड्यातील तब्बल पावणे दोन लाख कामे संशयाच्या भोवऱ्यात असल्याने ही चौकशी होत आहे. त्यामुळे भाजपची डोकेदुखी वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. (Jalyukt shivar scheme probe start from aurangabad)

योजना असफल

दरम्यान, जलयुक्त शिवार योजना अपयशी ठरल्याचं सांगत राज्य सरकारने या योजनेच्या चौकशीचे आदेश दिले होते. या योजनेवर 9 हजार 634 कोटी रुपये खर्च करूनही पाण्याची गरज भागवण्यात तसेच भूजल पातळी वाढवण्यात अपयश आल्याचा ठपका कॅगने ठेवला होता. जलयुक्त शिवार योजना राबवूनही राज्यातील टँकर्सची संख्या वाढलेलीच असल्याचंही कॅगने म्हटलं होतं. त्यामुळे सरकारने या योजनेची चौकशी करण्याचा निर्णय घेतला होता. कॅगने पाहणी केलेल्या 120 गावांपैकी एकाही गावात दुरुस्ती आणि देखभालीसाठी सरकारने अनुदानच दिले नसल्याचं आढळून आलं होतं. तर विरोधकांनी मात्र, ही योजना यशस्वी झाल्याचा दावा केला होता. (Jalyukt shivar scheme probe start from aurangabad)

संबंधित बातम्या:

जलयुक्त शिवारातील जनसहभागाचीही चौकशी करणार का?; चंद्रकांत पाटील यांचा सवाल

फडणवीसच म्हणाले होते जलयुक्त शिवारची चौकशी करा, एकनाथ खडसेंची पहिली प्रतिक्रिया

जलयुक्त शिवाराची ओपन चौकशी होईल; भाजपने घाबरून जाऊ नये; जयंत पाटलांचा खोचक टोला

Special Report | फडणवीसांच्या जलयुक्त शिवार योजनेची SIT द्वारे चौकशीचे आदेश!

(Jalyukt shivar scheme probe start from aurangabad)

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.