वडिलांनी मदत केली असती तर ‘बिग बॉस’मध्ये जाण्याची वेळच आली नसती, जान कुमार सानूची खदखद
"मी अनेक ठिकाणी गेलो आहे. कित्येक संगीतकारांशी बोलण्याचा प्रयत्न केला. वडिलांनी एकाही निर्मात्याशी ओळख करुन दिली नाही", असं जानने सांगितलं (Jan Kumar Sanu said my father does not help me).

मुंबई : “माझ्या आतापर्यंतच्या जडणघडणमध्ये वडील कुमार सानू यांची काहीच भूमिका नाही. माझ्याबाबत नेपोटिज्म सारखी गोष्ट घडली असती तर माझे भरपूर गाणे असते. वडिलांनी मदत केली असती तर आज मोठमोठ्या चित्रपटांमध्ये मी गायलो असतो. आतापर्यंत मी प्रचंड लोकप्रिय झालो असतो”, अशी खदखद गायक जान कुमार सानू याने ‘टीव्ही 9 भारतवर्ष’ला दिलेल्या मुलाखतीत व्यक्त केली (Jan Kumar Sanu said my father does not help me).
“बिग बॉसची ऑफर आल्यावर मी लगेच तयार झालो. कारण बिग बॉस देशभरात घराघरात पोहोचलेला कार्यक्रम आहे. कोट्यवधी लोकांपर्यंत हा कार्यक्रम आपल्याला पोहोचवतो. मला लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी एक माध्यम हवं होतं. या मंचाने मला कोट्यवधी लोकांपर्यंत पोहोचवलं. वडिलांनी थोडी जरी मेहनत केली असती तर मला बिग बॉसमध्ये जाण्याची गरज वाटली नसती”, असं मत जानने मांडलं.
“मी अनेक ठिकाणी गेलो आहे. कित्येक संगीतकारांशी बोलण्याचा प्रयत्न केला. वडिलांनी एकाही निर्मात्याशी ओळख करुन दिली नाही”, असं जानने सांगितलं (Jan Kumar Sanu said my father does not help me).
“गेल्या आठ-दहा वर्षात प्रत्येक निर्मात्याच्या कार्यालयात गेलो. याबात कोणीही चौकशी करु शकतं, माहिती मिळवू शकतं. कित्येक प्रसिद्ध संगीतकारांच्या घराच्या पायऱ्यांवर बसून रात्र काढल्या आहेत. तासंतास वाट बघितली आहे. आताही मी हार मानणार नाही. मोठा संगीतकार, गायक बनणार. बिग बॉसनंतर काम मिळेल अशी आशा आहे”, असं जान म्हणाला.
“बिग बॉसच्या घरात भरपूर गोष्टी शिकायला मिळाल्या. चांगल्या गोष्टींची सवय लागली. आयुष्याच्या शर्यतीत सर्वात आधी राहायचं शिकलो आहे”, असं जानने सांगितलं. दरम्यान, बिग बॉसमधून बाहेर पडल्यानंतर खऱ्या आयुष्यात बिग बॉसच्या घरातील पवित्रा आणि एजाज यांच्याऐवजी कुणालाही भेटण्याची इच्छा नसल्याचंही त्याने सांगितलं.
संबंधित बातमी : बाप-लेकाच्या नात्यात फूट, कुमार सानूंकडून जानला ‘आडनाव’ बदलण्याचा सल्ला