सहकाऱ्याच्या निधनाने जयंत पाटील गहिवरले, आठवणी जागवतानाच अश्रू अनावर

राजारामबापू सहकारी साखर कारखान्याचे ज्येष्ठ संचालक जगदीश पाटील यांच्या कार्याविषयी बोलतानाच जयंत पाटील यांच्या अश्रूंचा बांध फुटला

सहकाऱ्याच्या निधनाने जयंत पाटील गहिवरले, आठवणी जागवतानाच अश्रू अनावर
Follow us
| Updated on: Oct 18, 2020 | 5:20 PM

सांगली : जलसंपदा मंत्री आणि राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना सहकाऱ्याच्या अस्थी विसर्जनावेळी अश्रू अनावर झाले. राजारामबापू सहकारी साखर कारखान्याचे ज्येष्ठ संचालक जगदीश पाटील यांच्या अकाली निधनानंतर बोलताना जयंत पाटलांना गहिवरुन आले. (Jayant Patil gets emotional while reviving memories of Jagdish Patil)

जगदीश पाटील यांचे नुकतेच निधन झाले. त्यांच्या अस्थी विसर्जनाचा कार्यक्रम आज (रविवारी) पार पडला. या कार्यक्रमाला जयंत पाटील उपस्थित राहिले होते. जगदीश पाटील यांच्या कार्याविषयी बोलत असतानाच अचानक जयंत पाटील यांच्या अश्रूंचा बांध फुटला आणि ते काही काळासाठी जयंत पाटील स्तब्ध झाले.

“लोकनेते राजारामबापू पाटील यांच्याशी वैचारिक बांधिलकी असणारे अनेक जण मला लाभले. या लोकांच्या ताकदीनेच आज मी इथपर्यंत आलो आहे. मात्र तीच माणसं आज माझ्या हातून निसटत आहेत” याचं दुःख जयंत पाटील यांनी यावेळी बोलून दाखवलं.

कोरोनामुळे जगभरात अनेक जणांचा मृत्यू झाला आहे. भारतातही अनेकांचे निधन झाले आहे. राजारामबापू सहकारी साखर कारखान्याचे संचालक जे. वाय. पाटील, राजारामबापू दूध संघाचे संचालक जगन्नाथ पाटील, अशोक पाटील, इस्लामपूर शहराचे माजी नगराध्यक्ष विजय पाटील असे अनेक जवळचे सहकारी जयंत पाटील यांनी या कालखंडात गमावले आहेत.

महाराष्ट्राच्या राजकारणात लोकांमध्ये वावरणारा नेता म्हणून जयंत पाटील यांची ओळख आहे. आपल्या जवळच्या माणसांचे अकाली जाण्याने जयंत पाटील यांना मोठं दुःख झाल्याचं या कार्यक्रमात पाहायला मिळालं.

दरम्यान, जयंत पाटील यांनी आज वाळवा तालुक्यातील बागणी येथे कोविड सेंटरचे लोकार्पण केले. सुसज्ज व्यवस्था नागरिकांना नक्कीच दिलासा देईल अशी खात्री त्यांनी यावेळी व्यक्त केली.

संबंधित बातम्या :

काळजी करु नका, बऱ्या व्हाल, जयंत पाटलांकडून 90 वर्षीय कोरोनाबाधित आजींना धीर

व्हीलचेअरवर असूनही छगनरावांमुळे बजेट मांडलं, भुजबळांच्या वाढदिवशी जयंत पाटलांकडून अनोखी आठवण

(Jayant Patil gets emotional while reviving memories of Jagdish Patil)

भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.
'लाडक्या बहिणीं'नो मोठी बातमी, लाभार्थी महिलांना याच महिन्यात...
'लाडक्या बहिणीं'नो मोठी बातमी, लाभार्थी महिलांना याच महिन्यात....