Jayant Patil | ‘शिवसेना आता प्रचंड मवाळ झालीये’ जयंत पाटील म्हणतात, शिवसैनिकांनी बराच संयम दाखवला!

कोल्हापूरः मातोश्रीबाहेर हनुमान चालिसा (Hanuman Chalisa) म्हणण्यासाठी आक्रमक झालेल्या राणा दाम्पत्याविरोधात शिवसैनिकदेखील आक्रमक झाले आहेत. यामुळे मुंबईत (Mumbai Security) कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भवू शकतो, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. यावर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष व जलसंपदा मंत्री जयंत पाटील (Jayant atil) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. शिवसैनिक सध्या आक्रमक दिसत असले तरीही पूर्वीपेक्षा ते बरेच मवाळ झाले […]

Jayant Patil | 'शिवसेना आता प्रचंड मवाळ झालीये' जयंत पाटील म्हणतात, शिवसैनिकांनी बराच संयम दाखवला!
Image Credit source: TV9 Marathi
Follow us
| Updated on: Apr 23, 2022 | 12:05 PM

कोल्हापूरः मातोश्रीबाहेर हनुमान चालिसा (Hanuman Chalisa) म्हणण्यासाठी आक्रमक झालेल्या राणा दाम्पत्याविरोधात शिवसैनिकदेखील आक्रमक झाले आहेत. यामुळे मुंबईत (Mumbai Security) कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भवू शकतो, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. यावर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष व जलसंपदा मंत्री जयंत पाटील (Jayant atil) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. शिवसैनिक सध्या आक्रमक दिसत असले तरीही पूर्वीपेक्षा ते बरेच मवाळ झाले आहेत. त्यांनी बराच संयम दाखवला आहे. एखाद्याच्या घरापर्यंत पोहोचत असाल तर अशी प्रतिक्रिया व्यक्त होणे साहजिक आहे, असं वक्तव्य यंत पाटील यांनी केलं आहे. तसेच कुणी जर जाणीवपूर्वक धर्मात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करत असेल तर सगळ्यांचे पत्ते आम्हाला माहिती आहेत, असा इशाराही पाटील यांनी दिला आहे.

‘…सगळ्यांचे पत्ते आम्हाला माहिती आहेत’

सध्या धार्मित तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न होतोय, असा आरोप करताना जयंत पाटील म्हणाले, ‘ आता महाराष्ट्रात जातिय तेढ, धार्मिक भावनांबाबत टोकाची भूमिका व्यक्त करणं हे सगळे प्रकार आता होण्याची भीती आहे. धर्माबद्दलती आपुलकी आणि आदरपेक्षा मताबद्दलची ओढ जास्त व्यक्त होत आहे. आमचं सरकार सत्तेवर आलेलं आहे, तेव्हा ज्यांना प्रचंड दुःख झालंय, त्या सगळ्यांचा यात हातभार आहे. जाणीवपूर्वक धर्मामध्ये तेढ वाढवण्याचा प्रयत्न जर होत असेल, तर सगळ्यांचेच पत्ते सगळ्यांना माहित आहेत…

शिवसेना आक्रमक झालीय का?

मातोश्रीबाहेर शिवसैनिक आक्रमक झालेत यावर प्रश्न विचारला असता जयंत पाटील म्हणाले, ‘ उद्धव ठाकरे जेव्हापासून मुख्यमंत्री झालेत तेव्हापासून समाजाला एकत्र घेऊन काम करत आहे. त्यामुळे एकदम आक्रमक असलेली शिवसेना बरीच शांत झालेली आहे. शिवसेना आता उलट प्रचंड मवाळ झाली आहे.. पण एखाद्याच्या घरावरच जायला लागाल तुम्ही.. नेत्यांच्या घरावर हल्ले करायचे, त्याच्या घराजवळ जाऊन असले उपद्व्याप करायचे.. उलट शिवसैनिकांनी बराच संयम दाखवलाय..

इतर बातम्या-

Navneet Rana vs Shivsena : राणांच्या घराबाहेर शिवसैनिक आक्रमक, शिवसैनिक राणांच्या इमारतीत घुसले

Sidharth-Kiara Breakup | सिद्धार्थ-कियारा यांच्या ब्रेकअपच्या चर्चा, चाहत्यांना मोठा धक्का…

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.