मुंबई : आगामी निवडणुकांपूर्वी बिहारमध्ये राजकीय चढाओढ सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे. अशात अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी गुरुवारी केलेल्या वक्तव्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. यावर राष्ट्रवादीचे नेते आणि राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जितेंद्र आव्हाड यांनी भाजपवर सडकून टीका केली आहे. ‘निवडणूकीच्या प्रचारामध्ये मतं मागण्यासाठी आम्ही तुम्हांला कोरोनाची लस फुकट देऊ हे सांगणं म्हणजे माणुसकिची नीचोत्तम पातळी गाठण्यासारखं आहे.’ अशी टीका करत आव्हाडांनी ट्वीट केलं आहे. (Jitendra awhad tweet against bjp on Bihar election )
बिहारमधील प्रत्येक व्यक्तीला कोरोनाची लस मोफत देण्यात येईल. हे आमच्या जाहीरनाम्यातील प्रमुख वचन असल्याचे निर्मला सितारामन यांनी म्हटलं होतं. त्यावर ‘निस्वार्थपणे लोकांच्या जीवाची रक्षा करणे हि सरकारची प्राथमिक जबाबदारी आहे. त्यासाठी मतं मागणं हा माझ्या अंदाजाने आचारसंहितेचाही भंग आहे’ अशी टीका आव्हाडांनी केली आहे.
निवडणूकीच्या प्रचारामध्ये मतं मागण्यासाठी आम्ही तुम्हांला कोरोनाची लस फुकट देऊ हे सांगणं म्हणजे माणुसकिची नीचोत्तम पातळी गाठण्यासारखं आहे.
निस्वार्थपणे लोकांच्या जीवाची रक्षा करणे हि सरकारची प्राथमिक जबाबदारी आहे.
त्यासाठी मतं मागणं हा माझ्या अंदाजाने आचारसंहितेचाही भंग आहे.
— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) October 22, 2020
भाजपकडून गुरुवारी बिहार विधानसभा निवडणुकीसाठी जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आला. यावेळी निर्मला सीतारामन यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. दरम्यान, भाजपच्या या जाहीरनाम्यात 19 लाख रोजगारांची निर्मिती, क्रीडा विश्वविद्यालयाची स्थापन अशा घोषणांचा उल्लेख आहे. लोकांनी आपले मत देऊन एनडीए सरकारला विजयी करावे. पुढील पाच वर्षांसाठी नितीश कुमार हेच बिहारचे मुख्यमंत्री राहतील. त्यांच्या नेतृत्त्वाखाली बिहार एक प्रगत आणि विकसित राज्य म्हणून नावारुपाला येईल, असा विश्वासही निर्मला सीतारामन यांनी व्यक्त केला.
बिहारमध्ये 28 ऑक्टोबर, 3 नोव्हेंबर आणि 7 नोव्हेंबर अशी तीन टप्प्यांत विधानसभा निवडणुकीसाठी मतदान होणार आहे. यानंतर 10 नोव्हेंबरला या निवडणुकीचा निकाल जाहीर होईल.
बिहारमध्ये काँग्रेस मुख्यालयावर IT ची धाड, कारमध्ये 8 लाख रुपये सापडल्याने सुरजेवालांची चौकशी
(Jitendra awhad tweet against bjp on Bihar election )