देशात CAA कधी लागू होणार? बंगालमध्ये भाजप नेते कैलाश विजयवर्गीय यांचं मोठं विधान

पश्चिम बंगालच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपचे सरचिटणीस कैलाश विजयवर्गीय (Kailash Vijayvargiya) यांनी नागरिकत्व दुरुस्ती कायद्याबाबत (CAA) मोठं विधान केलं आहे.

देशात CAA कधी लागू होणार? बंगालमध्ये भाजप नेते कैलाश विजयवर्गीय यांचं मोठं विधान
Follow us
| Updated on: Dec 06, 2020 | 4:27 PM

कोलकाता : पश्चिम बंगालच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपचे सरचिटणीस कैलाश विजयवर्गीय (Kailash Vijayvargiya) यांनी नागरिकत्व दुरुस्ती कायद्याबाबत (CAA) मोठं विधान केलं आहे. मोदी सरकार पुढील वर्षीच्या सुरुवातीपासून बांगलादेश आणि पाकिस्तानमधून आलेल्या निर्वासितांना भारताचं नागरिकत्व देण्यास सुरुवात करु शकतं, असं मत कैलाश विजयवर्गीय यांनी व्यक्त केलं होतं. याआधी विजयवर्गीय यांनी सीएए बंगालमध्ये नक्कीच लागू केला जाईल, असंही म्हटलं होतं (Kailash Vijayvargiya says CAA likely to be implemented from january 2021).

कैलाश विजयवर्गीय म्हणाले, “नागरिकत्व दुरुस्ती कायद्यानुसार (Citizenship Amendment Act) निर्वासितांना भारताचं नागरिकत्व देण्याचं काम पुढील वर्षी जानेवारीपासून सुरु होऊ शकतं. सरकारने स्वच्छ मनाने निर्वासितांना नागरिकत्व देण्याचा निर्णय घेतला होता.” ते पश्चिम बंगालमधील ‘और अन्याय नहीं’ या भाजपच्या कॅम्पेनमध्ये बोलत होते.

आगामी पश्चिम बंगाल निवडणुकीसाठी भाजपकडून मोर्चेबांधणी

भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस कैलाश विजयवर्गीय यांनी मागील महिन्यात म्हटलं होतं, “बिहार निवडणुकीतील विजयानंतर आता भाजपचं लक्ष्य पश्चिम बंगालवर आहे. बंगालची विधानसभा निवडणूक एप्रिल-मे 2021 मध्ये होण्याची शक्यता आहे. यावेळी भाजपने पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुकीत 200 पेक्षा अधिक जागा जिंकणार असल्याचा दावा केलाय.

तृणमूल काँग्रेसने मात्र भाजपच्या पश्चिम बंगालमधील 200 पेक्षा अधिक जागा जिंकण्याच्या दाव्याची खिल्ली उडवली आहे. तृणमूल काँग्रेसचे खासदार सौगत रॉय म्हणाले होते, “पश्चिम बंगालमध्ये सत्तेत येण्याचा भाजपचा दावा म्हणजे त्यांचा काल्पनिक आनंद आहे. या निवडणुकीत बहुतांश जागांवर भाजपच्या उमेदवारांचं डिपॉझिट जप्त होईल.”

संबंधित बातम्या :

आमच्या पश्चिम बंगाल आणि महाराष्ट्रातही जागा वाढतील : अमित शाह

केंद्राच्या योजनांवर ममता सरकारची अंमलबजावणी नाही, मोदी म्हणतात…

प. बंगालमध्ये केंद्रीय मंत्री बाबुल सुप्रियोंवर हल्ला, विद्यार्थ्यांकडून धक्काबुक्की

Kailash Vijayvargiya says CAA likely to be implemented from january 2021

ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर
ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर.
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला.
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?.
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?.
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप.
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.