Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मी माफी कशाला मागू? राहुल गांधींच्या नाराजीनंतर कमलनाथांचा प्रतिप्रश्न

कमलनाथ यांनी आपल्या 'आयटम' या आक्षेपार्ह टिप्पणीवर माफी मागण्यास नकार दिला असून उलट 'मी माफी का मागू?' असा प्रतिप्रश्न केला आहे.

मी माफी कशाला मागू? राहुल गांधींच्या नाराजीनंतर कमलनाथांचा प्रतिप्रश्न
Follow us
| Updated on: Oct 20, 2020 | 6:20 PM

भोपाळ : मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री कमलनाथ (kamal Nath) यांनी भाजपच्या इमरती देवी यांच्याबद्दल आक्षेपार्ह विधान केल्यानंतर मध्य प्रदेशातील राजकारण चांगलंच तापलं आहे. भाजप नेत्या इमरती देवी यांच्याविषयी बोलताना त्यांनी ‘आयटम’ हा शब्दप्रयोग केला होता. काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनीदेखील कमलनाथ यांच्या वक्तव्यावर नाराजी व्यक्त केली असून त्यांची भाषा आवडली नसल्यांच म्हटलं आहे. असं असलं तरी कमलनाथ यांनी आपल्या ‘आयटम’ या टिप्पणीवर माफी मागण्यास नकार दिला असून उलट ‘मी माफी का मागू?’ असा प्रतिप्रश्न केला आहे. (kamal Nath refused to apologize for offensive remarks on bjp female candidate asked Why should I apologize?)

मी माफी का मागू ?- कमलनाथ

कमलनाथ यांचं वक्तव्य मला वैयक्तिक पातळीवर आवडलं नाही, असं राहुल गांधी म्हणाले होते. त्यानंतर कमलनाथ यांनी राहुल गांधींच्या वक्तव्यावर स्पष्टीकरण दिलं आहे. “राहुल गांधी जे म्हणाले ती त्यांची वैयक्तिक भूमिका आहे. मी माझ्या  त्या वक्तव्यावर या आधीच सविस्तर स्पष्टीकरण दिलेलं आहे. माझा कुणाचा अपमान करण्याचा उद्देश नव्हता. त्यामुळे मी माफी का मागू ? कुणाला वाईट वाटले असेल तर त्याबद्दल मी याआधीच दिलगिरी व्यक्त केली आहे.”

राहुल गांधी कमलनाथ यांच्या वक्तव्यावर काय म्हणाले ?

राहुल गांधी यांनी कमलनाथ यांच्या वक्तव्यावर जाहीर नाराजी व्यक्त केली. ते म्हणाले, “कमालनाथ माझ्या पक्षाचे आहेत. पण वैयक्तिक पातळीवर मला त्यांचे वक्तव्य आवडले नाही. काहीजरी झालं तरी कमलनाथ यांचं बोलणं दुर्दैवी असून त्यांच्या वक्तव्याशी मी असहमत आहे.”

कमलनाथ काय म्हणाले होते?

मध्य प्रदेशच्या डबरा मतदारसंघात काँग्रेसकडून सुरेंद्र राजेश उमेदवार आहेत. त्यांच्या प्रचारासाठी आले असताना कमलनाथ बोलत होते. ते म्हणाले, “‘सुरेंद्र राजेश आमचे उमेदवार आहेत. ते सरळ साध्या स्वभावाचे आहेत. ते त्यांच्यासारखे नाहीत, काय आहे त्यांचं नाव? मी त्यांचं काय नाव घेऊ, तुम्ही तर त्यांना माझ्यापेक्षा चांगलं ओळखता. तुम्ही तर मला आधीच सावध करायला हवं होतं, ‘काय आयटम आहे’.” मध्य प्रदेशात विधानसभेच्या पोटनिवडणुका होणार आहेत. या पार्श्वभूमीवर कमलनाथ यांच्या या वक्तव्यामुळे तिथं वातावरण चांगलंच तापलं आहे.

संबंधित बातम्या :

आक्षेपार्ह वक्तव्याबद्दल कमलनाथ यांची अखेर दिलगिरी, राष्ट्रीय महिला आयोगाकडून मात्र नोटीस

एक नेता ‘टंच माल’, तर दुसरा ‘आयटम’ म्हणतोय, गांधी कुटुंब आता गप्प का? : स्मृती इराणी

इमरती देवींचं नाव आठवलं नाही म्हणून ‘आयटम’ बोललो- कमलनाथ

(kamal Nath refused to apologize for offensive remarks on bjp female candidate asked Why should I apologize?)

कुणाल कामराला अटक पूर्व जमीन मंजूर, मद्रास हाय कोर्टाचा दिलासा
कुणाल कामराला अटक पूर्व जमीन मंजूर, मद्रास हाय कोर्टाचा दिलासा.
केवळ दशक नाही, तर लोकांचं आयुष्य बदललंय - पंतप्रधान नरेंद्र मोदी
केवळ दशक नाही, तर लोकांचं आयुष्य बदललंय - पंतप्रधान नरेंद्र मोदी.
बावनकुळे - राऊत यांच्यात जुंपली; वार पालटवाराचं शाब्दिक युद्धं
बावनकुळे - राऊत यांच्यात जुंपली; वार पालटवाराचं शाब्दिक युद्धं.
आमचं सरकार टॅक्सच्या पै पैचा सन्मान करतं - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आमचं सरकार टॅक्सच्या पै पैचा सन्मान करतं - पंतप्रधान नरेंद्र मोदी.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशाच्या प्रगतीचा घेतला आढावा
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशाच्या प्रगतीचा घेतला आढावा.
भारत जगातील एकमेव मेजर इकोनॉमी, मोदींनी देशाच्या प्रगतीचा घेतला आढावा
भारत जगातील एकमेव मेजर इकोनॉमी, मोदींनी देशाच्या प्रगतीचा घेतला आढावा.
न्यायालयाच्या आवारात कोरटकरवर शिव्यांची लाखोली
न्यायालयाच्या आवारात कोरटकरवर शिव्यांची लाखोली.
'तर हे कटाक्षाने पाळावं लागेल',ठाकरे गटाकडून 'तो' जुना व्हिडीओ व्हायरल
'तर हे कटाक्षाने पाळावं लागेल',ठाकरे गटाकडून 'तो' जुना व्हिडीओ व्हायरल.
३१ तारखेच्या आत पीक कर्ज भरा; अजितदादांच्या शेतकऱ्यांना सूचना
३१ तारखेच्या आत पीक कर्ज भरा; अजितदादांच्या शेतकऱ्यांना सूचना.
'आकाच्या सांगण्यावरून..',आरोपींच्या कबुलीनंतर धसांची पहिली प्रतिक्रिया
'आकाच्या सांगण्यावरून..',आरोपींच्या कबुलीनंतर धसांची पहिली प्रतिक्रिया.