AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Kangana on Sushant Suicide | इंडस्ट्रीतील कंपूशाहीने सुशांतचा बळी घेतला, कंगनाचा बॉलिवूडवर संताप

स्वबळावर नाव कमावणाऱ्या कलाकारांना यशापासून दूर ठेवण्यासाठी इंडस्ट्रीमध्ये षडयंत्र रचलं जातं, असा आरोप कंगना रणावतने केला आहे.

Kangana on Sushant Suicide | इंडस्ट्रीतील कंपूशाहीने सुशांतचा बळी घेतला, कंगनाचा बॉलिवूडवर संताप
Follow us
| Updated on: Jun 15, 2020 | 5:16 PM

मुंबई : बॉलिवूड स्टार सुशांत सिंह राजपूतच्या (Kangana Ranaut on Sushant Singh Rajput Suicide) आत्महत्येनंतर बॉलिवूड इंडस्ट्रीतील अनेक गोष्टी समोर येत आहेत. अभिनेत्री कंगना राणावतने बॉलिवूडवर अनेक गंभीर आरोप केले आहेत. स्वबळावर नाव कमावणाऱ्या कलाकारांना यशापासून दूर ठेवण्यासाठी इंडस्ट्रीमध्ये षडयंत्र रचलं जातं, इंडस्ट्रीतल्या कंपूशाहीने (नेपोटिझम) सुशांतला आत्महत्या करण्यास भाग पाडलं, असा घणाघात (Kangana Ranaut on Sushant Singh Rajput Suicide) कंगनाने केला.

कंगनाने एक व्हिडीओ पोस्ट करत बॉलिवूडमधील कंपूशाहीवर (नेपोटिझम) निशाणा साधला. कंगना म्हणाली, “सुशांतसिंह राजपूतच्या मृत्यूने सर्वांना हादरा बसला आहे. पण काही जण तो मानसिकदृष्ट्या कमकुवत असल्याचं सिद्ध करण्याचा प्रयत्न करत आहेत. ज्या व्यक्तीने स्टॅनफोर्ड विद्यापीठाची स्कॉलरशीप घेतली आहे. जो इंजिनिअरिंगमध्ये रॅन्क होल्डर आहे, त्याचं मानसिक संतुलन बिघडलेलं कसं असू शकतं? गेल्या काही दिवसातील त्याच्या पोस्ट पाहिल्या, तर हे दिसून येतं की तो सर्वांना विनवणी करतोय, माझे सिनेमे पाहा, माझा कोणी गॉडफादर नाही, मला या इंडस्ट्रीतून काढून टाकतील. त्याने त्याच्या मुलाखतींमध्येही हे वारंवार सांगितलं आहे की, ही इंडस्ट्री मला स्वीकारत का नाही? मला एकटं पडल्यासारखं वाटतं… हा या दुर्घटनेचा पाया नाही?”

“6-7 वर्षांच्या करिअरमध्ये त्याच्या ‘काय पो छे’ सारख्या सिनेमाला त्याच्या पदार्पणाला कुठल्याही प्रकारची पोचपावती का नाही, कुठला अवॉर्ड का नाही मिळाला?, केदारनाथ, एम. एस. धोनी किंवा छिछोरे सारख्या सिनेमांना अवॉर्ड नाही, गल्ली बॉय सारख्या सिनेमाला अवॉर्ड मिळतो मग छिछोरेला का नाही”, असा सवाल कंगनाने उपस्थित केला (Kangana Ranaut on Sushant Singh Rajput Suicide).

“आम्हाला तुमचं काही नको, तुमचे सिनेमे नको, पण जे आम्ही करतो तुम्ही ते का नाही पाहात. मी ज्या सिनेमांचं दिग्दर्शन केलं, त्या सिनेमांना यांनी फ्लॉप ठरवलं, माझ्यावर 6 खटले का चालवण्यात आले, मला तुरुंगात पाठवण्याचा प्रयत्न का केला गेला”, असंही ती म्हणाली.

“काही पत्रकार सुशांत सिंह राजपूतला मनोरुग्ण ठरवत आहेत. त्यांना संजय दत्तचं व्यसन तर तुम्हाला क्युट वाटतं. हेच पत्रकार मला मेसेज करतात की, तुझा खूप वाईट काळ सुरु आहे, तू कुठलं चुकीचा निर्णय नको घेऊस, असं का म्हणतात हे. हे का माझ्या डोक्यात या गोष्टी भरु इच्छितात की मी आत्महत्या करायला हवी. मग ही आत्महत्या होती की खून”, असा आरोप कंगनाने केला आहे.

सुशांतची चूक ही होती की त्याने या लोकांचं म्हणणं ऐकलं. त्यांनी म्हटलं ही तु वर्थलेस आहेत आणि त्याने ते मानलं. तो त्याच्या आईचं म्हणणं विसरला. या लोकांना इतिहास लिहायचा आहे, त्यांना हेच सिद्ध करायचं आहे की सुशांतचं मानसिक संतुलन बिघडलेलं होतं, ते हे नाही सांगणार की खरं काय आहे. पण, आम्हाला हा निर्णय घ्यायचा आहे की इतिहास कोण लिहिणार”, असंही ती म्हणाली (Kangana Ranaut on Sushant Singh Rajput Suicide).

संबंधित बातम्या :

Sushant Singh Rajput Suicide : आभासी आवाजही ऐकू यायचे, घाबरलेली मैत्रीण निघून गेली, सुशांतसोबत काय काय घडलं?

Sushant Singh Rajput | मैत्रिणीसोबत तणावाचे संबंध, सुशांतसिंह राजपूतच्या नोकराचा दावा

Sushant Singh Rajput Funeral | सुशांतसिंह राजपूत अनंतात विलीन, तुफान पावसात वडिलांकडून मुखाग्नी

“का? का? का?” सुशांतच्या आत्महत्येचे कोडे अनाकलनीय, महानायकही गहिवरले

आमची मध्यस्थी, भारत-पाकचा वाद अमेरिकेने मिटवला,ट्रम्प यांचा पुनरूच्चार
आमची मध्यस्थी, भारत-पाकचा वाद अमेरिकेने मिटवला,ट्रम्प यांचा पुनरूच्चार.
मुंबईचा पहिला केबल-स्टे उड्डाणपूल वाहतुकीसाठी खुला
मुंबईचा पहिला केबल-स्टे उड्डाणपूल वाहतुकीसाठी खुला.
भारतानं कबरडं मोडलं पाकिस्तान वठणीवर, संरक्षण मंत्र्याचं मोठं वक्तव्य
भारतानं कबरडं मोडलं पाकिस्तान वठणीवर, संरक्षण मंत्र्याचं मोठं वक्तव्य.
ऑपरेशन सिंदूरमुळे पाकिस्तानचं मोठं नुकसान
ऑपरेशन सिंदूरमुळे पाकिस्तानचं मोठं नुकसान.
चीनविरोधात मोठी भारताची अ‍ॅक्शन, तणावादरम्यान खोटा प्रचार करणं भोवलं
चीनविरोधात मोठी भारताची अ‍ॅक्शन, तणावादरम्यान खोटा प्रचार करणं भोवलं.
आयकर विभागाची विदर्भात मोठी कारवाई; सोनं-चांदीच्या दुकानांवर धाडसत्र
आयकर विभागाची विदर्भात मोठी कारवाई; सोनं-चांदीच्या दुकानांवर धाडसत्र.
जोरदार वारा, पावसाचा तडाखा; फळबागांना नुकसान
जोरदार वारा, पावसाचा तडाखा; फळबागांना नुकसान.
मराठी दाम्पत्यानं घातला डिलिव्हरी बॉय सोबत वाद, भांडूपमधला बघा VIDEO
मराठी दाम्पत्यानं घातला डिलिव्हरी बॉय सोबत वाद, भांडूपमधला बघा VIDEO.
सचिन अहीर पवारांच्या भेटीला अन् एकाच गाडीतून प्रवास, काय झाली चर्चा?
सचिन अहीर पवारांच्या भेटीला अन् एकाच गाडीतून प्रवास, काय झाली चर्चा?.
केंद्रीय कॅबिनेट बैठकीत ऑपरेशन सिंदूरवर चर्चा, सुत्रांची माहिती
केंद्रीय कॅबिनेट बैठकीत ऑपरेशन सिंदूरवर चर्चा, सुत्रांची माहिती.