Kangana Ranaut | मोठ्या ब्रेकनंतर कंगना पुन्हा सेटवर, ‘थलायवी’च्या चित्रीकरणाला सुरुवात
कोरोना लॉकडाऊनमध्ये मनालीच्या घरी सुट्टी एन्जॉय करणाऱ्या कंगनाने (Kangana Ranaut) चित्रीकरणासाठी सेटवर परतत असल्याची बातमी ट्विटरद्वारे आपल्या चाह्त्यांसोबत शेअर केली आहे.
मुंबई : कोरोना लॉकडाऊनच्या काळात अनेक बॉलिवूड चित्रपटांचे चित्रीकरण (Shooting) रखडले होते. कलाकारदेखील कोरोनाच्या भीतीने चित्रीकरण टाळत होते. मात्र, आता अनलॉक सुरू झाल्यांनतर परिस्थिती पूर्वपदावर येताना दिसत असून अनेक कलाकारांनी चित्रीकरणाला सुरुवात केली आहे. अभिनेत्री कंगना रनौतदेखील (Kangana Ranaut) सात महिन्यांच्या ब्रेकनंतर ‘थलायावी’च्या (Thalaivi) सेटवर परतली आहे (Kangana Ranaut returned on thalaivi set for shooting).
लॉकडाऊनमध्ये मनालीच्या घरी सुट्टी एन्जॉय करणाऱ्या कंगनाने (Kangana Ranaut) चित्रीकरणासाठी सेटवर परतत असल्याची बातमी ट्विटरद्वारे आपल्या चाह्त्यांसोबत शेअर केली आहे. ‘प्रिय मित्रांनो, आजचा दिवस खूप खास आहे, 7 महिन्यांनंतर पुन्हा काम करणार आहे, माझा मोठा प्रोजेक्ट ‘थलायवी’साठी (Thalaivi) दक्षिण भारतात जात आहे. महामारीच्या काळात तुमच्या प्रार्थनांची आवश्यकता आहे. मी काही सेल्फी शेअर करत आहे, आशा आहे की तुम्हाला आवडतील’, असे ट्विट करत कंगनाने (Kangana Ranaut) काही खास फोटो शेअर केले आहेत.
Dear friends today is a very special day, resuming work after 7 months, travelling to southern India for my most ambitious bilingual project THALAIVI, need your blessings in these testing times of a pandemic. P.S just clicked these morning selfies hope you all like them ❤️ pic.twitter.com/drptQUzvXK
— Kangana Ranaut (@KanganaTeam) October 1, 2020
तामिळनाडूच्या माजी मुख्यमंत्री जयललिता यांच्या जीवन कथेवर चित्रपट
‘थलायवी’ (Thalaivi) हा चित्रपट तमिळनाडूच्या माजी मुख्यमंत्री जयललिता यांच्या जीवनावर आधारित आहे. हा चित्रपट हिंदी, तामिळ आणि तेलुगू भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात कंगना जयललितांच्या भूमिका साकारणार आहे. या भूमिकेसाठी कंगनाने तब्बल 20 किलो वजन वाढवले होते. (Kangana Ranaut returned on thalaivi set for shooting)
कोरोनामुळे प्रदर्शन लांबणीवर
ए.एल. विजय दिग्दर्शित ‘थलायवी’ हा चित्रपट 26 जून 2020ला प्रदर्शित होणार होता. मात्र, कोरोना लॉकडाऊनमुळे जनजीवन ठप्प झाल्याने, चित्रपटाचे चित्रीकरण (Shooting) वेळेवर पूर्ण होऊ शकले नाही. या चित्रपटाचे काही चित्रीकरण अद्याप बाकी आहे. तब्बल 7 महिन्यांनंतर आता चित्रीकरणाला सुरुवात झाली आहे. चित्रीकरण संपल्यानंतर या चित्रपटाच्या प्रदर्शनाची नवी तारीख जाहीर करण्यात येणार आहे.
कोरोनामुळे हा चित्रपट ओटीटीवर प्रदर्शित होणार, असे म्हटले जात होते. मात्र, चित्रपट निर्मात्यांनी हा चित्रपट डिजिटली प्रदर्शित होणार नसल्याचे जाहीर केले. त्यामुळे आता चित्रपटगृह सुरू होईपर्यंत या चित्रपटाच्या प्रदर्शनाची वाट पाहायला लागणार आहे.(Kangana Ranaut returned on thalaivi set for shooting)
कंगनाच्या आणखी दोन चित्रपटांची प्रतीक्षा
राम मंदिराच्या पार्श्वभूमीवर कंगनाने ‘अपराजित अयोध्या’ या चित्रपटाची घोषणा केली होती. कंगना स्वतः या चित्रपटाची निर्मिती करणार असून, दिग्दर्शनही सांभाळणार आहे. अयोध्येच्या राम मंदिरावर आधारित हा चित्रपट असणार आहे. याशिवाय ‘तेजस’ या आगामी चित्रपटात कंगना (Kangana Ranaut) हवाईदलातील अधिकाऱ्याच्या भूमिकेत झळकणार आहे. तिने या चित्रपटातील तिच्या लूकचे फोटो सोशल मीडियावरून शेअर केले होते.
(Kangana Ranaut returned on thalaivi set for shooting)
संबंधित बातम्या :
Kangana Ranaut | मी वाद सुरु करत नाही, संपवते : कंगना रनौत
उर्मिला मातोंडकर अभिनयासाठी नाही सॉफ्ट पॉर्नसाठी परिचित” कंगनाची जीभ घसरली
मी क्षत्रीय, शीर धडावेगळं झालं तरी चालेल, पण ते कधीही झुकणार नाही : कंगना रनौत