मुंबई : अभिनेत्री कंगना रनौत (Kangana Rranaut) ही सुरुवातीपासूनच तिच्या सुस्पष्ट शैलीसाठी चाहत्यांमध्ये प्रसिद्ध आहे. कंगनानं आपल्या बिनधास्त अभिनयानं सर्वांना वेड लावलं आहे. सध्या कंगना कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. दरम्यान, बॉलिवूडच्या राणीनं तिचा एक खास व्हिडीओ चाहत्यांसाठी इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे.
नुकतंच कंगनाला ट्विटरवर ब्लॉक केलं गेलं, त्यानंतर आता ती इन्स्टाग्रामवर प्रचंड अॅक्टिव असते. ती दररोज आपले खास फोटो आणि व्हिडीओ इन्स्टाग्रामवर शेअर करत असते, तिच्या या फोटो आणि व्हिडीओला चाहत्यांचीही खूप पसंती मिळते. आता तिनं असा व्हिडीओ शेअर केला आहे, जो पाहून चाहत्यांना मणिकर्णिका चित्रपट आठवला.
कंगनानं शेअर केला खास व्हिडीओ
नुकतंच कंगना रनौतनं तिचा घोडेस्वारीचा व्हिडीओ इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये ती अतिशय स्टाईलिश अंदाजात घोड्यावर स्वार होताना दिसत आहे. व्हिडीओमध्ये तिनं नारंगी रंगाचा टी-शर्ट आणि ब्लॅक ट्राऊझर परिधान केला आहे.
हा सुंदर व्हिडीओ शेअर करत तिनं लिहिलं आहे की आज सकाळी हॉर्स राइडिंग… दुसरीकडे तिनं मणिकर्णिकाच्या चाहत्यांना आठवण करून दिली आहे. तिनं चित्रपटात घोडेस्वारी केल्याचे सिन होते. मात्र त्यानंतर असे काही फोटो समोर आले होते ज्यामध्ये हे स्पष्ट झालं होतं की कंगना या चित्रपटात खऱ्या घोड्याचा वापर केला नव्हता.
पाहा व्हिडीओ (See Video)
हे समोर आल्यानंतर काही नेटकऱ्यांनी कंगनाला खूप ट्रोल केलं होतं. मात्र आता या व्हिडीओद्वारे अभिनेत्रीनं सर्वांना प्रत्युत्तर दिलं आहे. तर नेटकऱ्यांना तिचा हा अंदाज खूप आवडला आहे. एका चाहत्यानं म्हटलं आहे की ‘खरी झांसी की राणी.’
नुकतंच कंगनानं तिच्या इन्स्टाग्राम स्टेटसवर बिकीनीमधील फोटो शेअर करून स्वत:ला एक हॉट म्हटले होतं. कंगनाची हा अंदाजही प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला होता. खरं तर चाहते अनेकदा कंगनाला संघी किंवा भाजपा फेम असं म्हणतात.
संबंधित बातम्या