Karad South vidhansabha Election Result : कराड दक्षिण मधून माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचा पराभव

Karad South Election Results 2024 : महाराष्ट्रातील विधानसभेचे निकाल धक्कादायक म्हटले जात आहे. ही निवडणूक अटीतटीची होईल असे सुरुवातीपासून म्हटले जात होते. परंतू अखेर सर्व आडाखे खोटे ठरवित महायुती बहुमताच्या पुढे गेलेली आहे.

Karad South vidhansabha Election Result : कराड दक्षिण मधून माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचा पराभव
Follow us
| Updated on: Nov 23, 2024 | 2:46 PM

महाराष्ट्रात विधानसभेच्या निवडणूकाचे निकाल सुरु झाले आहेत. निकालात महायुतीने स्पष्ट बहुमताच्या दिशेने चालली आहे. या विधानसभेच्या निकालात महायुतीला चांगली आघाडी मिळालेली आहे. भाजपाच्या १३० जागांवर उमेदवार मतमोजणीत पुढे आहेत. तर एकनाथ शिंदे यांची शिवसेना ५५ जागांवर आघाडीवर आहे. तर अजितदादांची राष्ट्रवादी ४० जागांवर आघाडीवर आहे. भाजपाचे सहा उमेदवार विजयी झाले आहेत. तर एकनाथ शिंदे गटाचे तीन उमेदवार विजयी झाले आहेत. तर अजितदादा गटाचे २ उमेदवार विजयी झाले आहेत. कराड दक्षिण मतदार संघातून धक्कादायक निकाल आलेला आहे. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचा पराभव झालेला आहे.

कराड दक्षिण विधानसभा मतदार संघात कॉंग्रेसचे उमेदवार माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचा पराभव झालेला आहे. त्याच्या विरोधात भाजपाचे अतुल भोसले निवडणूक लढवित होते. अतुल भोसले मतमोजणी सुरु झाल्यापासून सुरुवातीपासून आघाडीवर होते. कराड दक्षिण विधानसभा मतदार संघात कायम कॉंग्रेसचा प्रभाव राहिलेला आहे. येथून सात वेळा कॉंग्रेसचा विजय झालेला होता.

हे सुद्धा वाचा

अकराव्या राऊंडनंतरही पिछाडी

अकराव्या राऊंड नंतर देखील भाजपाचे अतुल भोसले १६,५७३ मतांनी कॉंग्रेसच्या पृथ्वीराज चव्हाण यांच्या पासून पुढे होते. अखेर पृथ्वीराज चव्हाण यांचा पराभव झालेला आहे. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री असलेल्या पृथ्वीराज चव्हाण यांचा अशा प्रकारे धक्कादायक पराभव झाल्याने कॉंग्रेसला मोठा धक्का बसल्याचे म्हटले जात आहे.

'विरोधीपक्षनेता बनवता येत नाही, त्यांनी CM पदावर बोलू नये'- उदय सामंत
'विरोधीपक्षनेता बनवता येत नाही, त्यांनी CM पदावर बोलू नये'- उदय सामंत.
नागराज मंजुळे अडचणीत, न्यायालयानं बजावलं समन्स, प्रकरण नेमकं काय?
नागराज मंजुळे अडचणीत, न्यायालयानं बजावलं समन्स, प्रकरण नेमकं काय?.
बॅलेट पेपरवर निवडणुका नाहीच, कोर्टाचा थेट नकार, 'ती' याचिका फेटाळली
बॅलेट पेपरवर निवडणुका नाहीच, कोर्टाचा थेट नकार, 'ती' याचिका फेटाळली.
'ठाकरेंची अवस्था शोलेतील असरानी सारखी...',भाजपच्या बड्या नेत्याची टीका
'ठाकरेंची अवस्था शोलेतील असरानी सारखी...',भाजपच्या बड्या नेत्याची टीका.
'शरद पवार नावाचा अध्याय राजकारणातून संपला', भाजप नेत्याचा निशाणा
'शरद पवार नावाचा अध्याय राजकारणातून संपला', भाजप नेत्याचा निशाणा.
शरद पवार गटाच्या बैठकीत विधानसभेच्या निकालावर नाराजी, EVM विरोधात रोष
शरद पवार गटाच्या बैठकीत विधानसभेच्या निकालावर नाराजी, EVM विरोधात रोष.
'मुख्यमंत्रिपदासाठी कोणाचं नाव...', संजय शिरसाटांची मोठी प्रतिक्रिया
'मुख्यमंत्रिपदासाठी कोणाचं नाव...', संजय शिरसाटांची मोठी प्रतिक्रिया.
नवा CM कोण? उत्सुकता शिगेला, 'रामगिरी'वर पुन्हा शिंदेंच्या नावाची पाटी
नवा CM कोण? उत्सुकता शिगेला, 'रामगिरी'वर पुन्हा शिंदेंच्या नावाची पाटी.
शिंदेंची नाराजी दूर व्हावी म्हणून भाजपची खेळी, आठवलेंचं वक्तव्य अन्...
शिंदेंची नाराजी दूर व्हावी म्हणून भाजपची खेळी, आठवलेंचं वक्तव्य अन्....
नव्या सरकारचा शपथविधी कधी? नवा CM कोण? भाजपचा बडा नेता म्हणाला...
नव्या सरकारचा शपथविधी कधी? नवा CM कोण? भाजपचा बडा नेता म्हणाला....