अतिक्रमणधारकांवर दंडात्मक कारवाई होणार, कल्याण-डोंबिवलीतील सर्व रस्ते मोकळे करणार : केडीएमसी आयुक्त

केडीएमसीकडून 1 नोव्हेंबरपासून अतिक्रमण हटविण्याची धडक कारवाई सुरु केली जाणार आहे, अशी माहिती सुर्यवंशी यांनी दिली (KDMC commissioner Vijay Suryawanshi warn hawker).

अतिक्रमणधारकांवर दंडात्मक कारवाई होणार, कल्याण-डोंबिवलीतील सर्व रस्ते मोकळे करणार : केडीएमसी आयुक्त
Follow us
| Updated on: Oct 29, 2020 | 10:27 PM

ठाणे : कल्याण-डोंबिवली शहरातील फुटपाथवर असलेलं अतिक्रमण लवकरात लवकर काढा, अन्यथा कायदेशीररीत्या अतिक्रमण काढणारच आणि दंडात्मक कारवाईदेखील करणार, असा इशारा केडीएमसी आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी दुकानदारांसह फुटपाथवर अतिक्रमण करणाऱ्यांना दिला आहे. केडीएमसीकडून 1 नोव्हेंबरपासून अतिक्रमण हटविण्याची धडक कारवाई सुरु केली जाणार आहे, अशी माहिती सुर्यवंशी यांनी दिली (KDMC commissioner Vijay Suryawanshi warn hawker).

कल्याण-डोंबिवली महापालिका क्षेत्रात वाहतूक कोंडी आणि फेरीवाल्यांमुळे रस्त्यावर नागरीक चालू शकत नाहीत. फुटपाथवर दुकानदारांनी अतिक्रमण केले आहे. तर काही ठिकाणी फेरीवाल्यांनी फुटपाथवर ताबा मिळवला आहे (KDMC commissioner Vijay Suryawanshi warn hawker).

शहरातील मुख्य रस्ते विशेष म्हणजे डोंबिवली आणि कल्याण स्टेशन परिसरात रिक्षा चालक बेशिस्तपणे रिक्षा उभी करतात. फेरीवाले फुटपाथवर बसतात. जो फूटपाथ शिल्लक राहतो त्यावर दुकानदार त्यांच्या दुकानातील साहित्य आणि बोर्ड मांडून ठेवतात. त्यामुळे नागरिकांना चालण्यास त्रास होतो. विशेष करुन महिलांना जास्त त्रास सहन करावा लागतो. त्यामुळे अनेकदा वादही झाला आहे.

आता केडीएमसी आयुक्त विजय सूर्यवंशी यांनी याबाबत घोषणा केली आहे.  “1 नोव्हेंबरपासून महापालिकेकडून विशेष मोहिम राबविली जाणार आहे. या मोहिमेअंतर्गत शहरातील फुटपाथ नागरिकांसाठी मोकळे केले जाणार आहेत. सर्व दुकानदारांनी आणि ज्यांनी अतिक्रमण केले आहे त्यांनी स्वत:हून अतिक्रमण काढावे. महापालिका 1 तारखेपासून अतिक्रमण काढले जाईल. तसेच दंडात्मक कारवाई केली जाईल”, असं  विजय सुर्यवंशी यांनी सांगितलं.

हेही वाचा : कल्याण-डोंबिवलीत विकास कामं रखडली, भाजप नगरसेवकांचं पालिका मुख्यालयात ठिय्या आंदोलन

18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.