Sushant Singh Rajput | केदारनाथ फेम दिग्दर्शकाचा नवा सिनेमा, सुशांतऐवजी ‘या’ अभिनेत्याची वर्णी

दिग्दर्शक अभिषेक कपूर याने नुकताच आपला नवीन चित्रपट चंडीगढ़ करे आशिकीची घोषणा केली आहे. या चित्रपटात आयुष्मान खुराना आणि वाणी कपूर दिसणार आहेत.

Sushant Singh Rajput | केदारनाथ फेम दिग्दर्शकाचा नवा सिनेमा, सुशांतऐवजी 'या' अभिनेत्याची वर्णी
Follow us
| Updated on: Oct 27, 2020 | 4:19 PM

नवी दिल्ली : दिग्दर्शक अभिषेक कपूर याने नुकताच आपला नवीन चित्रपट चंडीगढ़ करे आशिकीची घोषणा केली आहे. या चित्रपटात आयुष्मान खुराना आणि वाणी कपूर दिसणार आहेत. आयुष्मान खुरानाने इंस्टाग्रामवर आपले, वाणी कपूर आणि अभिषेक कपूरचे फोटो शेअर केले आणि चाहत्यांना आगामी चित्रपटाविषयी सांगितले आहे. मात्र, या चित्रपटामध्ये आयुष्मान खुरानाच्या अगोदर सुशांतसिंग राजपूत काम करणार होता. (kedarnath’ film director’s new movie Chandigarh kare aashiqu)

चंडीगढ़ करे आशिकी चित्रपटात सुशांतसिंग राजपूत साकारणार होता भूमिका स्पॉटबॉयच्या वृत्तानुसार अभिषेक कपूर केदारनाथ चित्रपटानंतर सुशांतसिंग राजपूतला चंडीगढ़ करे आशिकी या चित्रपटासाठी घेणार होता. तसे सुशांत आणि अभिषेकमध्ये बोलणेही झाल्याचे समजते. पण कदाचित नशिबाला आणखी काहीतरी वेगळेच मंजूर होते. आता चंदीगड करे आशिकी चित्रपटात सुशांतच्या जागी आयुष्मान खुराना काम करणार आहे. या चित्रपटात आयुष्मान पहिल्यांदा वाणी कपूरसोबत काम करताना दिसणार आहे. हा चित्रपट 2021 मध्ये प्रदर्शित होईल. अभिषेकच्या काई पो छे या चित्रपटातून सुशांतने बॉलिवूडमध्ये एन्ट्री केली होती. हा चित्रपट हिट झाला होता. यानंतर हे दोघेही केदारनाथमध्ये एकत्र दिसले. केदारनाथमध्ये सुशांतसिंह राजपूत सोबत अभिनेत्री सारा अली खान होती. केदारनाथ चित्रपटातुनच अभिनेत्री सारा अली खानने चित्रपट इंडस्ट्रीमध्ये पदार्पण केले. सुशांत सिंह राजपूत याने 14 जून 2020 रोजी मुंबईतील वांद्रे इथल्या राहत्या घरी गळफास घेत आत्महत्या केली. त्यामुळे पोलिसांनी आत्महत्येचा गुन्हा दाखल केला. मात्र, सुशांतच्या मृत्यूबाबत त्याच्या कुटुंबाने आक्षेप नोंदवला होता. त्यामुळे पोलिसांनी याबाबत तपास सुरु केला होता. आता पुढे सीबीआय तपात करत आहे. सुशांतचा प्रवास स्टार प्लसवर ‘किस देश मे है मेरा दिल’ मालिकेतून 2008 मध्ये टीव्ही क्षेत्रात पदार्पण केलं होतं. त्यानंतर झी टीव्हीवर ‘पवित्र रिश्ता’ मालिका प्रचंड गाजली होती.पवित्र रिश्ता मालिकेतील सहअभिनेत्री अंकिता लोखंडे सोबत सुशांतची जोडी अत्यंत लोकप्रिय ठरली होती. सुशांत आणि अंकिता काही वर्ष लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये होते. मात्र दोन वर्षांपूर्वी दोघं विभक्त झाले होते. 2013 मध्ये ‘काय पो छे’ चित्रपटातून सुशांतने बॉलिवूडमध्ये पाऊल ठेवलं. त्यानंतर शुद्ध देसी रोमान्स, डिटेक्टीव्ह ब्योमकेश बक्षी, पीके असे सिनेमे गाजले. एम एस धोनी चित्रपटात त्याने धोनीची भूमिका केली होती. या भूमिकेने तो यशोशिखरावर पोहोचला. नुकतेच त्याचे केदारनाथ, छिछोरे हे चित्रपट लोकप्रिय ठरले.

संबंधित बातम्या : 

SSR Case to CBI | मोदी-शाहांचे विश्वासू मनोज शशिधर यांच्या नेतृत्वात सुशांत प्रकरणी सीबीआय तपास, पथकात कोण-कोण?

SSR Case to CBI | सत्याचा विजय होतो, सीबीआय तपासाच्या निकालावर बॉलिवूड कलाकारांच्या प्रतिक्रिया

(kedarnath’ film director’s new movie Chandigarh kare aashiqu)

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.