‘शेरा’कडून सलमान खानला जीवे मारण्याची धमकी

मुंबई : बॉलिवूडचा ‘दबंग’ सलमान खान याला जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. धमकी देणाऱ्याला उत्तर प्रदेशातून अटक करण्यात आली आहे. मुंबईतील वांद्रे पोलिसांनी धमकी देणाऱ्याला उत्तर प्रदेशातील करेली येथून अटक केली. सलमान खानला जीवे मारण्याची धमकी देण्यामागचे कारण अद्याप कळू शकलेले नाही. मात्र, धमकी देणाऱ्यावर तातडीने अटकेची कारवाई करण्यात आली. सलमानला धमकी देणाऱ्याचे नाव […]

'शेरा'कडून सलमान खानला जीवे मारण्याची धमकी
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 5:00 PM

मुंबई : बॉलिवूडचा ‘दबंग’ सलमान खान याला जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. धमकी देणाऱ्याला उत्तर प्रदेशातून अटक करण्यात आली आहे. मुंबईतील वांद्रे पोलिसांनी धमकी देणाऱ्याला उत्तर प्रदेशातील करेली येथून अटक केली.

सलमान खानला जीवे मारण्याची धमकी देण्यामागचे कारण अद्याप कळू शकलेले नाही. मात्र, धमकी देणाऱ्यावर तातडीने अटकेची कारवाई करण्यात आली.

सलमानला धमकी देणाऱ्याचे नाव ‘शेरा’ असल्याचे कळते आहे. सलमानचा खासगी मोबाईल नंबर मिळवून शेरा आणि त्याच्या साथीदारांनी अश्लिल शिवीगाळ करत सलमानला जीवे मारण्याची धमकी दिली. याची तक्रार सलमानकडून वांद्रे पोलिस ठाण्यात करण्यात आली. त्यानंतर मुंबई पोलिसांनी आपली सूत्रं हलवली.

आरोपी शेराचा मोबाईल ट्रेस करण्यात आला. तो उत्तर प्रदेशातील करेलीत असल्याचं कळलं. त्यानंतर मुंबई पोलिसांनी तातडीने करेलीच्या पोलिसांशी संपर्क साधत, संपूर्ण प्रकार सांगितला आणि मुंबई पोलिसांनी तातडीने करेली गाठलं. जवळपास पाऊण तास करेली शोधमोहिम राबवल्यानंतर आरोपी शेरा मुंबई पोलिसांच्या हाती लागला. त्याला पोलिसांनी मुंबईला आणलं आहे.

या आरोपी शेराने सलमानला नेमकी शिवीगाळ आणि जीवे मारण्याची धमकी का दिली, याचा तपास सध्या मुंबई पोलिस करत आहेत.

Suresh Dhas : 'आरोपींचा तेरे नाम झाला पाहिजे', सुरेश धस यांचा आक्रोश
Suresh Dhas : 'आरोपींचा तेरे नाम झाला पाहिजे', सुरेश धस यांचा आक्रोश.
सुरेश धस अजितदादांच्या भेटीला, राजकीय घडामोडींना वेग; भेटीत काय चर्चा?
सुरेश धस अजितदादांच्या भेटीला, राजकीय घडामोडींना वेग; भेटीत काय चर्चा?.
'माझ्यापेक्षा जास्त अभ्यास असणाऱ्यांना...', पंकजा मुंडेंचं खोचक उत्तर
'माझ्यापेक्षा जास्त अभ्यास असणाऱ्यांना...', पंकजा मुंडेंचं खोचक उत्तर.
एसटी महामंडळात फ्री स्टाइल हाणामारी, दोन कंडक्टर आले आमने-सामने....
एसटी महामंडळात फ्री स्टाइल हाणामारी, दोन कंडक्टर आले आमने-सामने.....
फडणवीस, दादा नव्हे, या नेत्यामुळे मनसेची महायुतीसोबतची युती फिस्कटली?
फडणवीस, दादा नव्हे, या नेत्यामुळे मनसेची महायुतीसोबतची युती फिस्कटली?.
दिल्ली विधानसभा निवडणुकीचं बिगुल वाजलं, कधी होणार मतदान अन् निकाल कधी?
दिल्ली विधानसभा निवडणुकीचं बिगुल वाजलं, कधी होणार मतदान अन् निकाल कधी?.
बांगलादेशी बनला रत्नागिरीकर... शिरगाव ग्रामपंचायतीला पोलिसांची नोटीस
बांगलादेशी बनला रत्नागिरीकर... शिरगाव ग्रामपंचायतीला पोलिसांची नोटीस.
महाराष्ट्राची चिंता वाढली;7 वर्षीय मुलासह 13 वर्षीय मुलीला HMPVची लागण
महाराष्ट्राची चिंता वाढली;7 वर्षीय मुलासह 13 वर्षीय मुलीला HMPVची लागण.
मुडेंनी राजीनामा दिला? राजीनाम्याच्या प्रश्नावर म्हणाले, 'योग्य वेळी'
मुडेंनी राजीनामा दिला? राजीनाम्याच्या प्रश्नावर म्हणाले, 'योग्य वेळी'.
HMPV Virus : तुम्हाला 'ही' लक्षणं दिसताच सावध व्हा अन् अशी घ्या काळजी
HMPV Virus : तुम्हाला 'ही' लक्षणं दिसताच सावध व्हा अन् अशी घ्या काळजी.