आधी मलिक म्हणाले समीर वानखेडेंना तुरुंगात टाकणार, आता सोमय्या म्हणतात केसाला धक्का लागला तरी खैर नाही
एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्या केसाला जरी धक्का लागला, तरी तुमची खैर नाही, अशा धारदार शब्दात भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी अल्पसंख्याक विकासमंत्री नवाब मलिक यांना इशारा दिलाय.
ठाणे : एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्या केसाला जरी धक्का लागला तरी तुमची खैर नाही, अशा धारदार शब्दात भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी अल्पसंख्याक विकासमंत्री नवाब मलिक यांना इशारा दिलाय. ते अंबरनाथमध्ये आयोजित कार्यकर्ता मेळाव्यात बोलत होते. यावेळी त्यांनी नवाब मलिक तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर कठोर शब्दात टीका केली.
वानखेडे यांच्या केसाला जरी धक्का लागला…
नवाब मलिक यांनी दोनच दिवसांपूर्वी एनसीबीचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांच्यावर जाहीरपणे टीका करत त्यांना तुरुंगात टाकण्याची धमकी दिली होती. या पार्श्वभूमीवर किरीट सोमय्या यांनी मलिक यांच्यावर निशाणा साधला. “नवाब मलिक हे राज्यातल्या सरकारचे मंत्री आहेत. ते राष्ट्रवादीचे प्रवक्ते आहेत की ड्रग माफियांचे प्रवक्ते आहेत? समीर वानखेडे यांच्या केसाला जरी धक्का लागला, तरी तुमची खैर नाही,” असा थेट इशारा सोमय्या यांनी मलिक यांना दिला.
हिंमत असेल तर माझ्यावर अब्रुनुकसानीचा दावा दाखल करा
तसेच पुढे बोलताना अजित पवार तसेच त्यांच्या नातेवाईकावर करण्यात आलेल्या गौरव्यवहाराच्या आरोपांचा आधार घेत सोमय्या यांनी अजित पवार यांच्यावर निशाणा साधला. जरंडेश्वर साखर कारखान्याचे खरे मालक हे अजित पवार, सुनेत्रा पवार आणि अजित पवार यांच्या बहिणी आहेत, असे सोमय्या म्हणाले. तसेच पुढे बोलताना हिंमत असेल तर हायकोर्टात प्रतिज्ञापत्र द्या आणि माझ्यावर अब्रुनुकसानीचा दावा दाखल करा, असं खुलं आव्हान त्यांनी दिलं.
नवाब मलिक नेमकं काय म्हणाले ?
मुंबई ड्रग्स प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आणि अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक यांनी एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांना 21 ऑक्टोबर रोजी जाहीर कार्यक्रमात थेट आव्हान दिले होते. “समीर वानखेडेला वर्षभरात तुरुंगात टाकणार असं खुलं आव्हान देतो. वर्षभरात तुझी नोकरी जाईल. तुझा तुरुंगवास निश्चित आहे. राज्यातील जनता पाहतेय. वानखेडेची बोगसगिरी जनतेसमोर आणणार. त्याचा बाप बोगस होता, हा बोगस आहे, याच्या घरातील सगळे बोगस आहेत. माझ्या जावयाला तुरुंगात टाकले आणि आता मला फोन करतो की यात माझं काही नाही. माझ्यावर दबाव होता. मग तुझ्यावर दबाव टाकणाऱ्या बापाचं नाव सांग. कोणत्या बापाच्या सांगण्यावरुन हे करतोय? तुझा बाप कोण याचं उत्तर दे. तुझ्या बापाला मी घाबरत नाही. तुला तुरुंगात टाकल्याशिवाय मी गप्प बसणार नाही’, असं मवाब मलिक म्हणाले होते.
इतर बातम्या :
अमरावतीत आर्थित विवंचनेतून शेतकऱ्याच्या मुलीची आत्महत्या, मन सुन्न करणारी सुसाईड नोट समोर
ये वक्त वक्त की बात है, वक्त सबका बदलता है… नांदेडमध्ये छगन भुजबळांची तोफ धडाडली
मुख्यमंत्री आणि शरद पवारांचा फोन, अजित पवार पुणे दौरा रद्द करुन थेट मुंबईच्या दिशेला रवाना
VIDEO : Rupali Chakankar | राज्य महिला आयोग अचानक पोलीस स्टेशनला भेट देणार – रुपाली चाकणकर#rupalichakankar @ChakankarSpeaks pic.twitter.com/E3OeTklosZ
— TV9 Marathi (@TV9Marathi) October 22, 2021
(kirit somaiya support ncb zonal director sameer wankhede criticizes nawab malik)