Marathi News Latest news Know weird rules of north korea and how people live in this Country check know more
‘किम जोंग उन’ नावातच दहशत, उत्तर कोरियाचे विचित्र नियम वाचाल तर थरकाप उडेल
उत्तर कोरियाबद्दल बोललो तर येथे असे अनेक नियम आहेत, ज्याबद्दल जाणून तुम्ही देखील आश्चर्यचकित व्हाल.
पुरुषांसाठी केवळ 28 केशरचनांना मान्यता देण्यात आली आहे. सरकारने मंजूर केलेल्या हेअरस्टाइलव्यतिरिक्त कोणतीही हेअरस्टाइल ठेवल्यास त्या व्यक्तीला अटक करून तुरुंगात पाठवले जाते. दुसरीकडे, जर स्त्री विवाहित असेल तर ती तिच्या आवडीची हेअरस्टाईल ठेवू शकते. पण जर एखादी महिला अविवाहित असेल तर तिला केस लहान ठेवावे लागतात.
Follow us
उत्तर कोरियातील हुकूमशाहा ‘किम जोंग उन’ आणि त्यांच्या नियमांबद्दल तुम्ही खूप ऐकले असेल. या देशामध्ये स्वत:च्या मनाने काहीही करता येत नाही. इथे अनेक नियम इथल्या लोकांवर लादले गेले आहेत. खरंतर, कपडे घालण्यापासून ते इंटरनेट चालवण्यापर्यंत असे अनेक नियम आहेतय हे नियम वाचून तुम्ही थक्कच व्हाल चला तर मग जाणून घेऊयात कोणते आहेत हे नियम.
देशात निवडणुका तर होतात पण जनतेला एकच व्यक्ती निवडण्याचा पर्याय असतो. 1948 पासून देशावर एकाच कुटुंबाची सत्ता आहे. एकाच कुटुंबाची सत्ता असतानाही दरवर्षी निवडणुका होतात. या निवडणुका महापौर आणि प्रांतिक सरकार किंवा स्थानिक विधानसभेसाठी असतात.
इथे शिक्षा झाली की तीन पिढ्यांना होते. असा विचित्र नियम असलेला हा बहुधा जगातील पहिलाच देश आहे. या देशात एखाद्या व्यक्तीने गुन्हा केला तर त्याच्या संपूर्ण कुटुंबाला शिक्षा होते. संपूर्ण कुटुंबीयांना तुरुंगात पाठवले जाते.
उत्तर कोरियाच्या लोकांना फक्त 28 वेबसाइट्स ऍक्सेस करण्याचे स्वातंत्र्य आहे. येथील इंटरनेट क्वांगम्योंग किंवा ब्राइट म्हणून ओळखले जाते. ज्यांच्याकडे स्वतःचा कॅम्पुटर आहे त्यांच्यासाठीच इंटरनेट मोफत आहे.
येथे फक्त 28 वेबसाइट्स वापरु शकतो म्हणूनच येथील कॅम्पुटर देखली खूप महाग आहेत. तसेच, कोणाला कॅम्पुटर घ्यायचा असेल, तर त्याला शासनाची मान्यता घ्यावी लागते.