आर्मीतील श्वान फक्त गंधाने बॉम्बच नाही तर या अनेक गोष्टीसुद्धा चलाखीने शोधून काढतात, कशी असते स्पेशल ट्रेनिंग!!
Army Dog Training: आर्मीतील श्वान आपल्या जवानांसारखेच देशाच्या सुरक्षेसाठी आपल्या जीवाचे रान करून देशसेवा करत असतात आणि आपल्या चलाख बुद्धिमत्तेच्या आधारावर अनेक संकटे पळवून लावतात.आज आम्ही तुम्हाला कशाप्रकारे श्वान यांना स्पेशल ट्रेनिंग दिले जाते याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत .
आर्मीतील श्वान(Army Dog)फक्त वासाने बॉम्बच शोधत नाही तर अनेक गोष्टी शोधत असतात आणि म्हणूनच याकरिता या श्वानांना विशेष ट्रेनिंग दिली जाते.आर्मीमध्ये जाणे आणि देशसेवा करणे हे प्रत्येकाचे स्वप्न असते आणि आपल्यापैकी अनेक जण हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी जीवापाड मेहनत करत असतात. काहींची स्वप्नं साकार होतात परंतु काहीही स्वप्न साकारत होत नसताना सुद्धा सकारात्मक दृष्टिकोनातून वेगवेगळ्या माध्यमातून अनेक मंडळी देशसेवा करत असतात. आपल्यापैकी अनेकांनी एक गोष्ट प्रामुख्याने पाहिली असेल ती म्हणजे अनेकदा आर्मी मध्ये जवानांसोबत आपल्याला काही श्वान सुद्धा पाहायला मिळतात. आता आपल्यापैकी अनेकांच्या मनामध्ये प्रश्न निर्माण होतो की आर्मीमध्ये या कुत्राचे म्हणजे श्वानाचे नेमके काय काम आहे ? फक्त कुत्राच का अन्य प्राणी का नाही? कुत्रा आपल्याला पाहायला मिळतात, असे विविध प्रकारचे प्रश्न अनेकांच्या मनामध्ये येत असतात. हे श्वान आपल्या सैनिकांप्रमाणेच देशसेवाचे कार्य करत असतात. श्वान म्हणजे परंतु हे कुत्रे(Dog) काही साधारण नसतात. या कुत्र्यांना स्पेशल ट्रेनिंग दिली जाते आणि हि स्पेशल ट्रेनिंग(special training) दिल्यानंतरच त्यांची आर्मीमध्ये भरती केली जाते. म्हणूनच आजच्या लेखामध्ये आम्ही तुम्हाला या श्वानांना कशा पद्धतीची ट्रेनिंग दिली जाते आणि ही ट्रेनिंग त्यांना देत असताना कोणकोणत्या गोष्टींची काळजी घेतली जाते याबद्दल आज आपण सविस्तर जाणून घेणार आहोत.
आर्मीमध्ये कोणकोणते श्वान असतात?
तसे तर वेगवेगळ्या टास्कसाठी वेगवेगळ्या प्रकारचे ब्रीड असलेले श्वानांचा वापर केला जातो आणि त्याच्या आधारावर त्यांना त्या पद्धतीची ट्रेनिंग सुद्धा दिली जाते, तसे पाहायला गेले तर आर्मीमध्ये जर्मनशेफर्ड, लेब्रोडोर आणि बेलजियन शेफर्ड्स व ग्रेट स्विस माउंटेन श्वान पाहायला मिळतात आणि देशाच्या प्रत्येक सुरक्षतेच्या प्रकल्पामध्ये आपल्याला आवर्जून दिसून येतात तसेच इंडियन ब्रीड मुधोल हाउंड श्वान हा सुद्धा आर्मी मध्ये देश सेवेसाठी वापरला जातो. हाउंड एकमेव भारतीय जातीतला श्वान आहे ज्यास भारतीय सेनेमध्ये सामील करण्यात आले आहे.
ट्रेनिंग कशी असते?
या श्वानांची ट्रेनिंग मेरठ, शाहजहांपुर, चंडीगढ़ सेंटर्स येथे दिली जाते.या श्वानांना ट्रेनिंग देण्यासाठी विशेष लोक असतात ज्यांना आयवीसी या नावाने ओळखले जाते, आयवीसी द्वारे दिली गेलेली ट्रेनिंग बांगलादेश, नेपाळ, श्रीलंका, म्यानमार सारखे देश सुद्धा पसंत करतात.
आपल्या सांगू इच्छितो की या श्वानांना ट्रेनिंग देण्यासाठी वेगवेगळे कोर्स असतात आणि त्या कोर्स नुसार प्रत्येक श्वानाला ट्रेनिंग दिली जाते. या कोर्समध्ये बेसिक डॉग ट्रेनर स्कॉर्स, बेसिक आर्मी डॉग ट्रेनर्स कोर्स फॉर इंडियन एयर फोर्स इत्यादी अन्य काही कोर्सचा समावेश केला गेला आहे या श्वानांना सुद्धा आर्मीच्या जवानासारखी विशेष ट्रेनिंग दिली जाते आणि या वरूनच त्यांचे पुढील जीवनशैली सुद्धा ठरवली जाते.
काय काम करतात हे श्वान ?
इंडियन आर्मीचे हे श्वान डॉग्स ट्रेकिंग, गार्डिंग, माइन डिटेक्शन, एक्सप्लोसिव डिटेक्शन, इंफेंट्री पैट्रोलिंग, ऐवेलॉन्च रेस्क्यू ऑपरेशन, सर्च अँड रेस्क्यू व नार्कोटिक डिटेक्शन यासारखे अनेक प्रकारचे काम करतात. या दरम्यान या विविध टास्कमध्ये या श्वानांचा उपयोग केला जातो. आर्मी मध्ये 25 फुल डॉग युनिट आणि हाफ युनिट आहेत, यामध्ये फुल युनिट मध्ये 24 आणि हाफ युनिटमध्ये 12श्वान असतात.
इतर बातम्या-