चित्रा वाघ यांचा अप्रत्यक्षपणे सुप्रिया सुळेंना टोला; म्हणाल्या, मोठ्या ताईंचं मनस्वास्थ बिघडलंय…

BJP Leader Chitra Wagh on Supriya Sule : कोल्हापूरमध्ये भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी संवाद साधला. यावेळी त्यांना बारामती लोकसभा मतदारसंघातील लढतीबाबत प्रश्न विचारण्यात आला. तेव्हा त्यांनी सुप्रिया सुळे यांना टोला लगावला. त्या नेमकं काय म्हणाल्या? वाचा सविस्तर...

चित्रा वाघ यांचा अप्रत्यक्षपणे सुप्रिया सुळेंना टोला; म्हणाल्या, मोठ्या ताईंचं मनस्वास्थ बिघडलंय...
Follow us
| Updated on: Mar 07, 2024 | 9:51 PM

भूषण पाटील, प्रतिनिधी- टीव्ही 9 मराठी, कोल्हापूर | 07 मार्च 2024 : भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांनी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाच्या नेत्या, खासदार सुप्रिया सुळे यांच्यावर अप्रत्यक्षपणे टीका केली आहे. मोठ्या ताईंचे मनस्वास्थ बिघडले आहे. त्यांच्याकडून होणाऱ्या वक्तव्याकडून त्यांचे मानसिक संतुलन बिघडल्यासारखे वावरताना दिसते. अजित पवारांचे प्रचंड कामं आहे. विकास कामाचे प्रचंड व्यासंग असलेले नेते म्हणून अजित दादांची ओळख आहे. अजितदादांनी केलेली विकास कामं, दांडगा जनसंपर्क यामुळे सुनेत्रा पवार निवडून येतील, असं म्हणत भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी खासदार सुप्रिया सुळेंना टोला लगावला आहे. त्या कोल्हापूरमध्ये बोलत होत्या.

शरद पवारांच्या दौऱ्यावर भाष्य

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शरद पवार सध्या दौरा करत आहेत. त्यावर चित्रा वाघ यांनी प्रतिक्रिया दिली. माझ्यासारख्या कार्यकर्तेला खूप वाईट वाटते. त्यांच्याभोवती असणारी फळी कुचकामी ठरली. या वयामध्ये सुद्धा नेत्याला मैदानात उतरावे लागते. जिल्ह्यामध्ये फिरावे लागते आणि तालुक्यामध्ये लक्ष घालावे लागते. यासारखे वाईट काही नसावे. ज्यांना मोठे केले आणि त्यांच्या अवतीभवती असणारे सर्वच कुचकामी ठरले. एवढ्या मोठ्या ताईंना त्यांचे राजकीय करियर सावरायला लागत आहे, असं चित्रा वाघ म्हणाल्या.

महाविकास आघाडीवर टीका

जागावाटपावरून महाविकास आघाडी टीका करत आहेत. त्यावरून बोलताना यांच्या घराला आग लागली आहे. पण यांचे लक्ष महाविकास आघाडीचे लक्ष भाजपकडे आहे. आमची काळजी करू नका, आमचं नेतृत्व देवेंद्र फडणवीस प्रगल्भ आहेत. महाविकास आघाडीचे नेते काही बोलतायत त्यात काही तथ्य नाही. जे होणार ते देवेंद्र फडणवीस चांगल्या पद्धतीने करतील असा आम्हाला विश्वास आहे. रोज सकाळी यायचं आणि तुतारी वाजवायची… मीडिया हेच विरोधकांचे कुरुक्षेत्र झाले आहे. शब्दाचे पोकळ बाण सोडणे एव्हडेच त्यांचे कामं आहे. फिल्डवर येऊन जर वस्तूस्थिती पहिली तर त्यांच्या वलग्ना बंद होतील, असं चित्रा वाघ यांनी महाविकास आघाडीवर निशाणा साधला.

महायुतीत समन्वय- वाघ

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात अत्यंत चांगले समन्वय आहे. दीड वर्षात महाराष्ट्राला प्रगतीवर नेण्याचे कामं केले आहे. दोघांमधील समाज आणि विश्वास अत्यंत चांगला आहे. दोघांची घट्ट महायुती आहे. काही वादळे येतात आणि जातात. पण हे दोघेही नेते आपल्या नेत्यांशी संवाद साधायला सक्षम आहेत. मला यात काही वेगळं वाटतं नाही, असं म्हणत चित्रा वाघ यांनी रामदास कदम यांच्या वक्तव्यावर भाष्य केलं आहे.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.