पब्जीमुळे तरुणाची मानसिक अवस्था बिघडली, उपचारादरम्यानही गेमबाबतच बडबड

आजकाल तरुणांमध्ये पब्जी या ऑनलाईन खेळाचं वेड खूप मोठ्या प्रमाणात वाढलं आहे (PUBG). याच पब्जी खेळामुळे कोल्हापुरात एका तरुणाला वेड लागलं आहे (youths mental health unstable). या खेळामुळे तरुणाची मानसिक अवस्था बिघडली. त्याला रुग्णालयात आणल्यानंतरही तो सतत पब्जी गेमबाबतच बडबडत होता.

पब्जीमुळे तरुणाची मानसिक अवस्था बिघडली, उपचारादरम्यानही गेमबाबतच बडबड
Follow us
| Updated on: Sep 15, 2019 | 8:35 AM

कोल्हापूर : आजकाल तरुणांमध्ये पब्जी या ऑनलाईन खेळाचं वेड खूप मोठ्या प्रमाणात वाढलं आहे (PUBG). याच पब्जी खेळामुळे कोल्हापुरात एका तरुणाला वेड लागलं आहे (youths mental health unstable). या खेळामुळे तरुणाची मानसिक अवस्था बिघडली. त्याला रुग्णालयात आणल्यानंतरही तो सतत पब्जी गेमबाबतच बडबडत होता.

कोल्हापुरातील सीपीआर रुग्णालयात शुक्रवारी एका तरुणाला विचित्र परिस्थितीत दाखल करण्यात आलं. हा तरुण सतत काहीतरी बडबडत होता. सुरुवातीला डॉक्टरांना हा तरुण नशेत असल्याचं वाटलं. मात्र, उपचार करुनही तो सतत काहीतरी बडबडत होता. त्यानंतर डॉक्टरांनी हा प्रकार समजून घेण्यासाठी तरुणाच्या मित्रांना बोलावलं. तेव्हा तो पब्जी गेमबाबत बडबड करत असल्याचं त्याच्या मित्रांनी डॉक्टरांना सांगितलं. पब्जीच्या वेडापायी या तरुणाची मानसिक स्थिती बिघडली होती.

हा तरुण पोर्ले तर्फ ठाणे येथील महाविद्यालयात शिक्षण घेत आहे. त्याला पब्जी गेमचं अत्यंत वेड होतं. तो सतत पब्जी गेम खेळत असायचा. गणपती निमित्त दोन दिवस सुट्टी होती. या दरम्यान, तो दोन्ही दिवस त्याच्या खोलीत पब्जी गेम खेळत होता. गेम खेळत असताना शुक्रवारी रात्री अचानक तो मोठ-मोठयाने ओरडू लागला. त्याचा आवाज ऐकून घरच्यांनी खोलीकडे धाव घेतली. त्याची अशी अवस्था पाहून त्याच्या घरच्यांनी त्याला लगेच सीपीआर रुग्णालयात दाखल केलं. तिथे हा सर्व प्रकार उघडकीस आला.

सध्या डॉक्टरांनी त्याच्यावर उपचार करुन त्याला घरी पाठवलं आहे. मात्र, अद्यापही तो मानसिक तणावाखाली असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं आहे.

पाहा व्हिडीओ :

पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत.
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.