नागपुरात व्हेंटिलेटर्सचा तुटवडा, 11 हजार अॅक्टिव्ह कोरोना रुग्ण आणि 291 व्हेंटिलेटर्स, अनेक रुग्ण वेटिंगवर
कोरोना रुग्णांसाठी नागपुरात अवघे 291 व्हेंटिलेटर उपलब्ध आहेत. ही अतिशय चिंताजनक बाब आहे.

नागपूर : नागपूर शहरात व्हेंटिलेटरचा मोठा तुटवडा असल्याची (Lack Of Ventilators In Nagpur) माहिती समोर आली आहे. कोरोना रुग्णांसाठी नागपुरात अवघे 291 व्हेंटिलेटर उपलब्ध आहेत. ही अतिशय चिंताजनक बाब आहे. या 291 व्हेंटिलेटर्ससाठी अनेक रुग्ण वेटिंग लिस्टवर आहेत. तर वेळेवर व्हेंटिलेटर न मिळाल्याने अनेकांना आपला जीवही गमावला लागला आहे (Lack Of Ventilators In Nagpur).
नागपुरात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. पण आरोग्य यंत्रणा सुधारण्याकडे प्रशासनाचं दुर्लक्ष होतं आहे. नागपूर जिल्ह्यात सध्या 11 हजारच्या वर कोरोना रुग्ण आहेत, ज्यांच्यावर उपचार सुरु आहेत. यापैकी अनेक रुग्णांना व्हेंटिलेटरची गरज आहे. पण जिल्ह्यात व्हेंटिलेटर्सचा तुटवडा असल्याने, अनेक रुग्ण व्हेंटिलेटरसाठी वेटिंगवर आहेत.
जिल्ह्यात 11 हजारच्या वर अॅक्टिव्ह रुग्ण आहेत, रोज 2000 च्या आसपास रुग्ण वाढत आहेत. पण संपूर्ण जिल्ह्यात कोव्हिड रुग्णांसाठी अवघे 291 व्हेंटिलेटर्स आहेत. सरकारी आणि खाजगी रुग्णालयात अवघे 291 व्हेंटिलेटर्स आहेत. अनेकांना वेळेवरव्हेंटिलेटर न मिळाल्याने जीव गमवावा लागला आहे. पण परिस्थिती सुधारण्याकडे प्रशासनाचं लक्ष दिसत नाही (Lack Of Ventilators In Nagpur).
मार्च महिन्यात नागपुरात कोरोनाचा पहिला पेशंट आढळला. जगभरातील कोरोना संक्रमणाचा ट्रेंड पाहता नागपूरवर ही वेळ येईल, असा अंदाज साऱ्यांनाच होता. पण, साडेपाच ते सहा महिन्यात सक्षम आरोग्य यंत्रणा उभारण्यात प्रशासन आणि सत्ताधाऱ्यांना अपयश आलं आहे. त्यामुळे नागपुरात आरोग्य सुविधांअभावी रुग्ण अक्षरश: तडफडून मरत आहेत.
राज्यातील कोरोना चाचणीच्या दरात कपात, नवी किंमत किती?https://t.co/UGYNSPe9N2 #coronavirus
— TV9 Marathi (@TV9Marathi) September 7, 2020
Lack Of Ventilators In Nagpur
संबंधित बातम्या :
नागपूरच्या रुग्णालयातून 5 कोरोना रुग्ण पळाले, काही तासातच मध्य प्रदेशमध्ये पकडले