दिल्लीत पकडलेल्या संशयित अतिरेक्याच्या घरात स्फोटकांचा मोठा साठा, वडिलांसह तिघांना अटक
उत्तर प्रदेशच्या दहशतवादी विरोधी पथकाने (एटीएस) अबू युसूफच्या बलरामपूर येथील घरी छापा टाकला. यावेळी एटीएसला त्याच्या घरी स्फोटकांचा मोठा साठा मिळाला (Large quantity of explosives recovered from ISIS operatives house in UP Balrampur).
लखनऊ : दिल्लीत काल (23 ऑगस्ट) पकडलेला आयसीसशी संबंधित संशयित अतिरेकी अबू युसूफ याचा घातपाताचा कट किती भयानक होता, हे आता समोर येत आहे. उत्तर प्रदेशच्या दहशतवादी विरोधी पथकाने (एटीएस) अबू युसूफच्या बलरामपूर येथील घरी छापा टाकला. यावेळी एटीएसला त्याच्या घरी स्फोटकांचा मोठा साठा मिळाला. हा साठा बघून एटीएसचे अधिकारीदेखील स्तब्ध झाले (Large quantity of explosives recovered from ISIS operatives house in UP Balrampur).
एटीएसने टाकलेल्या छाप्यात अबू युसूफच्या घरात बॉम्ब तयार करण्यासाठी लागणारे स्फोटकं मिळाली. पोलिसांनी सर्व स्फोटकं आणि बऱ्याच वस्तू जप्त केल्या आहेत. एटीएस आणि दिल्ली पोलिसांकडून अबू युसूफची चौकशी सुरु आहे. याप्रकरणी दिल्ली पोलिसांनी अबू युसूफचे वडील कफील अहमद यांच्यासह आणखी तिघांना ताब्यात घेतलं आहे.
Incriminating materials including a brown colour jacket containing 3 explosive packets and a blue colour check jacket containing 4 explosive packets which were removed safely, leather belt containing explosive 3 Kg approx recovered:PramodKushwaha, Delhi Dy Commissioner of Police https://t.co/uskqoVxvJD pic.twitter.com/Mb1ibWAe0N
— ANI UP (@ANINewsUP) August 23, 2020
दरम्यान, अबू युसूफचं कारस्थान उघड झाल्यानंतर त्याची पत्नी आणि वडिलांनी बलरामपूर येथे ‘एएनआय’ वृतसंस्थेला प्रतिक्रिया दिली (Large quantity of explosives recovered from ISIS operatives house in UP Balrampur).
“माझ्या मुलाने असं कृत्य केलं, या गोष्टीचं मला प्रचंड वाईट वाटतंय. शक्य झाल्यास युसूफला एकदा माफी मिळावी, पण त्याने जे कृत्य केलंय ते प्रचंड वाईट आहे. तो इतक्या अमानूष कृत्याच्या कामाला लागलाय याबाबत मला माहित पडलं असतं तर मी त्याला घर सोडून जायला सांगितलं असतं”, असं अबू युसूफच्या वडिलांनी सांगितलं.
I regret he was involved in such activities. I wish he could be forgiven for once if possible but his act is wrong. Had I known about his activities I would have asked him to leave us: Kafeel Ahmed (father of ISIS operative Abu Yusuf who was arrested y’day in Delhi) in Balrampur pic.twitter.com/jLMp4C6Qzb
— ANI UP (@ANINewsUP) August 23, 2020
“तो घरात गन पावडर आणि इतर साहित्याचा साठा करत होता. जेव्हा मी त्याला अडवण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्याने मला यामध्ये पडू नकोस असं म्हटलं. त्याला एकदा माफी मिळावी, अशी माझी इच्छा आहे. कारण आमचे चार लहान मुलं आहेत. आम्ही शेवटी कुठे जाणार?”, अशी प्रतिक्रिया अबू युसूफच्या पत्नीने दिली.
He had stored gunpowder & other materials at home here. When I told him he should not do such things, he told me that I should not stop him. I wish he could be forgiven. I have four kids. Where will I go?: Wife of Abu Yusuf (ISIS operative arrested from Delhi y’day) in Balrampur pic.twitter.com/BKEmPHiO3I
— ANI UP (@ANINewsUP) August 23, 2020
संबंधित बातमी :
राम मंदिरावरुन रोष, दिल्ली-उत्तर प्रदेशात बॉम्ब स्फोटाचा कट, पकडलेल्या दहशतवाद्याचा मोठा खुलासा