Happy Birthday Lata Mangeshkar | लता मंगेशकर यांच्या आयुष्यातील ‘10’ विस्मयकारक गोष्टी!
वयाच्या अवघ्या 13व्या वर्षी संपूर्ण घराची जबाबदारी आपल्या खांद्यांवर घेत, त्या कामानिमित्ताने मुंबईत आल्या. संगीत क्षेत्रातील प्रवासाला सुरुवात केल्यानंतर त्यांनी कधीच मागे वळून पाहिले नाही.
मुंबई : ‘भारतरत्न’ लता मंगेशकर यांच्या सुमधुर आवाजाने अवघ्या विश्वाला भुरळ घातली आहे. लता मंगेशकर भारतीय संगीत विश्वाच्या एक अविभाज्य भाग आहेत. वयाच्या 13व्या वर्षी त्यांच्या सांगीतिक प्रवासाला सुरुवात झाली होती. आजपर्यंत त्यांनी अनेक प्रसिद्ध अभिनेत्रींसाठी पार्श्वगायन केले आहे. या ‘सुरांच्या राणी’ने अवघ्या रसिक प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले आहे. त्यांचा हा संघर्षमय प्रवास सर्वांसाठीच प्रेरणादायी आहे. आज (28 सप्टेंबर) लतादीदी आपला 91वा वाढदिवस (Birthday) साजरा करत आहेत (Lata Mangeshkar Birthday Special 10 unknown facts).
50 हजारहून अधिक गाण्यांनी श्रोत्यांना केले मंत्रमुग्ध
भारताच्या ‘गानकोकिळा’ लता मंगेशकर (Lata Mangeshkar) यांनी 36 भाषांमध्ये तब्बल 50 हजारहून अधिक गाणी गायली आहेत. वयोमानापरत्वे त्या सध्या संगीत क्षेत्रापासून दूर असल्या तरी, त्यांच्या कलाकृती आजच्या नव्या दमाच्या गायक-गायिकांना भुरळ पडतात. लतादीदींचा हा प्रवास तितकासा सोपा नव्हता. वयाच्या 13व्या वर्षी संपूर्ण घराची जबाबदारी आपल्या खांद्यांवर घेत, त्या कामानिमित्ताने मुंबईत आल्या. संगीत क्षेत्रातील प्रवासाला सुरुवात केल्यानंतर त्यांनी कधीच मागे वळून पाहिले नाही.
आज वाढदिवसानिमित्ताने आपण त्यांच्या आयुष्यात 10 विस्मयकारक गोष्टींबद्दल (Unknown Facts) जाणून घेणार आहोत.
- लता मंगेशकर यांचे खरे नाव होते ‘हेमा’. वडील मास्टर दीनानाथ मंगेशकर यांच्या ‘भाव बंधन’ या नाटकातील प्रसिद्ध व्यक्तिरेखा ‘लतिका’वरून त्यांचे नाव ‘लता’ असे ठेवण्यात आले.
- शाळेत जाताना बहिण आशाला सोबत नेता येणार नाही म्हणून, लता मंगेशकर (Lata Mangeshkar) केवळ एकच दिवस शाळेत गेल्या होत्या.
- ‘पातळ आवाज’ असल्याचे कारण देत प्रसिद्ध निर्माते शशिधर मुखर्जी यांनी लता मंगेशकर यांना काम देण्यास नकार दिला होता.
- लता मंगेशकर सुरुवातीच्या काळात नामांकित पार्श्वगायिका आणि अभिनेत्री नूरजहां यांच्या आवाजाचे अनुकरण करायच्या.
- लता मंगेशकर यांनी निषेध व्यक्त केल्यानंतर 1959पासून ‘फिल्मफेअर पुरस्कारा’त ‘सर्वोत्कृष्ट पार्श्वगायक/गायिका’ ही श्रेणी सुरू करण्यात आली. (Lata Mangeshkar Birthday Special 10 unknown facts)
- लता मंगेशकर यांच्यावर अज्ञात व्यक्तीकडून विष प्रयोग करण्यात आला होता. त्यामुळे जवळपास तीन महिने त्या अंथरुणाला खिळल्या होत्या.
- 26 जानेवारी 1963 रोजी लता मंगेशकर ‘ए मेरे वतन के लोगो’ हे प्रसिद्ध गीत सादर करत असताना पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या डोळ्यात अश्रू तरळले होते.
- ‘ए मेरे वतन के लोगो’ ही गाणे दोन आवाजांत रेकॉर्ड केले जाणार होते. विशेष म्हणजे स्वतः लतादीदी आणि आशा भोसले (Asha Bhosle) या गाण्याला आवाज देणार होत्या. परंतु, ते गाणे केवळ लतादीदींनी गावे असा आग्रह धरण्यात आल्याने, संपूर्ण गाणे त्यांच्या आवाजात रेकॉर्ड करण्यात आले.
- 1974मध्ये लंडनच्या ‘रॉयल अल्बर्ट हॉल’मध्ये सादरीकरण करणाऱ्या त्या पहिल्या भारतीय महिला ठरल्या.
- राज कपूर यांचा 1978मध्ये प्रदर्शित झालेला ‘सत्यम शिवम सुंदरम’ हा चित्रपट लता मंगेशकर यांच्या जीवन कथेवरून प्रेरित होता. या चित्रपटात लता मंगेशकर यांनी काम करावे अशी त्यांची इच्छा होती.
(Lata Mangeshkar Birthday Special 10 unknown facts)
Happy Birthday Lata Mangeshkar | 36 भाषांत 50 हजारहून अधिक गाणी गाणाऱ्या लतादीदी वडिलांसमोर राहायच्या गप्प!https://t.co/TvNExeO1cN@mangeshkarlata #HappyBirthdayLataMangeshkar #BharatRatna #LataMangeshkar
— TV9 Marathi (@TV9Marathi) September 28, 2020
संबंधित बातम्या :
जयप्रभा स्टुडिओच्या विभाजनासाठी लतादीदींचा प्रस्ताव, कोल्हापूरकरांमध्ये संताप
लता मंगेशकरांना रुग्णालयातून डिस्चार्ज, चाहत्यांसह उपचार करणाऱ्या डॉक्टरांचे ट्विटवरुन आभार
“नरेंद्रभाई आपके लिए मेरी ये राखी”, भेट म्हणून लता मंगेशकरांनी पंतप्रधान मोदींकडून घेतलं ‘हे’ वचन