लातूर पॅटर्न : नियम धुडकावून दहावीचे वर्ग भरले, 25-30 मुलांची हजेरी
लातूर जिल्ह्यातल्या उद्गिरमध्ये लॉकडाऊनचे सगळे नियम धुडकावून देत शाळेचे वर्ग सुरु केल्याचा प्रकार समोर आला आहे.

लातूर : लातूर जिल्ह्यातल्या उद्गिरमध्ये लॉकडाऊनचे (Latur School Start Without Permission) सगळे नियम धुडकावून देत शाळेचे वर्ग सुरु केल्याचा प्रकार समोर आला आहे. गेल्या चार दिवसांपासून शाळेच्या वर्गात 25 ते 30 मुलांना एकत्र करुन ही शाळा बिनदिक्कत सुरु आहे. विशेष म्हणजे पालकांनाही आपली मुले शाळेत जातायत याची पूर्ण माहिती असूनही मुलांच्या सुरक्षिततेकडे दुर्लक्ष करीत अक्षरनंदन शाळेत दहावीचे वर्ग सुरु झाले. या प्रकराची गंभीर दखल जिल्हाधिकाऱ्यांनी (Latur School Start Without Permission) घेतली आहे.
उदगीर शहरातल्या मलकापूर भागात अक्षरनंदन शाळा आहे. या शाळेत सध्या दहावीचे वर्ग सुरु आहेत. प्रशासनाने कसल्याही सूचना दिलेल्या नसताना शाळा प्रशासनाने स्वतः निर्णय घेत दहावीच्या विद्यार्थ्यांचे वर्ग सुरु केले आहेत. 25 ते 30 मुलं-मुले इथे एका वर्गात शिकत आहेत.
विशेष म्हणजे सध्या उद्गिरमध्ये 19 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण उपचार घेत आहेत. आता पर्यंतच्या पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या जवळपास 97 इतकी आहे. तरी देखील पालक आणि शाळेचं प्रशासन मुलांना वर्गात एकत्र करत आहेत. याला बेफिकीरपणा म्हणायचे की आणखी काय? आता या प्रकारची जिल्हाधिकारी चौकशी करुन कारवाही करणार असल्याचं सांगत आहेत (Latur School Start Without Permission).
रेड झोन वगळता जुलैपासून दहावी-बारावीच्या प्रत्यक्ष वर्गांना सुरुवात, निकालाच्या संभाव्य तारखाही ठरल्याhttps://t.co/aoXPLvYD4E #cmuddhavthackeray #schoolreopening #sscresult
— TV9 Marathi (@TV9Marathi) June 22, 2020
संबंधित बातम्या :
अमित ठाकरे राजभवनात, निवासी डॉक्टरांच्या परीक्षांबाबत राज्यपालांशी चर्चा