‘लक्ष्या’ म्हणजे खूप मस्त माणूस… बिग बॉसमध्ये अनिल कपूर यांनी सांगितली ‘ती’ जुनी आठवण

'बिग बॉस ओटीटी 3' निमित्त एका मुलाखतीमध्ये अभिनेत अनिल कपूर यांनी मराठी सिनेमाचा सुपरस्टार हिरो लक्ष्मीकांत बेर्डे यांची आठवण सांगितली. याशिवाय त्यांनी मराठी आवडता सिनेमा याची माहिती देतानाच एका चित्रपटात लक्ष्मीकांत यांच्यामुळेच काम केल्याचे सांगितले.

'लक्ष्या' म्हणजे खूप मस्त माणूस... बिग बॉसमध्ये अनिल कपूर यांनी सांगितली 'ती' जुनी आठवण
laxmikant berde and anil kapoorImage Credit source: TV9 NEWS NETWORK
Follow us
| Updated on: Jul 04, 2024 | 11:07 PM

बॉलिवूडमधील सुप्रसिद्ध अभिनेते अनिल कपूर यांनी आजवर अनेक हिट सिनेमा दिले आहेत. तेजाब, परिंदा, नायक ते नुकतच रिलीज झालेला ‘अॅनिमल’ सिनेमा असो. त्यांच्या भूमिकेची नेहमीच चर्चा होताना दिसते. अनिल कपूर सध्या ‘बिग बॉस ओटीटी 3’ कार्यक्रमात व्यस्त आहेत. वयाची साठी ओलांडली असली तरी अनिल कपूर फिट अँड फाईन आहेत. ‘बिग बॉस ओटीटी 3 च्या निमित्ताने घेतलेल्या एका मुलाखतीमध्ये अनिल कपूर यांनी मराठीचा सुपरस्टार लक्ष्मीकांत बेर्डे यांची आठवण सांगितली. यावेळी त्यांनी अनिल कपूर यांनी त्यांचा आवडता मराठी सिनेमा कोणत हे ही सांगितले. सलमान खान याच्याऐवजी अनिल कपूर ‘बिग बॉस ओटीटी ३’ च्या सूत्रसंचालनाची जबाबदारी सांभाळत आहेत.

मराठी आणि हिंदी चित्रपटात काम करून लक्ष्मीकांत बेर्डें यांनी प्रेक्षकांचे खूप मनोरंजन केले. प्रेक्षकांनीही त्यांच्यावर भरभरून प्रेम केले. याच लक्ष्मीकांतची आठवण सांगताना अनिल कपूर भावूक झाले होते. लक्ष्मीकांत बेर्डे यांच्यासोबत मी बेटा सिनेमात काम केले होते. त्यांच्याबरोबर काम करताना एक वेगळी मजा आली. लक्ष्मीकांत बेर्डेजी खूप मस्त माणूस होते असे अनिल कपूर म्हणाले.

एकदा लक्ष्मीकांत बेर्डे यांनी मला फोन केला. ‘हमाल दे धमाल हा मराठी सिनेमा ते करत होते. या सिनेमात मी पाहुण्या कलाकाराची भूमिका साकारावी अशी त्यांची इच्छा होती. मी त्यांना लगेच होकार कळवला. हमाल दे धमाल सुपरहिट झाला. सिल्व्हर ज्युबिली झाला. माझा पहिलाच मराठी चित्रपट आणि तो ही सिल्व्हर ज्युबिली झाला. हे भाग्य मला लक्ष्मीकांत बेर्डे आणि या सिनेमामुळे मिळाले असे ते म्हणाले.,

हमाल दे धमाल सिनेमा जेव्हा बघितला तेव्हा मला खूप मजा आली. मराठीतला हाच माझा फेव्हरेट सिनेमा आहे. त्यामध्ये मी काम केलं म्हणून तो माझा आवडता सिनेमा आहे असे नाही. तर, लक्ष्मीकांत बेर्डें यांच्यासोबत पहिल्यांदा मराठीमध्ये काम केले म्हणून तो आवडता सिनेमा आहे, असे सांगत अनिल कपूर यांनी लक्ष्याच्या आठवणीना उजाळा दिला.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.