मांजरवर्गीय वन्यजीव प्रकारातील सर्वात चपळ, वेगवान आणि घातक असलेला बिबट्या क्वचितच कॅमेराबद्ध होतो. त्यातही बिबट्याची जोडी कॅमेराबद्ध होणे म्हणजे अतिदुर्मिळ. मात्र, पट्टेदार वाघांसाठी प्रसिद्ध असलेल्या चंद्रपूरच्या ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पात बिबट्याच्या जोडीने दिलेले मनसोक्त दर्शन सध्या चर्चेचा विषय ठरला आहे.