Crop Loan : राज्यातील 12 जिल्ह्यात 50 टक्क्यांपेक्षा कमी पीक कर्ज वाटप : सहकारमंत्री बाळासाहेब पाटील
राज्यात अजूनही 12 जिल्ह्यात 50 टक्क्यांपेक्षा कमी पीक कर्ज वाटप झाले (Farmer crop loan) आहे.
पुणे : राज्यात अजूनही 12 जिल्ह्यात 50 टक्क्यांपेक्षा कमी पीक कर्ज वाटप झाले (Farmer crop loan) आहे, असा आरोप सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांनी केला आहे. महात्मा ज्योतिराव फुले कर्जमुक्ती योजनेतील शेतकऱ्यांना प्राधान्याने पीक कर्ज वाटप करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. पण अद्याप 12 जिल्ह्यात 50 टक्क्यांपेक्षा कमी कर्ज वाटप करण्यात आले आहे. पीक कर्जवाटपात हलगर्जी करणाऱ्या बँकांवर कारवाई करण्याचे आदेश बाळासाहेब पाटील यांनी दिलेत (Farmer crop loan).
पुण्यात त्यांनी खरीप पीक कर्ज वाटपाची आढावा बैठक घेतली. यावेळी त्यांनी नाशिक, जळगावच्या जिल्हा बँकांसोबतच काही राष्ट्रीय बँका शेतकऱ्यांना पीक कर्ज वाटपात टाळाटाळ करत असल्याचं आढळून आलं. अशा जिल्हा सहकारी बँक आणि राष्ट्रीयकृत बँकांवर संबंधित जिल्हाधिकाऱ्यांनी तात्काळ कारवाई करावी, असे निर्देश सहकारमंञ्यांनी दिलेत.
त्याचबरोबर आगामी साखर गळीत हंगामात 37 साखर कारखान्यांनी 750 कोटींचे थकहमी प्रस्ताव दिलेत. त्यावर काल (6 ऑगस्ट) साखर संकुलमध्ये या सर्व अर्जांची छाननी करण्यात आली. 415 कोटींचे प्रस्ताव राज्य सरकारला सादर होतील. या थकहमीला मात्र कँबिनेटमध्येच अंतिम मंजुरी मिळेल, अशी माहिती सहकार मंत्र्यांनी दिली.
नांदेड, उस्मानाबाद, परभणी, हिंगोली, नाशिक, जळगाव, धुळे, नंदुरबार, अमरावती, बुल़डाणा, वाशिम आणि वर्धा या जिल्ह्यांमध्ये कमी कर्जवाटप झाले आहे.
कर्जमाफी झालेल्या शेतकऱ्यांकडून बँकांनी ऑक्टोबर 2019 पासून कर्जमाफीची रक्कम मिळालेल्या तारखेपर्यंतच्या व्याजाची रक्कम वसूल करू नये, असंही बँकांना सांगण्यात आले आहे.
संबंधित बातम्या :
शेतकऱ्यांसाठी वर्धा जिल्हा प्रशासनाचा अभिनव उपक्रम, कृषी कर्जाच्या कागदपत्रांची फरफट थांबणार
BJP Andolan | आज भाजपचं राज्यभर शेतकरी कर्जवाटपसंदर्भात आंदोलन