अहो! गुलाबासारखे ओठ दिसतील, नवरा पुन्हा प्रेमात पडेल, फक्त हा उपाय करा
तुम्हालाही चिरतरुण दिसावं असं वाटत असेल तर आज आम्ही एक खास टिप्स सांगणार आहोत. ही टिप्स तुम्ही वापरली तर तुमचे ओठ हे गुलाबाच्या पाकळ्यांप्रमाणे मऊ दिसेल. ओठांच्या सौंदर्यासाठी बाजारात अनेक प्रकारचे लिप बाम आणि मॉइश्चरायझर उपलब्ध असले तरी आम्ही सांगितलेला पर्याय पाहाच.
आज आम्ही तुम्हाला एक खास टिप्स सांगणार आहोत. तुम्हाला ओठ गुलाबाच्या पाकळ्यांसारखे करायचे असेल तर ही बातमी संपूर्ण वाचा. चेहऱ्याच्या सौंदर्यात ओठ सर्वात महत्त्वाची भूमिका बजावतात. हे तुम्हाला माहिती आहे. आपले ओठ हे अतिशय संवेदनशील असल्याने थंडीच्या दिवसात त्यांची थोडी अधिकची काळजी घ्यावी लागते. असं न केल्यास आपले ओठ कोरडे आणि रंगहीन होऊन भेगा दिसू लागतात. आता यासाठी काय उपाय करावा, याचं उत्तर तुम्हाला पुढे मिळेल.
ओठांच्या सौंदर्यासाठी बाजारात अनेक प्रकारचे लिप बाम आणि मॉइश्चरायझर उपलब्ध असले तरी केमिकल असल्याने ते जास्त काळ वापरणे आरोग्यदायी नसते. त्याऐवजी तुम्ही मध वापरू शकता. याचे फायदे आपण येथे जाणून घेऊ शकता. पुढे वाचत राहा.
कोरड्या ओठांपासून सुटका मिळवा
तुमचे ओठ खूप लवकर कोरडे पडत असतील तर त्यासाठी तुम्ही मधाचा वापर करू शकता. मधातील मॉइश्चरायझिंग क्वालिटीमुळे आपल्या ओठांचा ओलावा बराच काळ टिकून राहतो. तसेच ते पूर्णपणे नैसर्गिकही आहे त्यामुळे कुठलंही टेन्शन नाही.
मध ओठांसाठी एक नैसर्गिक स्क्रब
ओठांवर मृत त्वचा जमा झाल्यामुळे ती खूप कोरडी दिसू लागते. तसं तर ते आपोआप बाहेर यायला लागतं, पण या प्रक्रियेदरम्यान ओठांचं सौंदर्य पूर्णपणे बिघडतं. आपला चेहरा यामुळे चांगला दिसत नाही. अशा वेळी मध नैसर्गिक स्क्रबप्रमाणे काम करते. त्यात एक प्रकारचे एन्झाइम असेल तर मृत त्वचा अगदी सहज काढून टाकली जाते.
ओठांचा रंग वाढवते
तुम्ही तुमच्या ओठांची काळजी न घेतल्याने आणि धूम्रपान केल्यामुळे ओठांचा नैसर्गिक रंग अनेकवेळा बदलतो. आपले ओठ काळे दिसतात. अशावेळी ओठांचा रंग टिकवून ठेवण्यासाठी मध खूप फायदेशीर ठरतो.
ओठांसाठी अशा प्रकारे करा मधाचा वापर
मध घेऊन ओठांवर लावा आणि त्यात काहीही न मिसळता बोटांनी थेट ओठांवर चोळा. ओठांना मधाने 2-3 मिनिटे मसाज करा आणि नंतर स्वच्छ ओल्या टॉवेलने स्वच्छ करा. चांगल्या परिणामांसाठी, आपल्याला रोज 1-2 वेळा ही प्रक्रिया करावी लागेल.
एक लक्षात घ्या की, आपल्या शरीरावर कोणताही प्रयोग करताना तज्ज्ञांचा सल्ला घ्या. कारण, असे अनेक प्रकरणं समोर आले आहेत, ज्यामुळे चांगल्या हेतूने शरीरावर उपाय करण्यात आला पण नंतर त्याचे दुप्षपरिणाम जाणवू लागले. त्यासाठी काहीही करताना तज्ज्ञांचा सल्ला आवश्य घ्या.
( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)