Sushant Singh Rajput suicide | 12 स्वप्नांना गवसणी, 38 स्वप्नं अपूर्ण ठेवून सुशांतचा निरोप

सुशांत सिंह राजपूतने स्वत:चं जीवन संपवलं. मात्र, याआधी त्याने स्वतः आपल्या आयुष्यात 50 स्वप्न पाहिली होती (50 Dreams of Sushant Singh Rajput)

Sushant Singh Rajput suicide | 12 स्वप्नांना गवसणी, 38 स्वप्नं अपूर्ण ठेवून सुशांतचा निरोप
Follow us
| Updated on: Jun 14, 2020 | 6:11 PM

Sushant Singh Rajput suicide मुंबई : अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येने बॉलिवूड हादरलं आहे. (50 Dreams of Sushant Singh Rajput) बॉलिवूडसोबतच कला, सांस्कृतिक, राजकारण, शिक्षण अशा सर्वच क्षेत्रातील दिग्गजांनी या घटनेबद्दल आश्चर्य व्यक्त करताना दुःख व्यक्त केलं आहे. वयाच्या अवघ्या 34 व्या वर्षी आत्महत्या करुन सुशांत सिंह राजपूतने स्वत:चं जीवन संपवलं. मात्र, याआधी त्याने स्वतः आपल्या आयुष्यात 50 स्वप्नं पाहिली होती (50 Dreams of Sushant Singh Rajput). याबाबत त्याने 14 सप्टेंबर 2016 रोजी स्वतः ट्विट करत आपल्या 50 स्वप्नांची यादी जाहीर केली होती. मात्र, त्याने 12 स्वप्नांना गवसणी घालून 38 स्वप्नं अपूर्ण ठेवत निरोप घेतला.

सुशांत सिंह राजपुतने केवळ 50 स्वप्नं पाहिलीच नाही, तर त्यातील अनेक स्वप्न पूर्ण देखील केली. त्याने आपल्या 50 स्वप्नांपैकी जवळपास 12 स्वप्नं पूर्ण केली. जेव्हा जेव्हा त्याने आपलं स्वप्न पूर्ण केलं, तेव्हा त्याने ट्विटरवर याची माहिती देत ट्विट केलं. या प्रत्येक ट्विटमध्ये त्याने माझी स्वप्नं जगत आहे (#LivingMyDreams) आणि माझ्या स्वप्नांवर प्रेम करत आहे (#LovingMyDreams) हॅशटॅगही वापरले.

सुशांतने आपल्या यादीत प्रवास, खेळ, साहस, कौशल्ये, सामाजिक काम, जुन्या ठिकाणांना भेटी अशा अनेक प्रकारच्या स्वप्नांचा आपल्या यादीत समावेश केला होता.

यात त्याचं पहिलंच स्वप्न विमान कसं चालवायचं हे शिकण्याचं होतं. त्याचं दुसरं स्वप्न जागतिक दर्जाच्या ‘आयर्नमॅन ट्रायथॅलॉन’ मॅरेथॉनमध्ये सहभागी होण्याचं होतं. ही जगातील सर्वाधिक कठीण मॅरेथॉन समजली जाते. यात एकाच वेळी एकामागोमाग पोहवं, सायकल चालवावं आणि पळावं लागतं. त्याने आपल्या यादीतील ही दोन्ही स्वप्न पूर्ण केली होती.

सुशांत मुळात उजवा होता. मात्र, त्याला डावखुऱ्या फलंदाजाप्रमाणे क्रिकेट खेळायचं होतं. हे त्याचं तिसरं स्वप्न होतं. यात फलंदाजी आणि गोलंदाजी दोघांचा समावेश होता. त्याने आपलं हेही स्वप्न पूर्ण केलं.

त्याला समुद्रातील ब्लू होलमध्ये देखील पोहायचं होतं. त्याने आपलं ते स्वप्न देखील पूर्ण केलं. यानंतर त्याने थेट आपलं बारावं स्वप्न पूर्ण केलं. हे स्वप्न होतं त्याचं जुनं कॉलेज असलेल्या दिल्ली तांत्रिक विद्यापीठाला (दिल्ली टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटी) भेट द्यायचं. याप्रमाणे त्याने एक दिवस अचानक कॉलेजला भेट दिली. यावेळी त्याने कॉलेजच्या लायब्ररीला भेट दिली, कॅन्टीनमध्ये बर्गर खाल्ल आणि त्यानंतर विद्यार्थ्यांसोबत सेल्फी देखील काढले.

सुशांत चित्रपटात काम करत असला तरी देखील त्याला तंत्रज्ञान आणि वैज्ञानिक संशोधन याची मोठी गोडी होती. त्यामुळेच त्याने गॉड पार्टिकलसह अनेक मोठे शोध लावलेल्या लार्ज हॅड्रोन कॉलायडरलाही भेट दिली. येथे उर्जा कणांची टक्कर घडवून आणण्यासाठी बनवलेले जगातील सर्वात मोठे मशिन आहे.

सुशांत सिंह राजपुतने आपल्या आयुष्यात 50 स्वप्नं पाहिली. मात्र, त्याने त्यातील केवळ 12 स्वप्नं पूर्ण केली. उर्वरीत 38 स्वप्नं पाहण्याआधीच त्याने आत्महत्या करत आपलं जीवन संपवलं. त्याने आपल्या स्वप्नांपैकी शेवटचं स्वप्न 15 ऑक्टोबर 2019 रोजी पूर्ण केलं होतं. त्यानंतर मात्र, त्याने या 50 स्वप्नांच्या यादीतील स्वप्नं पूर्ण करण्याविषयी ट्विट केलं नाही.

संबंधित बातम्या :

Sushant Singh Suicide | सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येने बॉलिवूड हादरलं, हळहळलं आणि कोसळलं!

Sushant Singh Rajput | सुशांत सिंह राजपूतची आत्महत्या, शेवटच्या क्षणी नेमकं काय घडलं?

Sushant Singh Rajput | अंधुक भूतकाळ अश्रूवाटे ओघळतोय, आईच्या आठवणीतील सुशांतची अखेरची पोस्ट

Sushant Singh Rajput | चार दिवसापूर्वी मॅनेजरची इमारतीवरुन उडी, आज सुशांतचा गळफास

Sushant Singh Rajput suicide | सुशांतच्या आत्महत्येचं वृत्त धोनी पचवू शकेल का? धोनीच्या प्रतिक्रियेची प्रतीक्षा

Sushant Singh Rajput | अब शहर भर जिक्र मेरी खुदकुशी का.. संजय राऊत-उद्धव ठाकरेही हळहळले

Sushant Singh Rajput | सुशांतपूर्वी आत्महत्या केलेले कलाकार, दिग्गजांच्या Suicide ने बॉलिवूड शोकसागरात

Sushant Singh Rajput Chhichhore | शेवटच्या सिनेमात आत्महत्या न करण्याचा मंत्र, आठ महिन्यांनी स्वत:चं जीवन संपवलं

सुशांत सिंहच्या आत्महत्येनंतर अंकिता लोखंडेला धक्का, दुसऱ्या क्षणी फोन ठेवला

Sushant Singh Rajput | गळ्यावर दोरीचा व्रण, सुसाईड नोट नाही, सुशांतच्या आत्महत्येचं प्राथमिक कारण पोलिसांनी सांगितलं!

Sushant Singh Rajput suicide | मैत्रिणीसोबत नव्या फ्लॅटचा शोध, सहकाऱ्याने फोन न उचलणे, दाटून आलेलं नैराश्य ते गळफास

Sushant Singh Rajput suicide LIVE UPDATE | सुशांतचं पार्थिव कूपर रुग्णालयात

50 Dreams of Sushant Singh Rajput

'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप.
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?.
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली.
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात.