भाजपच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर केली, मोदी, गडकरी, हेमा मालिनींसह 30 नेते करणार प्रचार, यांना वगळले
भाजपकडून 30 नेत्यांची प्रचारासाठी यादी जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये देशातील मुख्य चेहरे आहेत. पंतप्रधान मोदी, पक्षाध्यक्ष जेपी नड्डा, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, गृहमंत्री अमित शाह, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, पक्षाच्या खासदार हेमा मालिनी, नितीन गडकरी यांच्यासह सुमारे ३० भाजप नेते निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील उमेदवारांचा प्रचार करणार आहेत.
उत्तर प्रदेश – भाजपकडून (BJP) युपीची निवडणुक (UP ELECTION) जिंकण्यासाठी अधिक कंबर कसल्याचे आपण पाहतोय, निवडणुका जाहीर झाल्यापासून अधिक बदल सुध्दा झाल्याचे पाहतोय. तसेच अनेक आमदारांनी आणि मंत्र्यांनी भाजपसोडून गेल्याचंही चित्र होतं. त्यामुळे भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाकडुन चांगल्या आणि ओबीसी (OBC) उमेदवारांना स्थान दिल्याची युपीत चर्चा आहे.
भाजपकडून 30 नेत्यांची प्रचारासाठी यादी जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये देशातील मुख्य चेहरे आहेत. पंतप्रधान मोदी, पक्षाध्यक्ष जेपी नड्डा, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, गृहमंत्री अमित शाह, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, पक्षाच्या खासदार हेमा मालिनी, नितीन गडकरी यांच्यासह सुमारे ३० भाजप नेते निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील उमेदवारांचा प्रचार करणार आहेत.
याशिवाय भाजपचे प्रदेशाध्यक्ष स्वतंत्र देव सिंह, यूपी भाजपचे निवडणूक प्रभारी धर्मेंद्र प्रधान हे देखील यादीतील पक्षाच्या उमेदवारांचा प्रचार करणार आहेत. यूपीचे सीएम योगी आदित्यनाथ, यूपीचे प्रभारी राधामोहन सिंग, केंद्रीय मंत्री मुख्तार अब्बास नक्वी, केंद्रीय मंत्री स्मृती इराणी, डेप्युटी सीएम केशव प्रसाद मौर्य, डेप्युटी सीएम दिनेश शर्मा केंद्रीय मंत्री संजीव बल्यान हे देखील प्रचार करणार आहेत.
तर भाजपचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय मिश्रा टेनी यांचे नाव स्टार प्रचारकांच्या यादीतून गायब आहे. याशिवाय वरुण गांधी, मनेका गांधी यांचीही नावे प्रचारकांच्या यादीत नाहीत.
मथुरेच्या खासदार हेमा मालिनीही प्रचार करणार भाजपच्या स्टार प्रचारकांच्या यादीत मथुरेच्या खासदार हेमा मालिनी यांच्या नावाचाही समावेश आहे. याशिवाय यूपीचे परिवहन मंत्री अशोक कटारिया, सुरेंद्र नागर, जनरल व्हीके सिंह, चौधरी भूपेंद्र सिंह, बीएल वर्मा, राजवीर सिंग, एसपी सिंह बघेल, साध्वी निरंजन ज्योती, कांता कर्दम हे देखील पक्षाच्या उमेदवारांचा प्रचार करणार आहेत. दुसरीकडे रजनीकांत माहेश्वरी, मोहित बेनिवाल, धर्मेंद्र कश्यप, जेपीएस राठौर आणि भोला सिंह खाटिक, जसवंत सैनी हे देखील प्रचार करणार आहेत.