लॉकडाऊनदरम्यान तब्बल 69 हजार गुन्हे दाखल, 100 नंबरवर 77 हजार कॉल, दोन कोटीपेक्षा अधिक दंड

राज्यात सर्वत्र सुरु असलेल्या लॉकडाऊनदरम्यान 22 मार्च ते 24 एप्रिल या कालावधीत (Lockdown in Maharashtra) 69 हजार 374 गुन्हे दाखल झाले असून 14 हजार 955 व्यक्तींना अटक करण्यात आली आहे.

लॉकडाऊनदरम्यान तब्बल 69 हजार गुन्हे दाखल, 100 नंबरवर 77 हजार कॉल, दोन कोटीपेक्षा अधिक दंड
Follow us
| Updated on: Apr 25, 2020 | 7:04 PM

मुंबई : राज्यात सर्वत्र सुरु असलेल्या लॉकडाऊनदरम्यान 22 मार्च ते 24 एप्रिल या कालावधीत (Lockdown in Maharashtra) कलम 188 नुसार 69 हजार 374 गुन्हे दाखल झाले असून 14 हजार 955 व्यक्तींना अटक करण्यात आली आहे. या कालावधीत झालेल्या विविध गुन्ह्यांसाठी 2 कोटी 63 लाख रुपयांचा दंड आकारण्यात आला आहे, अशी माहिती पोलीस विभागाच्यावतीने प्रसिद्धीपत्रकामार्फत देण्यात आली आहे (Lockdown in Maharashtra).

लॉकडाऊनदरम्यान राज्यभरात पोलीस विभागाच्या 100 नंबरवर 77 हजार 670 फोन आले. त्यासर्वांची योग्य ती दखल घेण्यात आली. राज्यभरात पोलिसांनी ज्यांच्या हातावर क्वारंटाईन असा शिक्का आहे, अशा 602 व्यक्तींना शोधून त्यांना विलगीकरण कक्षात पाठवले. या काळात अवैध वाहतूक करणाऱ्या 1084 वाहनांवर गुन्हे दाखल करण्यात आले आणि 45,168 वाहने जप्त करण्यात आली. परदेशी नागरिकांकडून व्हिसा उल्लंघनचे 15 गुन्हे राज्यभरात नोंदवले आहेत.

पोलिसांवर हल्ला प्रकरणे

लॉकडाऊनदरम्यान पोलिसांवर हल्ला होण्याच्या 148 घटनांची नोंद झाली असून यात 477 आरोपींना अटक करण्यात आली आहे. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सर्वत्र युद्धपातळीवर प्रयत्न सुरु आहेत. पोलीस अधिकारी कर्मचारीदेखील 24 तास कार्यरत आहेत. या संकटाशी मुकाबला करताना दुर्देवाने 15 पोलीस अधिकारी आणि 81 पोलीस कर्मचारी हे कोरोना पॉझिटिव्ह आढळले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. त्यापैकी तीन पोलीस अधिकारी आणि चार कर्मचारी कोरोनामुक्त झाले असून उरलेल्या 12 पोलीस अधिकारी आणि 77 पोलीस कर्मचारी यांच्यावर उपचार सुरु आहेत.

मुंबई पोलिसातील कॉन्स्टेबलचा कोरोनाने मृत्यू

दरम्यान, कोरोनाच्या कचाट्यात पोलीस आणि वैद्यकीय सेवेतील कर्मचारीही येत आहेत. कोरोनाचा कहर वाढत असतानाच, मुंबईत एका 57 वर्षीय पोलीस कॉन्स्टेबलचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. संबंधित पोलीस मुंबईतील वाकोला पोलीस ठाण्यात कार्यरत होता. तर वरळी इथला रहिवासी होता.

संबंधित पोलिसाला कोरोनाची लागण झाल्यानंतर त्यांच्यावर कस्तुरबा रुग्णालयात उपचार सुरु होते. मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या निधनाने पोलीस दलात हळहळ व्यक्त होत आहे. मृत पोलीस कॉन्स्टेबलच्या मागे पत्नी, दोन मुलं आणि एक मुलगी असा परिवार आहे.

संबंधित बातम्या :

‘त्या’ एका रुग्णामुळे 235 जणांना कोरोना होण्याची भीती : तुकाराम मुंढे

मालेगावातील कोरोनाचा विळखा घट्ट, आणखी 8 जण पॉझिटिव्ह, एकूण आकडा 126 वर

'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?.
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप.
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?.
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली.