Lockdown : रेल्वेच्या चाकांसोबत गुन्हेही थांबले, लॉकडाऊनमध्ये विदर्भात लोहमार्गावर एकही गुन्हा नाही

नागपूर विभागात या दिवसात रेल्वे लोहमार्ग पोलिसांत एकही गुन्हा दाखल करण्यात आला नसल्याची माहिती आहे.

Lockdown : रेल्वेच्या चाकांसोबत गुन्हेही थांबले, लॉकडाऊनमध्ये विदर्भात लोहमार्गावर एकही गुन्हा नाही
Follow us
| Updated on: Apr 11, 2020 | 11:35 AM

वर्धा : कोरोनाची साखळी तोडण्याकरिता देशात (Lockdown Effect On Railway Crime) लॉकडाऊन लागू करण्यात आला. यात रेल्वेची चाकंही थांबली. रेल्वेची चाकं थांबली तेव्हापासून लोहमार्ग पोलिसांच्या स्टेशन डायरीचे एक पानही पलटलेले नाही, अशी माहिती समोर येत आहे. रेल्वेप्रमाणे रेल्वे पोलिसांची स्टेशन डायरीही लॉक (Lockdown Effect On Railway Crime) झाल्याचे दिसत आहे.

नागपूर विभागात या दिवसात रेल्वे लोहमार्ग पोलिसांत एकही गुन्हा दाखल करण्यात आला नसल्याची माहिती आहे. नागपूर विभागात नागपूर, वर्धा, गोंदिया, इतवारी, बडनेरा आणि अकोला या पोलीस स्टेशनचा समावेश आहे. वर्दळीच्या रेल्वे प्रवासात नेहमी गुन्हेगारीचे प्रमाण जास्त असते, लॉकडाऊनच्या काळात हे गुन्हेच लॉक झाले आहेत.

रेल्वे धावत असताना साधारणत: दिवसाला सरासरी आठ ते दहा चोरीचे गुन्हे आणि पाच ते सहा रेल्वे कटिंगच्या गुन्ह्याची नोंद होते. परंतू, लॉकडाऊन लागू झाला, तेव्हापासून नागपूर विभागात एकही गुन्हा दाखल झालेला नाही (Lockdown Effect On Railway Crime). यामुळे लोहमार्ग पोलीस सध्या समाजसेवेत व्यस्त असल्याचे दिसत आहे.

एका रात्रीत रेल्वे बंद झाल्याने अनेकजण रेल्वे स्थानकावर अडकले आहे. वर्धा जिल्हा प्रशासनाने अशा गरजुंकरिता निवासाची सोय केली असली, तरी इतर जिल्ह्यात मात्र तसे नसल्याचे दिसून आले आहे. यामुळे रेल्वेचे अधिकारी आणि कर्मचारी सध्या त्यांना जेवण पुरविण्याचं काम करत आहेत.

रेल्वे पोलिसांनी या लॉकडाऊनच्या काळात चार गुन्हे दाखल केले आहे. पण, ते जुनेच असल्याचे सांगण्यात आले आहे. यामुळे सध्या लोहमार्ग पोलिस खऱ्या अर्थाने लॉकडाऊनचा (Lockdown Effect On Railway Crime) उपयोग करत आहेत.

संबंधित बातम्या :

Sangli Corona : सांगलीने करुन दाखवलं, एकाच कुटुंबातील 25 रुग्ण कोरोनामुक्त

लॉकडाऊनमुळे परराज्यात अडकलेल्यांना पुणे पोलिसांचा मोठा दिलासा

Corona : धक्कादायक! पुण्याचा कोरोना मृत्यूदर देशाच्या दुप्पट

Corona : जगाची खबरबात! जगात ‘कोरोना’मुळे एक लाख बळी, 101 व्या दिवशी ओलांडला टप्पा

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.