Lockdown | लॉकडाऊनदरम्यान कसाबसा गावी पोहोचला, क्वारंटाईन केलेल्या तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या
क्वारंटाईन करण्यात आलेल्या तरुणाने झाडाला गळफास घेत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना मारेगाव तालुक्यातील गोंडबुरांडा येथे घडली आहे.
यवतमाळ : क्वारंटाईन करण्यात आलेल्या तरुणाने झाडाला गळफास घेत (Yawatmal Youth Commit Suicide) आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना मारेगाव तालुक्यातील गोंडबुरांडा येथे घडली आहे. गोंडबुरांडा येथील जिल्हा परिषद शाळेत अहमदनगरवरुन आलेल्या तरुणाला क्वारंटाईन करण्यात आलं होतं. कोरोनाच्या भीतीने गावातील ग्रामस्थ जवळ येत नसल्याने या तरुणाने हे टोकाचं पाऊल उचलल्याचं (Yawatmal Youth Commit Suicide) म्हटलं जात आहे.
रामा विठ्ठल आत्राम असं आत्महत्या करणाऱ्या 25 वर्षीय तरुणाचं नाव आहे. मारेगाव तालुक्यातील गोंडबुरांडा येथे रामा विठ्ठल आत्राम, हनुमान अय्याजी आत्राम (वय 20) आणि सुरेश अरुण आत्राम (वय 21) हे तिघे अहमदनगर येथील खाजगी कंपनीत कामाला होते. कोरोनामुळे सर्वत्र लॉकडाऊन झाल्याने हे तिघेही नगर येथे अडकून पडले.
मजुरांना त्यांच्या गावी जाण्यासाठी लॉकडाऊनमध्ये थोडी शिथिलता आणण्यात आली. त्यानंतर हे तिघेही बसने यवतमाळ आणि यवतमाळवरुन मारेगाव येथे कसेबसे पोहोचले. तिथे तालुका प्रशासनाने त्यांची आरोग्य तपासणी करुन गोंडबुरांडा येथील जिल्हा परिषद शाळेत क्वांरटाईन (Yawatmal Youth Commit Suicide) केलं.
गावात क्वांरटाईन करण्यात आलेले गावातील नागरिक आणि कुटुंबीय कोरोनाच्या भीतीने जवळ येत नव्हते. मात्र, त्यांना सर्व सोयी सुविधा पुरविण्यात येत होत्या. दोन दिवस एकांतवासात दिवस काढल्यावर मात्र रामा विठ्ठल आत्राम याचा संयम सुटला.
साताऱ्यात सासरच्या जाचाला कंटाळून विवाहितेची आत्महत्याhttps://t.co/NGe9CV6B6K
— TV9 Marathi (@TV9Marathi) May 8, 2020
14 मे रोजी दुपारी रामा आत्राम हा शौचाला जातो असं सांगून शाळूतून निघून गेला होता. मात्र, बराच वेळ होऊनही तो परतला नाही. त्यामुळे रामा आत्राम याची आई आणि दोन लहान भावंड त्याला शोधू लागले. दोन दिवस शोध घेऊनही रामा आत्राम कुठेही सापडला नाही.
मात्र, आज (16 मे) दोन दिवसांनी गावातील शेतकरी जनावरे पाणी पाजण्यासाठी गावा जवळच्या तलावावर गेले असता त्यांना रामा आत्राम हे पळसाच्या झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला. या प्रकरणी प्रशासनाने हलगर्जीपणा केल्याचा आरोप (Yawatmal Youth Commit Suicide) ग्रामस्थांनी केला आहे.
संबंधित बातम्या :
PSI पतीच्या बंदुकीतून गोळीबार, पोलीस पत्नीची आत्महत्या
साताऱ्यात सासरच्या जाचाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या
पोलिसांसोबत नाकाबंदीची ड्युटी, अंगावर ट्रक घालून चालकाने शिक्षकाला चिरडले