पुण्यातील विवाह इच्छुकांना दिलासा, 50 लोकांच्या उपस्थितीत लग्न करता येणार
पुण्यात लॉकडाऊनदरम्यान विवाह करु इच्छुकांना मोठा दिलासा मिळाला आहे (Lockdown in Pune).
पुणे : पुण्यात लॉकडाऊनदरम्यान विवाह करु इच्छुकांना मोठा दिलासा मिळाला आहे (Lockdown in Pune). पुणे जिल्ह्यात कंटेनमेंट झोन वगळता कुठेही 50 नातेवाईकांच्या उपस्थितीत लग्न करण्यास आता परवानगीची गरज नाही. मात्र, यासाठी काही महत्त्वाच्या सूचना जारी करण्यात आल्या आहेत. विशेष म्हणजे लग्न समारंभात सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे पालन होणे जरुरीचं आहे. सरकारच्या 3 मे रोजी लॉकडाऊन शिथिल करण्याच्या आदेशामधील मार्गदर्शक सूचनांमध्ये याबाबत उल्लेख करण्यात आला आहे (Lockdown in Pune).
लग्नासाठी महत्त्वाच्या सूचना
- पुणे जिल्ह्यात 50 लोकांमध्ये लग्न करण्यासाठी परवानगीची गरज नाही.
- कंटेनमेंट झोन वगळता जिल्हांतर्गत कुठेही जाऊन लग्न करता येऊ शकते.
- पुणे शहर आणि पिंपरी-चिंचवड शहरासह जिल्ह्यातील इतर कंटेनमेंट झोन वगळून जिल्हांतर्गत लग्नासाठी परवानगीची गरज नाही
- सुरक्षित सामाजिक अंतर ठेवून आणि नियमांचं काटेकोर पालन बंधनकारक
- कंटेनमेंट झोनमधील व्यक्तींना या लग्न सोहळ्यासाठी उपस्थित राहता येणार नाही. त्याचबरोबर कोणालाही कंटेनमेंट झोनमधून ये-जा करता येणार नाही
कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी देशभरात लॉकडाऊन घोषित करण्यात आलं. या लॉकडाऊनदरम्यान धार्मिक कार्यक्रमे, लग्न समारंभ सारख्या कार्यक्रमांवर बंदी घालण्यात आली होती. कोरोनाचा संसर्ग होऊ नये म्हणून सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे काटेकोर पालन केले जावे, असं आवाहन प्रशासनाकडून केलं जात आहे. त्यामुळे अनेक ठरलेले लग्न सोहळे रद्द झाले. मात्र, आता सरकारच्या लॉकडाऊन शिथिल करण्याच्या आदेशामध्ये जारी केलेल्या गाईडलाईन्समध्ये 50 लोकांमध्ये लग्न करणाऱ्यांना परवनागीची गरज नाही, असं सांगण्यात आलं आहे. त्यामुळे विवाह इच्छुकांना दिलासा मिळाला आहे.
संबंधित बातम्या :
Pune Corona | पुणे विभागात कोरोना रुग्णांची संख्या 4 हजारांच्या पार
Maharashtra Corona Update | राज्यातील कोरोनाबाधितांचा आकडा 29 हजारांवर, मुंबईत 17,671 रुग्ण