महाराष्ट्रासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे LIVE अपडेट्स…
नागपूर : गृहमंत्री अनिल देशमुख, ऊर्जामंत्री नितीन राऊतांच्या कार्यक्रमात अचानक शॉटसर्किट, मंचापासून 100 फूट अंतरावर घटना घडली. या कार्यक्रमात मंडपाच्या एका कोपऱ्यात शॉर्टसर्किट होऊन छोटी ठिणगी पडली होती. त्यामुळे किरकोळ आग लागली. यानंतर लगेचच उपस्थित डेकोरेशन कर्मचारी आणि पोलिसांनी मंडपाचा कपडा फाडून फेकला. त्यामुळे सुदैवाने धोका टळला.
मुंबई : अखिल भारतीय किसान सभेच्या मोर्चा मुंबईत दाखल, किसान मोर्चा वडाळा शिवडी मार्गे आझाद मैदानात धडकणार, पोलीस प्रशासनाकडून कडेकोट पोलीस बंदोबस्त, मोर्चात राज्यभरातील विविध जिल्ह्यातून हजारो शेतकरी सहभागी
ओबीसींच्या जनगणनेचा मार्ग मोकळा करा आणि आम्हाला न्याय द्या, असे आवाहन वडेट्टीवारांनी केंद्राला केले. मुख्यमंत्र्यांकडे ओबीसींच्या जनगणनेची मागणी केली. वेळ पडल्यास विधानसभेत जनगणनेचा प्रस्ताव आणण्याची मागणी करू, असेही वडेट्टीवार म्हणाले
जालना : ओबीसींची जनगणना करावी, सरकारपर्यंत ओबींसीचा आवाज पोहोचवणार, आरक्षणाला धक्का लावू नका, संघर्षाची लढाई करताना कशाचीही पर्वा नाही, विजय वडेट्टीवारांचा निर्धार
जालना ब्रेकिंग :-
ओबीसी मोर्चाच्या सभेला सुरुवात
अंबड चौफुली येथील मैदानात सभेला सुरुवात
सभेला हजारो ओबीसी बांधव उपस्थित
अनेक आजी माजी मंत्र्यांची सभेच्या ठिकाणी उपस्थिती
– नाशिक येथे नियोजित 94 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाचे नाव थोड्याच वेळात होणार जाहीर
– जयंत नारळीकर यांच्या नावावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता
– अध्यक्ष निवडीच्या बैठकीत भारत सासणे आणि जयंत नारळीकर या नावात रस्सीखेच सुरू
जालना –
ओबीसी मोर्चात झाळकले आत्ता मुख्यमंत्री ओबीसीचाच असे बॅनर,
ओबीसी मोर्चाने जाती जनगणनेच्या मागणीसाठी व अन्य मागम्यांसाठी काढला मोर्चा,
मोर्चात मोर्चेक-यांनी झलकविले बॅनर
पौष महिन्यातील एकादशी निमित्त आज आळंदी मध्ये संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज समाधी मंदिरा मध्ये आज फुलांची आकर्षक रोषणाई करण्यात आली
-दर्शनासाठी आळंदी मध्ये ही भाविकांनी गर्दी केलीय
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांचे नगर शहरात आगमन,
आमदार अरुण जगताप, संग्राम जगताप, यांच्या निवासस्थानी पवारांचे आगमन,
आमदार निलेश लंके, आमदार लहू कानडे उपस्थित
भिवंडी शहरातील चाविंद्रा राम नगर येथील डम्पिंग ग्राऊंडला आग .
आगीत डम्पिंग ग्राऊंड वरील लाखो रुपये खर्च करून बसविलेली कचरा विघटन करणारी बायोमायनिंग मशीन
जाळून खाक झाली आहे.
रत्नागिरी – चिपळूण तालुक्यातील कापसाळ मध्ये धक्कादायक प्रकार
ग्रामपंचायत कापसाळ इलेक्शन संपून काही दिवस होताच
तोच माजी सरपंच भारती दाते राहणार कापसाळ पायरवाडी
यांच्या घराच्या अंगणामध्ये उभ्या असलेल्या त्यांच्या मालकीच्या दोन दुचाकी गाड्यांना रात्री एक वाजता काही समाजकंटकांनी पूर्णपणे जाळून टाकले
गाड्या जाळण्याचे लोण आता ग्रामीण भागात
चिपळूण पोलिसांचा तपास सुरु
मराठा क्रांती मोर्चा तर्फे आजाद मैदान येथे आंदोलन सुरू आहे।
शरद पवार –
येथील अगस्ती सहकारी साखर कारखाना कर्जाच्या बोजाखाली असल्याच कळाल…
200 कोटीच कर्ज झाले , जे या कर्जाला जबाबदार आहे ते शुक्राचार्य बाजुला करा…
कारखाना चालवण्यासाठी सर्व ती मदत मी करतो….
मधुकर पिचड यांचा पवारांकडुन शुक्राचार्य असा उल्लेख…
शरद पवार –
पर्यावरणाचे रक्षण करणे गरजेचे आहे…
मात्र स्थानिक नागरिकांशी समन्वय असणे गरजेचे….
पर्यटन स्थळ इको सेन्सेटिव्ह झोन करण्याच्या मागणीवर पवारांचे वक्तव्य…
तालूका इको सेन्सेटिव्ह झोन झाला तर विकासाला अनेक मर्यादा..
शरद पवार भाषण …
जनतेला पक्ष बदलाची भुमिका आवडत नाही…
विधानसभेला मी अकोल्यात सभा घेतल…
त्यावेळी जनतेच्या मनातल कळाल…
जनतेला परिवर्तन हव होत…ते झाल
पालकमंत्री हसन मुश्रीफ तुम्ही भाषणातुन जे आश्वासन दिले ते पुर्ण करा….
अडचणी आल्या तर मला सांगावं…
भंडारदरा मला आवडणारा परिसर , सर्वात पहिले मी ९ वीत शिकत असताना सायकल वर मी रंधाफॉल बघण्यासाठी लोणी ते भंडारदरा आलो होतो…
या भागातील लोकांना दुर्लक्षीत करू नका….
शरद पवार भाषण …
कै. यशवंत भांगरे हे माझ्या अगोदर ५ वर्ष अगोदर विधानसभेत …
ते मला ज्येष्ठ आहेत …
अकोले तालुक्यात अनेक महत्वाच्या संस्था उभारणीत भांगरे याचा मोठा सहभाग…
अकोले तालुक्यात परिवर्तन करत साथ दिली अशीच पुढेही द्यावी…
सर्व नेते एकजुटीने सोबत आले …
मी सर्व गोष्टी केल्या मात्र एक दिड वर्षापासुन आमच्या अनेक सहका-यांच्या अंगात यायला लागलं …
पिचड यांच नाव घेता पवारांची टिका …
जालन्यातील ओबीसी मोर्चासाठी भेट इचलकरंजीहून पारंपारिक धनगरी ढोल वादन करणारे पथक दाखल झाले आहे. वेगवेळ्या ढोल तळाच्या लाईवर नृत्य करत ढोल वाजवलं जात आहे.
जिल्ह्याचे पालकमंत्री नवाब मलिक हे आज परभणी दौऱ्यावर आहेत.
दुपारी 2 वाजता जिल्हाधिकारी कार्यालय परभणी येथे निवेदने स्विकारुन ते जनेतेशी संवाद साधणार आहेत
राष्ट्रवादी भवन येथे कार्यकर्त्यांची बैठक घेणार आहेत.
लालू प्रसाद यादव यांचा एम्समध्ये उपचाप सुरू
राम कदम यांचा अब्दूल सत्तार यांना टोला…
– सत्तारांनी ऊद्धव ठाकरे दानशूर आणि भाजप भिकारी असं केलं होतं वक्तव, या वक्तव्यावर टिका…
– राममंदिराच्या निर्माणमध्ये प्रत्येक हिंदू बांधवांची आणि रामभक्तची मनापासून इच्छा आहे की निर्माणमध्ये मंदिराची एक विट का होईना आपली असावी असे असताना देखील,, मंदिर निर्माणमध्ये भाग घेणाऱ्या हिंदू बांधव रामभक्तांना भिकारी संबोधने ? हे शिवसेनेचे कोणते हिंदुत्व ? असा सवाल…
नाशिकमध्ये होणारे 94 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन
– 26 ते 28 मार्च तारखा जवळपास निश्चित
– अध्यक्षपदी कोण हे आज ठरणार
– अध्यक्षपदासाठी 9 दावेदारांच्या नावावर होणार चर्चा
– साहित्यिक जयंत नारळीकर, रामचंद्र देखणे, जनार्दन वाघमारे, तारा भवाळकर, अनिल अवचट, रवींद्र शोभणे, मनोहर शहाणे,भारत सासणे, गणेश देवी यांचं नाव
– बैठकीनंतर पत्रकार परिषदेत अध्यक्ष पदाच्या नावाची आणि तारखांची केली जाणार अधिकृत घोषणा
बारामती : साताऱ्याचे आमदार शिवेंद्रसिंह राजेभोसले अजितदादांच्या भेटीला
बारामतीतील विद्या प्रतिष्ठानमध्ये अजित पवार-शिवेंद्रराजे यांच्यात चर्चा सुरु
अजित पवार यांच्याशी स्वतंत्र कक्षात भेट
गेल्या दहा मिनिटांपासून शिवेंद्रराजे अजितदादांसोबत..
राष्ट्रवादीचे नेते शरद पवार आज अहमदनगर जिल्ह्याच्या दौऱ्यावर
माजी आमदार यशवंतराव भांगरे पूर्णाकृती पुतळा अनावरण समारंभाला थोडयाच वेळात सुरूवात
शेतकरी मेळाव्याचही आयोजन
शरद पवार यांच्यासह जयंत पाटील, महसुलमंत्री बाळासाहेब थोरात, हसन मुश्रीफ व प्राजक्त तनपुरे यांच्या उपस्थितीत सोहळा
जालन्यातील ओबीसी मोर्चाला पोलिसांची अद्याप परवानगी नाही
आज जालन्यात निघतोय ओबीसींचा भव्य मोर्चा
विजय वडडेट्टीवार यांच्यासह अनेक नेते रहाणार उपस्थित
ओबीसींच्या मोर्चाला अद्याप परवानगी नाही
ओबीसी संघटनांकडून मोर्चाची जय्यत तयारी
पेण येथील तरुणावर खारघर येथे गोळीबार
गोळीबार मध्ये तरुण प्रतीक अहेर गंभीर जखमी
प्रतीक अहेर वर एम.जी.एम.हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू
काल रात्रीची कोपरा ब्रिज जवळ घटना
फायरिंग मध्ये तरुणाच्या मांडीला लागली गोळी
दोन दिवसांपूर्वी नाशिकमध्ये झालेल्या पुजा आखाडे या विवाहित महिलेचा खून प्रियकरानेच केल्याचं पोलीस तपासात उघड
– आर्थिक देवाण घेवाण आणि संशयावरून गळा चिरून केला होता खून
– प्रियकर सागर उर्फ़ आदेश भास्करला सुरतमध्ये पोलिसांनी ठोकल्या बेड्या
बारामती : उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा बारामती दौरा, विद्या प्रतिष्ठानमध्ये अजितदादांना भेटण्यासाठी नागरीकांच्या रांगा, अजित पवारांकडून नागरीकांच्या प्रश्नांची सोडवणुक, अजितदादा घेतायत प्रत्येक नागरीकाची भेट
भारतीय किसान सभेच्या मोर्चाला घटनदेवीवरुन सुरुवात
थोड्याच वेळात कसारा पोहचणार मोर्चा.
मुंबईवरुन नाशिकच्या दिशेने जाणारी मार्गिका बंद करण्यात आलीय
एकाच मार्गिकेवर दोन्ही दिशेची वाहतूक वळल्याने वाहतूकीची कोंडी
शौचालय साफ करण्याचे औषध प्राशन करून आरोपीची आत्महत्या
पिशोर पोलीस ठाण्यातील कोठडीतील धक्कादायक प्रकार
भगवान महालकर असं आरोपीचं नाव
अल्पवयीन मुलीला पळवून नेल्याप्रकरणी होता अटक
शनिवारी दुपारच्या सुमारास घडला प्रकार
मुंबई नारकॉटिक्स कंट्रोल ब्यूरोची जुहू परिसरात धाड सुरू
काल उशिरा रात्रीपासून सुरू आहे धाड
आरोपी चिंकू पठान याच्या अटक केल्यानंतर अनेक ठिकाणी केली जात आहे कारवाई
भरधाव चारचाकीने दिली तब्बल 10 दुचाकींना धडक
दोन जणांचा जीव थोडक्यात वाचला
औरंगाबादच्या एमपी क्लासेस समोर घडला विचित्र अपघात
चारचाकी वरील नियंत्रण सुटल्यामुळे घडला अपघात
अपघाताचा थरार सीसीटीव्हीत कैद
10 ते 12 गाड्यांचं झालं मोठं नुकसान
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आज अहमदनगर जिल्हा दौऱ्यावर
शरद पवार यांच्या हस्ते दोन खाजगी हॉस्पिटलचे होणार उद्घाटन
दुपारी 2:30 वाजता नगर मधील सुरभी हॉस्पिटल तर 4 वाजता अँपल हॉस्पिटल चे उदघाटन
शरद पवार यांच्या हस्ते होणार उद्घाटन
नागपुरातील एसटी बस च गणेशपेठ आगार डीझल वाचविण्यात दुसऱ्या क्रमांकावर
पेट्रोलियम अनुसंधान संघ आणि इंडियन ऑइल कार्पोरेशन ने सर्वाधिक डीझल बचती साठी दिला दुसरा क्रमांक
वेगवेगळ्या उपाय योजना आखत नागपूर आगारने केली वर्षभरात 87 हजार लिटर डीझल ची बचत
सीरम इन्स्टिट्युटमधील आगीच्या घटनेचा हडपसर पोलिसांकडून पंचनामा करण्याचे काम सुरू
आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून विविध विभागांचा संयुक्त अहवाल आल्यानंतरच आगीचे कारण कळू शकणार
पाच पोलिस अधिकारी व पाच पोलिस कर्मचारी असे एकूण दहा पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांकडून पंचनामा करण्याचे काम सुरू
या आगीच्या घटनेची पुणे अग्निशामक दल, पीएमआरडीए, एमआयडीसी अग्निशामक दल तसेच न्यायवैद्यकय विभाग, विद्युत विभाग यांच्यातर्फे पाहणी
– नागपूर जिल्ह्याच्या विकासासाठी 411 कोटी रुपये खर्च करण्यात येणार
– सरकारने आखून दिलेली ही मर्यादा आहे मात्र 884 कोटी मंजूर करण्याची मागणी
– जिल्हा नियोजन समितीची झाली बैठक
– रखडलेली काम वेळेत पूर्ण करण्याचे पालकमंत्री यांचे निर्देश
– लॉ युनिव्हर्सिटीसाठी 10 कोटी रुपये
– हाय टेन्शन लाईनसाठी 351 कोटी मिळणार
– कोरडी औष्णिक केंद्रातून निघणाऱ्या राखेपासून शेतीच नुकसान होत आहे याकडे लक्ष केंद्रित करण्याची मागणी या बैठकीत करण्यात आली
– इतरही विकास कामांकडे लक्ष केंद्रित करण्याची मागणी या बैठकीत करण्यात आली
– यावेळी सत्ताधारी आणि विरोधी पक्षातील आमदार उपस्थित होते
नागपूर महापालिका हद्दीतील शाळा 8 फेब्रुवारी पासून होणार सुरू
5 वी ते 8 चे वर्ग होणार दुसऱ्या टप्प्यात सुरू
कोविड चे सगळे नियम पाळून शाळा सुरू करण्याचे पालिका आयुक्त राधाकृष्णन बी यांचे आदेश
सर्व शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना करावी लागणार कोरोना चाचणी
मात्र नागपूर ग्रामीण मधील शाळा 27 जानेवारी पासून होत आहे सुरू
नवनिर्वाचित महिला ग्रामपंचायत सदस्यांच्या ऐवजी त्यांचे पती सत्कारासाठी आल्याने यशोमती ठाकुरांकडून जाहीर निषेध , तर बिनविरोध ग्रामपंचायतीला निधी कमी पडू देणार नसल्याचे आश्वासन
हडपसर, रामटेकडी येथील औद्योगिक वसाहत कचरा प्रकल्पात लागलेली आग नियंञणात आल्याची अग्निशमन दलाकडून माहिती. जखमी कोणी नाही
सांगली – कुपवाडमध्ये गुंडांचा दगडाने ठेचून निर्घृण खून सख्या भावानेच केला निर्घृणपणे खून.
कुपवाड परिसरात राहणाऱ्या सन्या उर्फ शुभम परसमल जैन या गुंडांचा त्याच्याच सख्या भावाने खून केला.
आनंद दवे, अध्यक्ष,
ब्राह्मण महासंघ
– एक महिन्यात असा काय फरक पडला की परवानगी दिली
– कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल म्हणून 1 जानेवारीला एल्गारला परवानगीस नकार देणारे पोलीस प्रशासन 30 जानेवारीला मात्र परवानगी देत आहे
– ना वक्ते माहिती आहेत, ना परिषदेचा उद्देश ना निम्मित ना गरज पण परवानगी मात्र दिली
– अभिव्यक्ती स्वातंत्र्य आम्हाला पण मान्य आहे पण त्या नावाखाली स्वैराचार होऊ नये एवढीच आमची इच्छा आहे.
– प्रशासन त्या निम्मिताने काय काळजी घेणार आहे ते पण एकदा स्पष्ट करावे की भाषणे रेकॉर्ड करूनच त्याचा अभ्यास करणार आहे
– या परवानगी चा फेरविचार जरी केला नाही तरी योग्य समज आणि बंधने आपल्या कडून आयोजक समिती ला दिली जावी
– अशा आशयचे पत्र उद्या रविवारी सकाळी 11.30 वाजता आम्ही स्वारगेट पोलिसांना देणार आहोत
– तसेच मा.कोळसे पाटील यांना सुद्धा आम्ही आमच्या वतीने एक पत्र देणार असून त्यासाठी त्यांची वेळ मागितली आहे