Maharashtra Breaking Marathi News Live | सकाळचा भोंगा रोज बघतो पण त्या भोंग्यावर मला जायचं नाहीय- श्रीकांत शिंदे

| Updated on: May 10, 2023 | 7:07 AM

Maharashtra Breaking and Marathi News Live : राज्यातील आणि देशातील महत्त्वाच्या घडामोडी जाणून घ्या. तुमच्या शहरातील आणि गावातील घडामोडींसाठी टीव्ही9 मराठीला आवश्य भेट द्या.

Maharashtra Breaking Marathi News Live | सकाळचा भोंगा रोज बघतो पण त्या भोंग्यावर मला जायचं नाहीय- श्रीकांत शिंदे
Marathi News LiveImage Credit source: tv9 marathi

मुंबई : मुंबईचे माजी महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांचं काल रात्री निधन झालं. त्यांना रात्री 2 वाजण्याच्या सुमारास हार्ट अटॅक आला. त्यानंतर त्यांना व्हीएन देसाई हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं. पहाटे 4 च्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली. दरम्यान कर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी काल संध्याकाळी प्रचाराच्या तोफा थंडावल्या. उद्या कर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी मतदान होणार आहे. 13 मे रोजी विधानसभा निवडणुकीचा निकाल लागेल. सध्या कर्नाटकमध्ये भाजपाची सत्ता आहे. त्यांना या निवडणुकीत काँग्रेसकडून जोरदार आव्हान देण्यात आलं आहे.

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
  • 09 May 2023 10:31 PM (IST)

    इम्रान खानच्या अटकेवरून गोंधळ, समर्थक लष्कराच्या मुख्यालयात घुसले

    इम्रान खान यांच्या अटकेनंतर परिस्थिती चिघळत चालली आहे. इम्रान खान यांचे समर्थक पाकिस्तानी लष्कराच्या मुख्यालयात घुसले आहेत. कॉर्प्स कमांडरच्या घराची तोडफोड करण्यात आली असून घराबाहेर खान हाऊस असे लिहिले आहे.

  • 09 May 2023 10:29 PM (IST)

    स्मृती इराणी यांना पाहिला ‘द केरळ स्टोरी’ चित्रपट, म्हणाल्या…

    केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी ‘द केरळ स्टोरी’ चित्रपट पाहिल्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना हा चित्रपट दहशतवादाविरोधात असल्याचे सांगितले आहे.काही राज्य सरकारं या चित्रपटाच्या प्रदर्शनाला रोखत आहे ते कुठेतरी दहशतवादाला साथ देत आहेत. ज्या कुटुंबांना याचा त्रास सहन करावा लागला आहे, त्यांच्यासोबत मी आहे.

  • 09 May 2023 08:48 PM (IST)

    त्यावेळी आम्हाला मंत्रीपदाची ऑफर : रामराजे नाईक निंबाळकर

    राष्ट्रवादीचे भविष्यातील नेतृत्व अजितदादा आणि जयंत पाटील

    जनतेची गरज लक्षात घेऊन संधीचं सोनं करणं ही आमच्या कुटुंबाची परंपरा

    अजितदादांना कसं जमतं काही माहिती सकाळी 6 वाजता कामे करतात

    अजितदादांनी मनावर घेतलं ना तर ते होतच

    सक्षम आमदार हे फक्त राष्ट्रवादीत आहेत

    राष्ट्रवादीच महाराष्ट्राला सक्षम मुख्यमंत्री देऊ शकतो

  • 09 May 2023 08:28 PM (IST)

    भारतीय जनता पक्षाची कोणी फसवणूक करू शकत नाही : देवेंद्र फडणवीस

    राष्ट्रवादी हा सर्वात मोठा पक्ष होईल असं स्वप्न 2014 आणि 2019 मध्ये देखील पाहिलं

    राष्ट्रवादी पक्षाचं हे स्वप्न पूर्ण होऊ शकत नाही

    कारण राष्ट्रवादी हा महाराष्ट्रव्यापी पक्षच नाही

    अशी टीका देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादी पक्षावर टीका

    संभाजीनगरमध्ये खंडणीसाठी कोणी त्रास देत असेल तर कारवाई होणार

    खंडणीसाठी त्रास देणाऱ्याचा कायमचा बंदोबस्त केला जाईल

  • 09 May 2023 08:06 PM (IST)

    Sangli Rain : सांगली जिल्ह्यात सलग तिसऱ्या दिवशी अवकाळी पाऊस

    सांगलीतील अनेक भागात पावसाची जोरदार हजेरी

    तासगाव तालुक्यामध्ये जोरदार वाऱ्यासह मुसळधार पाऊस

    अवकाळी पावसामुळे शेतकरी आणि इतर गोष्टींचं मोठं नुकसान

  • 09 May 2023 05:55 PM (IST)

    Teacher : राज्यात शिक्षक भरती लवकरच

    शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांची माहिती

    पहिल्या टप्प्यात 30 हजार शिक्षकांची भरती

    तर दुसऱ्या टप्प्यात 20 हजार शिक्षकांची होणार भरती

  • 09 May 2023 05:49 PM (IST)

    New Expressways : आता अशी चार्ज होतील ईलेक्ट्रिक वाहनं

    ना महागड्या पेट्रोलची झंझट, ना भरावे लागणार डिझेल

    देशातील या हायवेवर विना इंधन धावतील गाड्या

    या दोन शहरात होणार नवीन द्रुतगती महामार्ग

    काय आहे केंद्र सरकारची नवीन योजना, वाचा बातमी 

  • 09 May 2023 05:38 PM (IST)

    Bageshwar Baba : बागेश्वर बाबांचे हिंदू-मुस्लीमांमध्ये फुटीचे कार्य

    तेज प्रताप यादव यांची पुन्हा घणाघाती टीका

    बागेश्वर बाबा 10 दिवसांपासून माफी मागण्यासाठी त्यांची माणसे पाठवत आहे

    बागेश्वर बाबा भित्रे आणि देशद्रोही आहे, हा बाबा देशाला तोडण्याचे काम करत आहे

    बिहारचे मंत्री तेज प्रताप यादव यांनी साधला निशाणा

  • 09 May 2023 05:27 PM (IST)

    New Roads : राज्यातील नवीन रस्ते प्रकल्पांबाबत बैठक

    मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची उपस्थिती

    उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बैठकीला हजर

    चालू रस्ते विकास प्रकल्पांचा घेण्यात आला आढावा

    सह्याद्री राज्य अतिथीगृहावर झाली बैठक

  • 09 May 2023 05:17 PM (IST)

    Fire : पुण्यातील सॉलिटेअर बिझनेस हब भागात आयटी कंपनीला आग

    विमान नगर परिसरातील आयटी कंपनीला दुपारी लागली आग

    पुणे अग्निशमन दल व पीएमआरडीए दलाने तातडीने घेतली घटनास्थळी धाव

    आग विझविण्याचे काम तातडीने सुरु

  • 09 May 2023 05:11 PM (IST)

    Polygamy : बहुपत्नीत्व प्रकरणात आता विशेष समिती

    आसाम सरकारचा मोठा निर्णय, काय होणार परिणाम

    मुख्यमंत्री हेमंत बिस्वा सरमाने केली घोषणा

    राज्य सरकारला बहुपत्नीत्व प्रकरणात हस्तक्षेप करता येतो का?

    याविषयी विशेष समिती करणार चौकशी आणि तपास

  • 09 May 2023 05:01 PM (IST)

    Cheetah : कुनो राष्ट्रीय उद्यानात चित्त्याचा मृत्यू

    दक्षिण आफ्रिकेतून आणलेल्या मादी गंभीर अवस्थेत आढळली

    उपचारादरम्यान मादा दक्षा हिचा झाला मृत्यू

    चित्ता वाढविण्याच्या मोहिमेवर झाला परिणाम

  • 09 May 2023 04:41 PM (IST)

    मागण्यांच्या संदर्भात कमिटी स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आलाय – विनायक पाटील

    मुख्यमंत्री यांचे आभार मानतो

    उत्पादन खर्च कमी आणि आतामहत्या करु नये यासाठी समिती काम करेल

    एक महिन्यात निर्णय होणार आहे

    जर नाही झाला तर परत आम्ही आंदोलन करु

    माझं नाव विनायक पाटीलच नाही तर जिहादी आहे

    जिहादी म्हणजे शेवटपर्यंत लढणे

  • 09 May 2023 04:39 PM (IST)

    विनायक पाटील आणि पदाधिकारी यांच्यासोबत मुख्यमंत्र्यांची बैठक झाली – अब्दुल सत्तार

    समाधानकारक त्यांच्यासोबत चर्चा झाली

    धोरणात्मक निर्णय घेण्यासाठी अधिकारी आणि शेतकरी यांची समिती गठीत केली जाणार

    शेतकऱ्यांच्या अडचणी जाणून घेतल्या

    दोन दिवसात समिती गठीत केली जाईल

  • 09 May 2023 04:37 PM (IST)

    विनायक राऊत आणि संजय राऊत हे बंडू डोकं आहेत – संजय शिरसाट

    त्यांचा राजकारणाशी काही संबंध नाही, ते अचानक असेच निवडून आलेले आहेत

    ग्राउंड लेव्हलवर काम करण्याची यांना अक्कल आहे का?

    संजय राऊत सुप्रीम कोर्टाचे जज आहेत का? आम्ही न्यायाने लढलेलो आहे

    आम्हाला ते माहित आहे मत आमच्या बाजूनेच येईल, निर्णय आमच्या बाजूनेच असेल

    उगाच सकाळी उठायचं आणि काहीतरी वक्तव्य करायचं

    आपले आमदार जाऊ नये यासाठी अशा प्रकारचे स्टेटमेंट हे करत आहेत

    नरहरी झिरवळ हे आले पाहिजेत

    नरहरी झिरवळ यांना कायदा काय आहे तो कळत नाही ते दुर्दैव

  • 09 May 2023 04:35 PM (IST)

    संजय राऊत यांना प्रत्येक पक्षाच्या आघाडीच्या लोकांनी लायकी दाखवण्याचा प्रयत्न केलाय – संजय शिरसाट

    नाना पटोले यांनी देखील चोंबडेगिरी करू नकोस असं सांगितलं

    तसेच अजित दादांनी सांगितले की आमचा प्रवक्ता बनू नको

    अजित पवार यांनी देखील सांगितलं की आमच्या घरातले काय राजकारण आहेत आम्ही बघून घेऊ, मध्ये पडू नका

    संजय राऊतांना आपला पक्ष वाचवता आला नाही, ज्या पक्षाची सुपारी आपला फक्त संपवण्यासाठी घेतली

    असे संकल्पना सुचवणारे मूर्ख असे संजय राऊत आहेत

    त्यामुळे आता एकटे पडलेले आहेत

  • 09 May 2023 04:22 PM (IST)

    नाना पटोंलेच्या निर्णयाविरोधात नागपुरात काँग्रेसची  बैठक

    नाना पटोलेंवर रोष असलेल्या कार्यकर्त्यांची समजूत काढण्यासाठी वडेट्टीवार, सुनील केदार यांनी घेतली बैठक

    वडेट्टीवार यांच्या घरी चंद्रपूर जिल्हा काँग्रेस पदाधिकाऱ्यांची बैठक

    चंद्रपूर जिल्हाध्यक्षांवर नाना पटोले यांनी केलेल्या कारवाईनंतर पदाधिकाऱ्यांचा रोष

    प्रकाश देवतळे यांच्यावरील कारवाईचं प्रकरण दिल्ली दरबारी जाणार

    चंद्रपूर जिल्ह्यातील काँग्रेस पक्षात अंतर्गत कलह

    वडेट्टीवार समर्थक जिल्हाध्यक्ष असल्याने प्रकाश देवतळे यांच्यावर नाना पटोलेंची कारवाई

    ‘प्रदेशाध्यक्षांनी आकसापोटी कारवाई केल्याने रोष’

    बाजार समितीत चांगला विजय मिळाला तरीही कारवाई?

    चंद्रपूरमध्ये 12 पैकी सात बाजार समितीत काँग्रेसचा विजय

    बाजार समिती निवडणुकीत काँग्रेसला विजय मिळाल्यानंतरंही कारवाई केल्याने रोष

    चंद्रपूर काँग्रेस अध्यक्ष प्रकाश देवतळेंवर एकतर्फी कारवाई?

    22 जिल्ह्यात अनैसर्गिक युती, तरीही एकट्या चंद्रपूर जिल्ह्यात कारवाई

    नाना पटोलेंच्या निर्णयाविरोधात प्रकाश देवतळे दिल्लीत हायकमांडकडे दाद मागणार

    चंद्रपूर जिल्ह्यातील काँग्रेस पदाधिकारी दिल्लीत जाणार

  • 09 May 2023 04:13 PM (IST)

    या कार्यक्रमाच्या निमित्ताने मी या संस्थेच्या प्रांगणात येत असतो – शरद पवार

    या संस्थेची सुरुवात स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांनी केली होती

    त्यानंतर गेली 40 वर्ष मी या संस्थेची धुरा संभाळत आहे

    पूर्वीची स्थिती आणि आत्ताची स्थिती ही खूप वेगळी आहे

    या संस्थेमधून अनेक भटके विमुक्त आणि दलित मुले शिकून पुढे जात आहेत

    आता देश हा संविधानाच्या चौकटीत चालवला जात नाही

  • 09 May 2023 04:09 PM (IST)

    ATS चे अधिकारी प्रदीप कुरूलकर यांना पोलीस कोठडी

    पुणे सत्र न्यायालयाने सुनावली कोठडी

    पाकिस्तानला गोपनीय माहिती पुरवल्यचा कुरुलकर यांच्यावर आरोप

    प्रदीप कुरुलकर यांनी देशाच्या संदर्भातली महत्त्वाची माहिती हनी ट्रॅपमध्ये फसून पाकिस्तानला पुरवल्याचा आरोप

  • 09 May 2023 04:08 PM (IST)

    भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनी घेतली गौरव बापटांची भेट

    पुणे दौऱ्यावर असताना बावनकुळे गिरीश बापटांच्या घरी जाऊन घेतली भेट

    चंद्रशेखर बावनकुळेच्या भेटीनंतर पुणे लोकसभा पोटनिवडणुकीची पुन्हा चर्चा सुरू

    पुणे लोकसभा पोटनिवडणुकीत गौरव बापट भाजपकडून उमेदवारी करण्याची शक्यता

  • 09 May 2023 02:56 PM (IST)

    सकाळचा भोंगा रोज बघतो पण त्या भोंग्यावर मला जायचं नाहीय- श्रीकांत शिंदे

    सकाळचा भोंगा रोज बघतो पण त्या भोंग्यावर मला जायचं नाहीय

    होर्डिंग लावून जर भावी मुख्यमंत्री झाले असते तर

    प्रत्येक लोकांचे इच्छा आकांक्षा पूर्ण झाल्या असता- श्रीकांत शिंदे

  • 09 May 2023 02:45 PM (IST)

    अजित पवार यांची हवा निघाली आहे, त्यांची ओळख ही काकांमुळेच आहे-श्रीकांत शिंदे

    पहिल्यांदाच मुख्यमंत्री यांनी शेतकऱ्यांसोबत व सर्वसामान्य सोबत दिवाळी साजरी केली.

    अजित पवार यांच्यावर टीका करताना श्रीकांत शिंदे बोलले दहा महिन्यात एकनाथ शिंदे यांना संपूर्ण देश व जग ओळखत आहे.

    अजित पवार यांची हवा निघाली आहे. त्यांची ओळख ही काकांमुळे आहेत. एकनाथ शिंदे यांना सर्वसामान्य शेतकरी तळागाळातला माणूस ओळखतोय.

  • 09 May 2023 02:43 PM (IST)

    मुंबई महानगरपालिकेपेक्षा या लहानशा नगरपरिषदेने चांगलं काम केले आहे- श्रीकांत शिंदे

    मुंबई महानगरपालिकेपेक्षा या लहानशा नगरपरिषदेने चांगलं काम केले आहे

    पवनीमध्ये ऐतिहासिक साडेतीनशे मंदिर आहेत.

    DPR तयार करून ऐतिहासिक शहराला चांगलं बनवू dpr सरकारला पाठवणार आहोत आणि संपूर्ण देशातील लोक पवनी शहरात येथील नक्की.

    एसटीच्या मोफत प्रवास साडेचार कोटी लोकांनी एसटीचा प्रवास केला आहे.

    दहा महिन्यात या सरकारने चांगलं काम केलेलं आहे शेतकऱ्यांच्या हितासाठी ही सरकार काम करीत आहे.

    मागच्या सरकारने कोविड नावावर लोकांना घरात बसवण्याचे काम मागच्या सरकारने केलेला आहे

    वर्षा बंगला वर जाण्यासाठी मागील सरकार मध्ये ठाकरेची परवानगी घ्यावी लागत होती मात्र हा बंगला सर्वांसाठी खुला आहे- श्रीकांत शिंदे

  • 09 May 2023 02:38 PM (IST)

    विमाननगर येथील आग नियंत्रणात असून कुलिंग करण्याचे काम सुरू

    पुणे विमाननगर येथील सॉलिटर बिझनेस हब या आयटी कंपनीमध्ये दुपारी १२•३७ वाजता आगीची घटना घडली होती.

    प्राथमिक अंदाज असा की, बेसमेंटला असणाऱ्या इलेक्ट्रिक रुममधे आग लागून वर शेवटच्या नऊ मजल्यापर्यंत त्याचा धुर मोठ्या प्रमाणात पसरला गेला.

    अग्निशमन दलाकडून ०४ फायरगाडी ०१ वॉटर टँकर ०१ ब्रॉन्टो उंच शिडीचे वाहन दाखल झाले

    येथे अद्याप जखमी वा जिवितहानीची कोणतीही खबर नाही.

    अंदाजे २००० कर्मचारीवर्ग सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आला आहे.

    सध्या आग नियंत्रणात असून कुलिंग करण्याचे काम सुरू आहे.

  • 09 May 2023 02:34 PM (IST)

    विरोधी पक्षांकडे टीका टिप्पणी करण्याशिवाय दुसरे कोणतेच काम नाही- खासदार श्रीकांत शिंदे

    महाराष्ट्रातील शिंदे सरकार चांगले काम करतेय

    त्यामुळे विरोधी पक्षातील नेत्यांच्या पायाखालची वाळू सरकलेली

    विरोधी पक्षांकडे टीका टिप्पणी करण्याशिवाय दुसरे कोणतेच काम नाही- खासदार श्रीकांत शिंदे

  • 09 May 2023 02:33 PM (IST)

    बुकी अनिल जयसिंघानीच्या घरी ईडीचं पथक दाखल

    बुकी अनिल जयसिंघानीच्या घरी ईडीचं पथक दाखल

    अनिल जयसिंघानी सध्या गुजरात ईडीच्या ताब्यात आहे

    अनिलची मुलगी अनिक्षा हिला रिता फडणवीस यांना लाच देण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी झाली होती अटक

    यानंतर आता जयसिंघानीच्या घरी ईडीचं पथक तपासासाठी झालं दाखल

  • 09 May 2023 02:25 PM (IST)

    पालकमंत्री चंद्रकांत पाटलांनी फोन वरून धरणग्रस्तांशी संवाद साधला

    मावळमधील पवना धरणग्रस्तांचा आज थेट धरणावर मोर्चा

    पिंपरी चिंचवड शहराचा पाणी पुरवठा बंद केला.

    राज्य सरकारचे लक्ष वेधण्यासाठी आंदोलनकर्ते असे आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं.

    सर्व पक्षीयांचा या आंदोलनात सहभाग.

    पालकमंत्री चंद्रकांत पाटलांनी फोन वरून धरणग्रस्तांशी संवाद साधला

    19 मे ला बैठक घेऊन यावर तोडगा काढण्याचं आश्वासन दिलं.

  • 09 May 2023 02:22 PM (IST)

    डोंबिवलीत धक्कादायक प्रकार, सहा वर्षीय मुलीचा विनयभंग 

    चिमुकलीच्या भावाला शिवीगाळ करून 22 वर्षीय शेजाऱ्याने सहा वर्षीय मुलीचा विनयभंग

    भावाने आईला माहिती देताच अत्याचाराच्या आधी आईने केली नराधमाच्या तावडीतून मुलीची सुटका

    रामनगर पोलिसानी विनयभंग करणाऱ्या आरोपीला ठोकल्या बेड्या

  • 09 May 2023 02:20 PM (IST)

    मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 13 तारखेला सातारा जिल्हा दौऱ्यावर

    मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 13 तारखेला सातारा जिल्हा दौऱ्यावर

    पाटण मरळी येथे राज्यभर सुरू होणाऱ्या शासन आपले दारी या योजनेचा मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते होणार शुभारंभ

    सातारा पालकमंत्री शंभूराजे देसाई यांनी कराड येथे पत्रकार परिषदेत दिली माहिती

  • 09 May 2023 02:15 PM (IST)

    शंभूराज देसाई यांचा अजित पवार यांच्यावर पलटवार

    घाई गडबडीत फाईल क्लिअर केल्या की पृथ्वीराज बाबा म्हणाले तसं होतं

    70 हजार कोटी खर्च करून 1 टक्काही काम होत नाही

    शंभूराज देसाई यांचा अजित पवार यांच्यावर पलटवार

  • 09 May 2023 02:13 PM (IST)

    मावळातील पवना धरणग्रस्त आंदोलनात आमदार सुनील शेळके सहभागी

    मावळातील पवना धरणग्रस्त आंदोलनात राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार सुनील शेळके सहभागी झाले आहेत

    शेळकेंसह आंदोलक पवना धरणावर पोहचले.

    पिंपरी चिंचवड शहराचा पाणी पुरवठा बंद करण्याच्या दृष्टीने  पावलं उचलली आहेत.

    धरणग्रस्तांनी पिंपरी चिंचवड शहराचा पाणी पुरवठा बंद केलाय,

    साठ वर्षांपासून पुनर्वसन रखडल्यानं आंदोलक आक्रमक.

    सरकारचे लक्ष वेधण्यासाठी धरणग्रस्तांचा पवित्रा

  • 09 May 2023 01:56 PM (IST)

    लग्नासाठी जात असलेल्या इस्रो वैज्ञानिकावर जीवघेणा हल्ला,

    परभणी : तीन दुचाकी वर आलेल्या सहा जणांनी केला जीवघेणा हल्ला,

    परभणीच्या राहटी परिसरातील घटना,

    हल्याचे कारण मात्र अस्पष्ट,

    जखमी नवरदेववर परभणी येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू,

    पोलिसात तक्रार दाखल करण्याची प्रक्रिया सुरू.

  • 09 May 2023 01:47 PM (IST)

    सामना अग्रलेख किती खरा असतो हे पडताळा

    कराड : गुजरात मधून बेपत्ता महिला मुलींची आकडेवारी संजय राऊत यांनी कुणाकडून मिळवली आणि छापली

    गुजरात सरकारने कायदेशीर चौकशी सुरू केली तर राऊत काय उत्तर देणार

    सामनात येत ते सर्व खरं असतं असं नाही

    याबाबत गुजरात सरकार उपाययोजना करेल

    उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई

  • 09 May 2023 01:31 PM (IST)

    पुण्यात येरवडा भागात आगीची घटना

    पुणे : फिनिक्स मॉल शेजारी एका खाजगी आयटी कंपनीत लागली आग

    अग्निशमन दलाच्या चार गाड्या घटनास्थळी रवाना

    आगीचे कारण अद्याप अस्पष्ट

  • 09 May 2023 01:21 PM (IST)

    पुढील सर्व निर्णय न्यायालयाच्या निकालावर अवलंबून – राहुल नार्वेकर

    मुंबई : माझ्या लंडन दौऱ्याचा आणि सत्तासंघर्षाच्या सुनावणीच्या निकालाशी संबंध नाही

    विधानसभा अध्यक्ष रिकामं असल्यास उपाध्यक्ष यांना अधिकार

    इतर संस्था विधीमंडळात हस्तक्षेप करू शकत नाही

    16 आमदारांच्या संदर्भात निकाल आल्यानंतर पुढील निर्णय होईल

    विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांची माहिती

  • 09 May 2023 01:07 PM (IST)

    द केरला स्टोरीच्या संदर्भात जितेंद्र आव्हाड आक्रमक

    ठाणे : देशातील सर्वाधिक साक्षर राज्य केरळ आहे

    देशात बाहेरून सर्वाधिक पैसा केरळ आणतो, 34 टक्के हिस्सा आहे .

    2 कोटी 34 लाख रुपये भारतात पाठवले

    देवाचे राष्ट्र म्हणून गौरव केला जातो

    विकृत चित्र दाखवण्याचा प्रयत्न चित्रपटातून केला जात आहे

    जितेंद्र आव्हाड यांचा हल्लाबोल

  • 09 May 2023 12:57 PM (IST)

    पावसाळ्यापूर्वी मनपा आयुक्त दिलीप ढोले यांच्याकडून आढावा

    मिरा भाईंदर : मिरा भाईंदर महानगरपालिका अंतर्गत मान्सूनपूर्व नालेसफाईचा आढावा मनपा आयुक्त दिलीप ढोले यांनी घेतला

    आयुक्त दिलीप ढोले यांनी शहरात विविध ठिकाणी नाल्यांवर जावून प्रत्यक्ष नालेसफाईची पाहणी

    आयुक्त यांच्या सोबत पालिकेचा संबंधित अधिकारी आणि कर्मचारी ही उपस्थित

    शहरात पावसाळ्यात पाणी तुंबई होणार नाही याकरिता नालेसफाईच्या कामात कोणत्याही प्रकारचा हलगर्जीपणा चालणार नसून नालेसफाईची कामे ही मुदतीच्या आत पूर्ण करण्याच्या सूचना महापालिका आयुक्त ढोले यांनी महापालिका अधिकाऱ्यांना दिल्या

  • 09 May 2023 12:51 PM (IST)

    पुण्याच्या मावळमध्ये पवना धरणग्रस्तांनी आंदोलन छेडले

    मावळ,पुणे : वर्षानुवर्षे पुनर्वसन राखडल्यानं शेतकऱ्यांनी हा पवित्रा घेतला आहे

    सरकारचे लक्ष वेधण्यासाठी हा शेतकऱ्यांनी मोर्चा काढला आहे

    विविध मागण्या घेऊन शेतकरी या आंदोलनात सहभागी झालेले आहेत.

    पवना धरणग्रस्त शेतणाऱ्यांच्या मागण्या

    60 वर्षांपासून रखडलेले 863 शेतकऱ्यांचे पुनर्वसन पूर्ण करा

    महापालिका अथवा औद्योगिक वसाहतीत धरणग्रस्त तरुणांना रोजगार द्या

    घरांसाठी प्लॉट द्या

    धरणग्रस्तांना प्रकल्पबाधित असल्याचे दाखले द्यावेत

  • 09 May 2023 12:41 PM (IST)

    हवेलीत अजित पवार यांना धक्का

    हवेली कृषी उत्पन्न बाजार समितीवर राष्ट्रवादी बंडखोर आणि भाजपची एकहाती सत्ता,

    राष्ट्रवादी बंडखोर दिलीप काळभोर यांची सभापतीपदी निवड

    उपसभापती पदी भाजपचे रवींद्र कंद यांची निवड

    राष्ट्रवादीच्या अधिकृत पॅनलला धक्का देत बाजार समितीत राष्ट्रवादी बंडखोर आणि भाजपच्या पॅनलची सत्ता

  • 09 May 2023 12:01 PM (IST)

    पृथ्वीराज चव्हाण यांच्या टीकेवर शरद पवार यांचा पलटवार

    त्यांच्या पक्षात पृथ्वीराज चव्हाण यांचे काय स्थान आहे हे आधी त्यांनी तपासावे- शरद पवार

  • 09 May 2023 11:34 AM (IST)

    मुंबईकरांवर पाणी कपातीचं संकट ओढवण्याची शक्यता

    मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये अवघा 22 टक्के पाणीसाठा

    अप्पर वैतरणी आणि भातसा धरणातून राखीव पाणीसाठा मिळणार

  • 09 May 2023 11:28 AM (IST)

    प्रकरण माझ्याकडे आल्यास 16 आमदार अपात्र : नरहरी झिरवाळ

    विधान सभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांचे वक्तव्य

    राहूल नार्वेकर पाच दिवस लंडन दौऱ्यावर जाणार

    16 आमदारांच्या बाबतीत मी घेतलेला निर्णय घटनेनुसार- नरहरी झिरवाळ

  • 09 May 2023 11:23 AM (IST)

    Bumper Dividend : गुंतवणूकदारांना लागली लॉटरी

    या कंपनीचा कमाईचा मजबूत जोड

    या कंपनीमुळे गुंतवणूकदार कमाईदार

    जाहीर केला 1100 टक्के लाभांश

    या दिवशी हातात येतील नवीन करकरीत नोटा, वाचा सविस्तर 

  • 09 May 2023 11:21 AM (IST)

    राजीनाम्याच्या टीकेवर शरद पवार यांचं प्रत्युत्तर

    लोकशाहीमध्ये लोकांच्या मताला मान द्यावा लागतो- शरद पवार

    माझ्या निर्णायाचा फायदा राष्ट्रवादीला होईल- शरद पवार

  • 09 May 2023 11:14 AM (IST)

    अमरावती जवळ नांदगाव खंडेश्वरमध्ये गारपीट व मुसळधार पाऊस

    गारपिटीमुळे शेतकऱ्यांचे नुकसान

    मुसळधार पाऊस आणि गारपिटीमुळे कांदा सडला

  • 09 May 2023 11:10 AM (IST)

     खा. सुनील मेंढे यांच्या प्रयत्नातून गोंदियामध्ये दिव्यांगांना मोफत साहित्याचे वाटप

    प्रत्त्येक तालूक्यात दिव्यांगांना मिळाले साहित्य

    उपयुक्त साहित्य मिळाल्याने दिव्यांगांमध्ये समाधान

    साहित्य वाटपाच्या कार्यक्रमात सुधीर मुंगंटीवार यांची हजेरी

  • 09 May 2023 11:04 AM (IST)

    मी राजीनामा मागे घेतल्यानंतर पक्षात जोमाने काम करण्याची उमेद- शरद पवार

    सत्तासंघर्षाचा निकाल लवकरच लागेल- शरद पवार

    रयतच्या घटनेत काही बदल करण्याचे काही कारण नाही- शरद पवार

  • 09 May 2023 10:41 AM (IST)

    मध्य प्रदेशमध्ये मोठा बस अपघात, 15 मृत्यूमुखी

    मध्य प्रदेशातील खरगोन येथे मोठा बस अपघात, प्रवाशांनी भरलेली बस पुलावरून कोसळली

    या अपघातात आत्तापर्यंत 15 जणांचा मृत्यू झाला असून 25 जण जखमी झाले आहेत

  • 09 May 2023 10:32 AM (IST)

    भाजपमध्ये आदेश देण्याची पद्धत – शरद पवार

    भाजपचा आदेश शिंदेंना मान्य करावा लागतो

    शिंदेंच्या कर्नाटक दौऱ्यावर शरद पवार यांचा निशाणा

  • 09 May 2023 10:28 AM (IST)

    भाजपने कितीही टीका केली तरी आम्ही काम करत राहू – शरद पवार

    शरद पवारांनी साधला भाजपावर निशाणा

    लोकांना सामोरे जाण्याची सरकारची भूमिका नाही

    चव्हाणांचं काँग्रेसमधील स्थान काय ? त्यांनी पक्षातील पत पहावी – शरद पवारांचा पृथ्वीराज चव्हाणांना टोला

  • 09 May 2023 10:22 AM (IST)

    हा आमच्या घरातील प्रश्न, सामनातील अग्रलेखावर शरद पवारांचे प्रत्युत्तर

    आम्ही काय केलं ते राऊतांना माहीत नाही

    आम्ही कुणाला संधी दिली आणि काय केलं हे जाहीर करत नाही

    आम्ही टीकेकडे दुर्लक्ष करतो, शरद पवारांचा राऊतांना टोला

  • 09 May 2023 10:20 AM (IST)

    सातारा : लोकशाहीत लोकांची इच्छा महत्वाची – शरद पवार

    कार्यकर्त्यांच्या मागणीमुळे राजीनाम्याचा निर्णय मागे घेतला

    आता अधिक जोमाने काम करण्याची इच्छा

  • 09 May 2023 10:07 AM (IST)

    चिपळूण – मुसळधार पावसामुळे दरड कोसळून परशुराम घाटात मोठी वाहतूक कोंडी

    मुसळधार पावसामुळे परशुराम घाटात दरड कोसळली

    त्यामुळे मोठी वाहतूक कोंडी झाली आहे.

    वाहनांच्या ७ ते ८ किलोमीटरपर्यंत लांबच लांब रांगा लागल्या आहेत.

    रस्ता मोकळा करण्यासाठी प्रशासनाकडून युद्ध पातळीवर काम सुरू

  • 09 May 2023 10:02 AM (IST)

    कर्नाटक निवडणुकीचा प्रचार थंडावला, १० मे रोजी पार पडणार मतदान

    कर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठीच्या प्रचाराच्या तोफा थंडावल्या आहे.

    उद्या, म्हणजेच १० मे रोजी कर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी मतदान होणार आहे.

    शनिवार, 13 मे रोजी विधानसभा निवडणुकीचा निकाल लागेल.

    भाजपा-काँग्रेसमध्ये रस्सीखेच

  • 09 May 2023 09:56 AM (IST)

    दौंड पोलिसांनी आरोपाला केले तडीपार

    दौंड पोलीस स्टेशन हद्दीतील अश्पाक उर्फ लाला कासम कुरेशी याने स्वतःची एक टोळी तयार केली असून या टोळीच्या माध्यमातून तो सातत्याने महाराष्ट्र प्राणी संवर्धन कायदा आणि महाराष्ट्र प्राणी संरक्षण कायद्यांतर्गत बेकायदेशीर कृत्य करत होता. त्याच्या टोळीची दहशत निर्माण झाल्यामुळे पोलिसांनी त्याच्या टोळीस एक वर्षासाठी तडीपार केले आहे.

  • 09 May 2023 09:43 AM (IST)

    पिंपरी चिंचवड पोलिसांची कारवाई

    पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयातील गुन्हे शाखेच्या युनिट एकाकडून तब्बल 69 मोबाईल जप्त केले

    याप्रकरणी पोलिसांनी सोमा चौधरी आणि एका अल्पवयीन आरोपीला अटक केली आहे

    आरोपींवर जबरी चोरी घरपोडीसह मोबाईल चोरीचे तब्बल 23 गुन्हे दाखल आहे

    पोलिसांनी त्यांच्याकडून सात लाख दहा हजार किमतीचा मुद्देमाल जप्त केला.

  • 09 May 2023 09:33 AM (IST)

    व्याघ्रदर्शनासाठी पर्यटकांची गर्दी

    टिपेश्‍वर अभयारण्यात उन्हाळ्यात हमखास व्याघ्रदर्शन होत असल्याने पर्यटकांची गर्दी वाढत आहे. आंध्रप्रदेश, तेलंगणा, महाराष्ट्र, मध्यप्रदेश आदी राज्यातून पर्यटक सफारीचा आनंद लुटण्यासाठी दररोज येत आहे. टिपेश्‍वर अभयारण्यात हमखास व्याघ्र दर्शन होत असल्याचा अनुभव अनेकांनी घेतला आहे.

  • 09 May 2023 09:30 AM (IST)

    नवरदेवाच्या कारने वऱ्हाडींना चिरडले

    नवरदेवाच्या कारने वरातीत नाचणाऱ्या वऱ्हाड्यांना चिरडल्याची घटना उल्हासनगरमध्ये घडली आहे. या घटनेत १२ जण जखमी झाले असून यापैकी ४ जणांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

  • 09 May 2023 09:28 AM (IST)

    Gold Silver Price Today : सोने-चांदीत दरवाढ

    दुपारनंतर भावात पुन्हा दिसेल चढउतार

    3 मेपासून सोने-चांदीच्या किंमती सुसाट

    6 मे रोजी भावात जोरदार आपटी

    चांदीमध्ये किलोमागे 2200 रुपयांची वाढ

    आज सकाळच्या सत्रात इतका वाढला भाव, वाचा बातमी

  • 09 May 2023 09:19 AM (IST)

    पुण्यातील खराब रस्त्यांच्या विरोधात याचिका

    पुण्यातील खराब रस्त्यांच्या विरोधात मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल

    सामाजिक कार्यकर्त्यांकडून पुण्यातील रस्त्यांच्या विरोधात जनहित याचिका दाखल

    रस्ते आणि पायाभूत सुविधांवर अहवाल सादर करण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते मुंबई उच्च न्यायालयात

    2006 समितीने सुचवलेल्या सूचना अंमलबजावणी करण्याची याचिकेत केली मागणी

  • 09 May 2023 09:16 AM (IST)

    दापोलीत जोरदार पाऊस

    रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली अवकाळी पावसाची जोरदार बॅटिंग

    वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस

    हापूस आंबाला पावसाचा बसला फटका

    आंबा बागायतदार शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण

  • 09 May 2023 09:10 AM (IST)

    रुग्णवाहिका चालकांचे मानधन थकले

    जालना : गेल्या चार महिन्यापासून जिल्ह्यातील विविध ग्रामीण रुग्णालयात सेवा देणाऱ्या 102 क्रमांकाच्या रुग्णवाहिका चालकांचे चार महिन्यापासून मानधन थकले आहे. वेळेवर मानधन मिळत नसल्यामुळे या रुग्णवाहिका चालकांना आर्थिक अडचणीचा सामना करावा लागत आहे.

  • 09 May 2023 09:02 AM (IST)

    कासारसाई धरणातील पाणी साठ्याने गाठला तळ

    धरणात एकूण 36.टक्के पाणीसाठा शिल्लक

    जूनच्या अखेरपर्यंत पुरेल इतकं पाणी कासारसाई धरणात बाकी

    मावळ तालुक्यातील काही गावे तर मुळशीतील काही गावे या पाण्यावर अवलंबून

    वेळेत पाऊस पडला नाही तर या आठ गावांना पाणी टंचाईला सामोरं जावं लागणार

    पुणे पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांनी पाणी जपून वापरण्याचं आवाहन शेतकरी आणि नागरिकांना केलंय

  • 09 May 2023 08:48 AM (IST)

    Petrol Diesel Price Today : पेट्रोल-डिझेलचा आज नाही दिलासा

    जागतिक बाजारात कच्चा तेलात घसरण

    वाहनाची टाकी फुल्ल करण्यापूर्वी जाणून घ्या भाव

    कोणत्या शहरात इंधनाचा जोर, कुठे कमजोर

    भाव जाणून घ्या एका एसएमएसवर, वाचा सविस्तर 

  • 09 May 2023 08:46 AM (IST)

    पिंपरी चिंचवड | पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयातील गुन्हे शाखेच्या युनिट एककडून तब्बल 69 मोबाईल जप्त

    याप्रकरणी पोलिसांनी सोमा चौधरी आणि एका अल्पवयीन आरोपीला केली अटक

    या तिघांवरही चोरी, घरफोडी यांसह मोबाईल चोरीचे तब्बल 23 गुन्हे दाखल

    पोलिसांनी त्यांच्याकडून सात लाख दहा हजार किंमतीचा मुद्देमाल केला जप्त

  • 09 May 2023 08:36 AM (IST)

    चेंबरमध्ये उतरल्यामुळे गुदमरून तीन कामगारांचा मृत्यू झाल्याप्रकरणी गुन्हा दाखल

    छत्रपती संभाजीनगर शहरातील सिटी चौक पोलीस ठाण्यात हा गुन्हा दाखल

    तीन मजुरांना असुरक्षित पद्धतीने चेंबरमध्ये उतरायला भाग पाडलं

    कलीमुद्दीन शेख आणि त्याचा साथीदार अजीम अशा दोघांवर गुन्हा दाखल

  • 09 May 2023 08:28 AM (IST)

    सातारा | अजित पवारांकडून नवीन विश्रामगृहाची पाहणी

    विश्रामगृहाच्या कामाचा घेतायत आढावा

    कामासंदर्भात अधिकाऱ्यांना सूचना

    काम दर्जेदार करण्याच्या सूचना

  • 09 May 2023 08:19 AM (IST)

    ‘द केरळ स्टोरी’च्या क्रू मेंबरला धमकी, मुंबई पोलिसांनी पुरवली सुरक्षा

    ‘द केरळ स्टोरी’ या चित्रपटाच्या क्रू मेंबरला एका अनोळखी नंबरवरून धमकी

    दिग्दर्शक सुदिप्तो सेन यांनी याबद्दल मुंबई पोलिसांकडे केली तक्रार

    चित्रपटातील कथा दाखवून तुम्ही चांगली गोष्ट केली नाही, त्यामुळे घराबाहेर एकटं पडू नका, अशी धमकी

    धमकीनंतर मुंबई पोलिसांनी संबंधित क्रू मेंबरला सुरक्षा पुरवली

  • 09 May 2023 08:12 AM (IST)

    दिल्ली | सीलमपूर परिसरात गोळीबार प्रकरणी तिघांना अटक

    सोमवारी रात्री किरकोळ कारणावरून भांडण आणि उघड्यावर गोळीबार केल्याप्रकरणी अटक

    तिघांकडून दोन बंदुक जप्त

  • 09 May 2023 08:05 AM (IST)

    नाशिक | जलसंपदा विभाग देणार महापालिकेला अतिरिक्त 200 दलघफू पाणी

    नाशिक शहराला पुरणार 15 ऑगस्टपर्यंत पाणी

    नवीन आरक्षणानुसार शहराला मिळणार 6000 दशलक्ष घनफूट पाणी

    सद्यस्थितीत गंगापूर धरण समूहात 41 टक्के उपयुक्त पाणीसाठा

  • 09 May 2023 08:03 AM (IST)

    जलसंपदा विभाग देणार महापालिकेला अतिरिक्त 200 दलघफू पाणी

    -जलसंपदा विभाग देणार महापालिकेला अतिरिक्त 200 दलघफू पाणी

    -नाशिक शहराला पुरणार 15 ऑगस्टपर्यंत पाणी

    -नवीन आरक्षणानुसार शहराला मिळणार 6000 दशलक्ष घनफूट पाणी

    -सद्यस्थितीत गंगापूर धरण समूहात 41 टक्के उपयुक्त पाणीसाठा

  • 09 May 2023 08:02 AM (IST)

    पुणे पोलिसांनी केल्या कोट्यावधी रुपयाच्या नोटा जप्त गुन्हे शाखेची मोठी कारवाई

    पुणे पोलिसांनी केल्या कोट्यावधी रुपयाच्या नोटा जप्त गुन्हे शाखेची मोठी कारवाई

    पुणे सोलापूर महामार्गावर हडपसर परिसरात कारवाई

    पुण्यातील द्राक्ष संशोधन केंद्राजवळ नाकाबंदी करत असताना दक्ष वाहतुक पोलिसाच्या जागरूकतेमुळे पुणे पोलिसांनी नोटांनी भरलेल्या कोट्यवधींच्या नोटांनी भरलेल्या बॅगा ब्रीझा कारमधून पकडल्या.

    मध्यरात्री ६ पिशव्यात कोट्यावधी रुपयांची रक्कमेसह पैसे मोजण्याचे मशीन पुण्याजवळ पकडले..

    गांधी आडनाव असलेल्या ४० ते ४२ वय असलेल्या व्यक्तीला गुन्हे शाखेने ताब्यात घेतले.

    जप्त करण्यात आलेल्या रकमेचा हवाल्याशी काही संबंध आहे का, का ह्या नोटा कर्नाटक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पाठविल्या जात होत्या का त्या अनुषंगाने पाेलिसांकडून कसून तपास सुरू आहे.

  • 09 May 2023 08:02 AM (IST)

    पुण्यात नापास तरुणांना दहावी बोर्डाचे बोगस प्रमाणपत्र देणारी टोळी

    पुणे

    पुण्यात नापास तरुणांना दहावी बोर्डाचे बोगस प्रमाणपत्र देणारी टोळी

    पुण्यात नोकर भरतीसाठी जाणाऱ्या एका तरुणाला दहावीचे बोगस प्रमाणपत्र दिल्याचा धक्कादायक प्रकार आला समोर

    ६० हजार रुपये घेऊन देत होता बनावट प्रमाणपत्र

    दहावीच्या बोर्डाचे सर्टिफिकेट बरोबर मार्कशीट आणि स्कूल ट्रान्सफर सर्टिफिकेट देत होता

    संदीप कांबळे असे या आरोपीचे नाव आहे

    आरोपी संदीपने अनेक लोकांना पैसे घेऊन फसविल्याचे चौकशीत उघड

    राज्यातील 35 तरुणांना फसवल्याचा पोलिसांना संशय

  • 09 May 2023 07:54 AM (IST)

    पुणे पोलिसांनी केल्या कोट्यावधी रुपयाच्या नोटा जप्त गुन्हे शाखेची मोठी कारवाई

    पुणे पोलिसांनी केल्या कोट्यावधी रुपयाच्या नोटा जप्त गुन्हे शाखेची मोठी कारवाई

    पुणे सोलापूर महामार्गावर हडपसर परिसरात कारवाई

    पुण्यातील द्राक्ष संशोधन केंद्राजवळ नाकाबंदी करत असताना दक्ष वाहतुक पोलिसाच्या जागरूकतेमुळे पुणे पोलिसांनी नोटांनी भरलेल्या कोट्यवधींच्या नोटांनी भरलेल्या बॅगा ब्रीझा कारमधून पकडल्या.

    मध्यरात्री ६ पिशव्यात कोट्यावधी रुपयांची रक्कमेसह पैसे मोजण्याचे मशीन पुण्याजवळ पकडले..

    गांधी आडनाव असलेल्या ४० ते ४२ वय असलेल्या व्यक्तीला गुन्हे शाखेने ताब्यात घेतले.

    जप्त करण्यात आलेल्या रकमेचा हवाल्याशी काही संबंध आहे का, का ह्या नोटा कर्नाटक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पाठविल्या जात होत्या का त्या अनुषंगाने पाेलिसांकडून कसून तपास सुरू आहे

  • 09 May 2023 07:53 AM (IST)

    जलसंपदा विभाग देणार महापालिकेला अतिरिक्त 200 दलघफू पाणी

    नाशिक ब्रेकिंग

    -जलसंपदा विभाग देणार महापालिकेला अतिरिक्त 200 दलघफू पाणी

    -नाशिक शहराला पुरणार 15 ऑगस्टपर्यंत पाणी

    -नवीन आरक्षणानुसार शहराला मिळणार 6000 दशलक्ष घनफूट पाणी

    -सद्यस्थितीत गंगापूर धरण समूहात 41 टक्के उपयुक्त पाणीसाठा

  • 09 May 2023 07:53 AM (IST)

    जिल्ह्यातील 233 ग्रामपंचायतीमधील 343 रिक्तपदांसाठी पोटनिवडणूक प्रक्रिया सुरू

    -जिल्ह्यातील 233 ग्रामपंचायतीमधील 343 रिक्तपदांसाठी पोटनिवडणूक प्रक्रिया सुरू

    -सुमारे 103 ग्रामपंचायतीमध्ये सदस्यांची झाली बिनविरोध निवड

    -18 तारखेला होणार मतदान

    -24 तारखेला निकाल घोषित होण्याची शक्यता

  • 09 May 2023 07:52 AM (IST)

    नाशिक शहर पोलिस अँक्शन मोडवर

    नाशिक ब्रेकिंग

    -नाशिक शहर पोलिस अँक्शन मोडवर

    -कर्णकर्कश आवाज करणाऱ्या दुचाकीस्वारांवर गुन्हे दाखल करण्यास झाली सुरुवात

    -एका 19 वर्षीय युवकावर करण्यात आला गुन्हा दाखल

    -पोलिसांच्या या मोहिमेमुळे ध्वनी प्रदुषण करणाऱ्यांना बसणार चपराक

  • 09 May 2023 07:51 AM (IST)

    पुण्यात नापास तरुणांना दहावी बोर्डाचे बोगस प्रमाणपत्र देणारी टोळी

    पुण्यात नापास तरुणांना दहावी बोर्डाचे बोगस प्रमाणपत्र देणारी टोळी

    पुण्यात नोकर भरतीसाठी जाणाऱ्या एका तरुणाला दहावीचे बोगस प्रमाणपत्र दिल्याचा धक्कादायक प्रकार आला समोर

    ६० हजार रुपये घेऊन देत होता बनावट प्रमाणपत्र

    दहावीच्या बोर्डाचे सर्टिफिकेट बरोबर मार्कशीट आणि स्कूल ट्रान्सफर सर्टिफिकेट देत होता

    संदीप कांबळे असे या आरोपीचे नाव आहे

    आरोपी संदीपने अनेक लोकांना पैसे घेऊन फसविल्याचे चौकशीत उघड

    राज्यातील 35 तरुणांना फसवल्याचा पोलिसांना संशय

  • 09 May 2023 07:39 AM (IST)

    रत्नागिरी जिल्ह्यात मुसळघार पाऊस

    रत्नागिरी जिल्ह्यात मुसळघार पाऊस

    गुहागर तालुक्याला पावसाने सर्वाधिक झोडपले

    चिपळूण, गुहागर, खेड, तालुक्यात मुसळघार पाऊस

    आंबा सिझन. चालू. असताना. पाऊस सुरु झाल्यामुळं आंबा शेतकऱ्यांसमोर संकट

    विजांच्या कडकडाटासह वादळी वारासह पाऊस सुरु

  • 09 May 2023 07:34 AM (IST)

    पुणे जिल्ह्यात पाणीटंचाई

    जिल्ह्यातील २४ गावांमध्ये सुरू आहे टँकरने पाणीपुरवठा.

    भोर, आंबेगाव, जुन्नर आणि खेड तालुक्यातील गावांमध्ये गेल्या अनेक दिवसांपासून टँकरने होत आहे पाणीपुरवठा.

    गावांमधील ४० हजार नागरिकांसाठी २० टँकरद्वारे केला जात आहे पाणीपुरवठा.

    पुणे जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये एप्रिल पासून पाणीटंचाईचा संकट.

    जिल्ह्यात २० टँकरने होत आहे पाणीपुरवठा.

  • 09 May 2023 07:33 AM (IST)

    पुण्यात उन्हाची तीव्रता वाढणार

    पुणे शहरासह जिल्ह्यात पुढील पाच दिवस उन्हाची तीव्रता वाढणार

    14 मे पर्यंत पुण्यात उष्णता वाढणार

    पुणे वेध शाळेचा अंदाज

    शहरातील तापमान 40°c पर्यंत जाण्याचा हवामान खात्याचा अंदाज

    पुढील पाच दिवस शहरात उकाडा वाढणार

  • 09 May 2023 07:32 AM (IST)

    पुण्यातील खराब रस्त्यांच्या विरोधात याचिका

    पुण्यातील खराब रस्त्यांच्या विरोधात मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल.

    सामाजिक कार्यकर्त्यांकडून पुण्यातील रस्त्यांच्या विरोधात जनहित याचिका दाखल.

    रस्ते आणि पायाभूत सुविधांवर अहवाल सादर करण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते मुंबई उच्च न्यायालयात.

    2006 समितीने सुचवलेल्या सूचना अंमलबजावणी करण्याची याचिकेत केली मागणी.

  • 09 May 2023 07:31 AM (IST)

    कोल्हापूर : आजरा शहराला पावसाने झोडपले

    कोल्हापूर जिल्ह्यातील आजरा शहराला मध्यरात्री वळीव पावसाने झोडपले

    तासभर पडलेल्या पावसामुळे रस्त्याला तळ्याचे स्वरूप

    तर शहरातील नाईक गल्लीतल्या अनेक घरांमध्ये शिरलं पाणी

    दमदार पावसामुळे बळीराजा मात्र सुखावला

  • 09 May 2023 07:30 AM (IST)

    मुंबईचे माजी महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांचं निधन

    मुंबईचे माजी महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांचं काल रात्री निधन झालं. त्यांना रात्री 2 वाजण्याच्या सुमारास हार्ट अटॅक आला. त्यानंतर त्यांना व्हीएन देसाई हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं. पहाटे 4 च्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली.

Published On - May 09,2023 7:29 AM

Follow us
बाप.. बाप होता है, विजयानंतर काय म्हणाले धर्मरावबाबा आत्राम
बाप.. बाप होता है, विजयानंतर काय म्हणाले धर्मरावबाबा आत्राम.
साकोलीत नाना पटोले यांचा कसाबसा निसटता विजय, पाहा काय घडले?
साकोलीत नाना पटोले यांचा कसाबसा निसटता विजय, पाहा काय घडले?.
वसईतून भाजपाच्या स्नेहा दुबे विजयी, काय म्हणाल्या...पाहा
वसईतून भाजपाच्या स्नेहा दुबे विजयी, काय म्हणाल्या...पाहा.
'या' दिग्गज नेत्यांचा दारूण पराभव, कोणाच्या जिव्हारी लागला निकाल?
'या' दिग्गज नेत्यांचा दारूण पराभव, कोणाच्या जिव्हारी लागला निकाल?.
..अन् मुसंडी, भाजप-महायुतीच्या यशाचं क्रेडिट फक्त फडणवीसांना कारण...
..अन् मुसंडी, भाजप-महायुतीच्या यशाचं क्रेडिट फक्त फडणवीसांना कारण....
माहिममध्ये अमित ठाकरे,सदा सरवणकर पराभूत; ठाकरे गटाच्या उमेदवाराची बाजी
माहिममध्ये अमित ठाकरे,सदा सरवणकर पराभूत; ठाकरे गटाच्या उमेदवाराची बाजी.
भावानं परळीचा गड राखला... धनंजय मुंडे म्हणाले, 'माझी बहीण पंकजा...'
भावानं परळीचा गड राखला... धनंजय मुंडे म्हणाले, 'माझी बहीण पंकजा...'.
महायुतीच्या विजयनानंतर एकनाथ शिंदे म्हणाले, ही तर लँडस्लाईड व्हिक्ट्री
महायुतीच्या विजयनानंतर एकनाथ शिंदे म्हणाले, ही तर लँडस्लाईड व्हिक्ट्री.
फडणवीस CM होणार? सलग तिसऱ्यांदा महाराष्ट्राच्या चाणाक्यावर मात अन्...
फडणवीस CM होणार? सलग तिसऱ्यांदा महाराष्ट्राच्या चाणाक्यावर मात अन्....
कणकवलीत भाजपचा जल्लोष, निलेश राणे म्हणाले, आता अल्लाहू अकबर नाही तर...
कणकवलीत भाजपचा जल्लोष, निलेश राणे म्हणाले, आता अल्लाहू अकबर नाही तर....