Marathi News Latest news Maharashtra hutatma smruti din 2020 cm uddhav thackeray pays floral tributes at hutatma smarak in mumbai
Maharashtra Hutatma Smruti Din | ठाकरे सरकारमधील मंत्र्यांकडून संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील हुतात्म्यांना आदरांजली
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीसाठी प्राणार्पण केलेल्या हुतात्म्यांच्या पवित्र स्मृतीस पुष्पांजली अर्पण केली (Maharashtra Hutatma Smruti Din 2020)
Follow us
मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीसाठी 107 हुताम्यांनी बलिदान दिले होते. या पार्श्वभूमीवर 21 नोव्हेंबर हा दिवस महाराष्ट्र राज्य हुतात्मा स्मृतीदिन म्हणून पाळला जातो.
संयुक्त महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी आपल्या प्राणांची आहुती देणार्या 107 जणांच्या आज स्मरण करत त्यांना आदरांजली वाहिली जाते
याच पार्श्वभूमीवर दक्षिण मुंबईतील हुतात्मा स्मारकावर जाऊन आपली आदरांजली अर्पण केली जाते.
नुकतंच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीसाठी प्राणार्पण केलेल्या हुतात्म्यांच्या पवित्र स्मृतीस पुष्पांजली अर्पण करून आदरांजली वाहिली.
यावेळी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, राज्यमंत्री अदिती तटकरे, पालकमंत्री अस्लम शेख, महापौर किशोरी पेडणेकर यांनीही हुतात्मा स्मारकावर जात आदरांजली अर्पण केली आहे.