बत्ती गुल ते वादळाचा इशारा, राज्यातल्या टॉप 10 घडामोडी एका क्लिकवर
मुंबईसह, नवी मुंबई आणि अनेक शहरांमध्ये वीज पुरवठा खंडीत झाला आहे. यामुळे संपूर्ण मुंबई ठप्प झाली आहे. यामध्ये राज्यावर आसमानी संकटाचाही इशारा देण्यात आला आहे.
मुंबई : राज्यात एकीकडे कोरोनाचा धोका असताना दुसरीकडे मात्र मुंबईसह, नवी मुंबई आणि अनेक शहरांमध्ये वीज पुरवठा खंडीत झाला आहे. यामुळे संपूर्ण मुंबई ठप्प झाली आहे. यामध्ये राज्यावर आसमानी संकटाचाही इशारा देण्यात आला आहे. जाणून घेऊयात राज्यात सध्याच्या टॉप 10 घडामोडी. (Maharashtra news update power cut weather alert 10 top Maharashtra news)
1) मुंबई, ठाणे, नवी मुंबई, पनवेलसह उपनगरातील बत्ती गुल झाली आहे. पॉवर ग्रीड फेल्युअरमुळे सकाळी दहापासून वीज गायब झाल्याची प्राथमिक माहिती आहे. जवळपास तासाभरापासून मुंबईकर अंधारात आहेत.
2) मुंबईमध्ये बत्ती गुल झाल्यानं लोकल ही बंद झाल्या आहेत. तिन्ही मार्गावरील लोकल रेल्वेही जागच्या जागी थांबल्या आहेत. रेल्वे डब्यातील प्रवासी घामाघूम झाले आहेत.
3) इंटरनेट डाऊन असल्यामुळे सरकारी आणि खासगी कार्यालये, वर्क फ्रॉम होमसह ऑनलाईन शिक्षणाचाही खोळंबा झाला आहे.
4) वसई विरार नालासोपारा इथं मात्र विजेचा कोणताही परिणाम झाला नाही. सर्व परिसराची लाईट सुरळीत चालू आहे. विरारहून चर्चगेटकडे जाणाऱ्या लोकलवर ही सध्या काही परिणाम झाला नसून लोकल बोरिवलीपर्यंत सुरळीत सुरू आहेत.
5) वीज गेल्याने मुंबईतील अनेक रुग्णालयांनाही फटका बसला आहे. अनेक व्हेंटिलेटर्स जनरेटरच्या माध्यमातून सुरू ठेवण्याची वेळ आली आहे.
6) ‘मुंबईत एकाच वेळेस 2000 मेगा वॅटचं फेल्यूअर होणं, हे महाराष्ट्राला शोभणारं नाही. हा तांत्रिक मुद्दा असला तरीही, झालेलं फेल्यूअर वेळेवर अटेंड न केल्यामुळे मुंबईतील वीजपुरवठा खंडीत झाला’ असं मत माजी ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केली.
7) आपत्ती व्यवस्थापन विभाग काय करतो? मुंबईतील वीज गायबप्रकरणी भाजपकडून हल्लाबोल करण्यात आला आहे. कल्पनाशून्य सरकार, अंधारात कारभार अशी टीका आशिष शेलारांनी केली आहे. (Maharashtra news update power cut weather alert 10 top Maharashtra news)
8) कळवा पडघा केंद्रात सर्किट 1 देखभाल-दुरुस्ती दरम्यान सर्व भार सर्किट 2 वर आला. मात्र, त्याचवेळी सर्किट 2 मध्ये अचानक तांत्रिक बिघाड झाल्याने मुंबई-ठाण्यातील बत्ती गुल झाली असल्याची माहिती ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी दिली आहे.
9) राज्यावर आणखी एक वादळी संकट धडकणार असल्याचा इशारा भारतीय हवामान खात्याकडून देण्यात आला आहे. बंगालच्या उपसागरात (Bay of Bengal) कमी दाबाचा पट्टा तयार झाल्यामुळे 5 राज्यामध्ये मुसळधार पावसाचा (Heavy rain) अंदाज हवामान खात्याकडून देण्यात आला आहे.
10) राज्यात अनेक पिकांना हमीभावापेक्षा कमी दर मिळत असून शेतकऱ्यांना लूटण्याचे प्रकार समोर येत आहेत. सोयाबीन पिकासाठी शासनाने ठरवून दिलेला हमीभाव हा 3880 आहे. पण भिवापूरच्या बाजारात सोयाबीनला फक्त 2800 रुपये प्रति क्विंटल भाव मिळत असून शेतऱ्यांची मोठ्या प्रमाणात लूट होत आहे. तसा आरोप भिवापूरच्या शेतकऱ्यांनी केला आहे.
इतर बातम्या –
Fact Check : केंद्र सरकार प्रत्येकाच्या खात्यात जमा करणार 90 हजार रुपये?, वाचा काय आहे सत्य
‘CM उद्धव ठाकरेंच्या भाषणाचा अर्थ समजावून सांगणाऱ्यास आम्ही 1001 रुपयाचं बक्षिस देऊ’
Mumbai Accident | मुंबईत कारचा भीषण अपघात, सुदैवाने चालक बचावला – tv9 pic.twitter.com/hU9zlLXkDp
— TV9 Marathi (@TV9Marathi) October 12, 2020
(Maharashtra news update power cut weather alert 10 top Maharashtra news)