गेल्या 24 तासात कोरोना बळींच्या संख्येत महाराष्ट्र अव्वलच, नियम पाळले नाही तर पुन्हा कोरोना स्फोटाची भीती?
लसीकरणावर बरीच टिकाटिप्पणी झाल्यानंतर केंद्र सरकारनं मोफत लसीकरणाची घोषणा केली. त्यानंतर देशात लसीकरणाने वेग पकडलाय. आतापर्यंत देशात 39 कोटी 96 लाख 95 हजार 879 जणांना कोरोनाची लस टोचली गेलीय
गेल्या चोवीस तासात देशात कोरोनाचे 38 हजार 079 नवे रुग्ण सापडलेत. यात महाराष्ट्रात 7 हजार 761 रुग्णांचा समावेश. महाराष्ट्र कोरोना रुग्ण मिळण्याच्या बाबतीत अजूनही दुसऱ्या क्रमांकावर आहे. पहिल्या क्रमांकावर केरळ आहे. केरळमध्ये गेल्या चोवीस तासात 13 हजार 750 कोरोना रुग्ण सापडलेत. केरळ आणि महाराष्ट्रानंतर आंध्र प्रदेश-2 हजार 345, तामिळनाडू- 2 हजार 312 आणि ओडिशा- 2 हजार 070 एवढे कोरोना रुग्ण सापडलेत.
विशेष म्हणजे देशातले 74.16 टक्के रुग्ण हे फक्त वरील पाच राज्यात सापडलेत. त्यात एकट्या केरळची भागीदारी ही 36 टक्के एवढी आहे. कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूचं प्रमाणही कमी झालेलं नाही. गेल्या चोवीस तासात 560 जणांना जीव गमवावा लागलाय.
सर्वाधिक मृत्यू महाराष्ट्रातच गेल्या 24 तासात महाराष्ट्रात 167 जण कोरोनाचे बळी ठरलेत. तर बळींच्या बाबतीत केरळ दुसऱ्या क्रमांकावर आहे. इथं 130 लोकांचा कोरोनाने मृत्यू झालाय. पण एक गोष्ट जी दुर्लक्षित करता येत नाही ती म्हणजे रिकव्हरी रेट. तो 97.31 टक्क्यावर गेलाय. आकडेवारीतच सांगायचं तर देशात गेल्या चोवीस तासात 43 हजार 916 कोरोना रुग्ण बरे झालेत. आतापर्यंत 3 कोटीपेक्षा जास्त लोक कोरोनातून ठिकठाक झालेत. देशात अॅक्टीव रुग्णांची संख्या 4 लाख 24 हजार 25 एवढी आहे. गेल्या चोवीस तासात सक्रिय रुग्णांची संख्या 6 हजार 397 ने कमी झालीय.
कोरोना संक्रमन रेट घटतोय देशासाठी दिलासादायक बाब एवढीच की, संक्रमनाचा म्हणजेच पॉजिटीव्ह होण्याचं प्रमाण घटत चाललं आहे. हा दर सध्या 5 टक्क्यापेक्षा कमी आहे. सध्य स्थितीत तो 2.10 टक्के एवढा आहे. गेल्या 26 दिवसांपासून पॉझिटीव्ह रेट 3 टक्क्यापेक्षा कमी आहे. देशात सध्याच्या घडीला रोज 44 कोटी कोरोना टेस्ट केल्या जातायत. 40 कोटीपेक्षा जास्त लोकांना डोस लसीकरणावर बरीच टिकाटिप्पणी झाल्यानंतर केंद्र सरकारनं मोफत लसीकरणाची घोषणा केली. त्यानंतर देशात लसीकरणाने वेग पकडलाय. आतापर्यंत देशात 39 कोटी 96 लाख 95 हजार 879 जणांना कोरोनाची लस टोचली गेलीय. तर गेल्या चोवीस तासात लसीकरणाचा देशातला आकडा आहे 42 लाख 12 हजार 557 एवढा.