Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

लोकसभेनंतर राज्यातील चार विधान परिषदेसाठी आज मतदान, आता महायुती की महाविकास आघाडी?

Maharashtra Vidhan Parishad Election 2024 : नाशिकमध्ये सकाळी 7 वाजता मतदान सुरु झाले. 63 केंद्र आणि 90 बूथवर मतदन होत आहे. 69 हजार शिक्षक मतदार आपला आमदार ठरवणार आहेत. नाशिकमध्ये संदीप गुळवे - ठाकरे गट, किशोर दराडे - शिंदे गट, ऍड महेन्द्र भावसार - अजित दादा गट , विवेक कोल्हे - अपक्ष यांच्यात लढत होत आहे.

लोकसभेनंतर राज्यातील चार विधान परिषदेसाठी आज मतदान, आता महायुती की महाविकास आघाडी?
Follow us
| Updated on: Jun 26, 2024 | 7:15 AM

Maharashtra Vidhan Parishad Election 2024 : लोकसभा निवडणुकीनंतर राज्यात प्रथमच दुसरी निवडणूक होत आहे. महाराष्ट्र विधान परिषदेच्या चार जागांसाठी आज मतदान सुरु झाले आहे. या चार जागांमध्ये दोन शिक्षक तर दोन पदवीधर मतदार संघ आहेत. मुंबई, कोकण पदवीधर मतदार संघ आणि नाशिक, मुंबई शिक्षक मतदार संघात ही निवडणूक पार पडणार आहे. त्यासाठी आज सकाळी सात वाजता मतदान सुरु झालेत. या जागांवर 1 जुलैला मतमोजणी होईल. त्यावेळी महायुती की महाविकास आघाडी कोणाची सरसी होते? हे स्पष्ट होईल.

नाशिकमध्ये मतदान सुरु

नाशिकमध्ये सकाळी 7 वाजता मतदान सुरु झाले. 63 केंद्र आणि 90 बूथवर मतदन होत आहे. 69 हजार शिक्षक मतदार आपला आमदार ठरवणार आहेत. नाशिकमध्ये संदीप गुळवे – ठाकरे गट, किशोर दराडे – शिंदे गट, ऍड महेन्द्र भावसार – अजित दादा गट , विवेक कोल्हे – अपक्ष यांच्यात लढत होत आहे. नाशिक शिक्षक मतदार संघात महायुतीचे उमेदवार किशोर दराडे यांच्याकडून घरातील देवांचे दर्शन सकाळीच घेण्यात आले. त्यानंतर कुटुंबियांकडून किशोर दराडे यांचे औक्षण करण्यात आले.

कोकण पदवीधरमध्ये अशी लढत

विधान परिषदेच्या कोकण विभाग पदवीधर मतदार लसंघासाठी मतदान सुरु झाले आहे. कोकण विभाग पदवीधर मतदार संघात एकूण २ लाख २३ हजार २२५ मतदार आहे. यात सर्वाधिक मतदार ठाणे जिल्हयात म्हणजेच ९८ हजार ८६० इतके मतदार आहेत. यात ४२ हजार ४७८ स्त्री मतदार तर ५६ हजार ३७१ पुरुष आणि ११ तृतियपंथीय मतदार आहेत. यानुसार ठाणे जिल्ह्यात एकुण १२४ मतदान केंद्रे आहेत. या ठिकाणी एकूण 13 उमेदवार रिंगणात आहे. परंतु भाजप आणि काँग्रेसमध्ये लढत आहे. भाजपकडून 2 वेळा आमदार झालेले निरंजन डावखरे यांच्या समोर काँग्रेसचे रमेश किर हे उमेदवार रिगणात आहे.

हे सुद्धा वाचा

मुंबईत मैत्रीपूर्ण लढत

मुंबई पदवीधर मतदारसंघात शिवसेना ठाकरे गटाचे अनिल परब आणि भाजपचे किरण शेलार यांच्यात थेट लढत होत आहे. मुंबई शिक्षक मतदार संघामध्ये शिवसेना ठाकरे गटाचे ज. मो. अभ्यंकर यांच्याविरोधात भाजपचे शिवनाथ दराडे रिंगणात आहे. तसेच सुभाष मोरे (शिक्षक भारती), शिवसेना शिंदे गट पुरस्कृत उमेदवार शिवाजी शेंडगे आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे शिवाजी नलावडे रिंगणात आहे. यामुळे मुंबईत महायुतीमध्ये मैत्रीपूर्ण लढत आहे.

राज्यात अवकाळीचा कहर, भर उन्हात 'या' जिल्ह्यात पाऊस अन् बळीराजा चिंतेत
राज्यात अवकाळीचा कहर, भर उन्हात 'या' जिल्ह्यात पाऊस अन् बळीराजा चिंतेत.
'नव्या बाटलीत जुनीच दारू, त्यात नवं काय?' 'सामना'तून सरकारला डिवचलं
'नव्या बाटलीत जुनीच दारू, त्यात नवं काय?' 'सामना'तून सरकारला डिवचलं.
वकील ओझा यांचे आदित्य ठाकरेंवर गंभीर आरोप, काय म्हणाले आदित्य ठाकरे?
वकील ओझा यांचे आदित्य ठाकरेंवर गंभीर आरोप, काय म्हणाले आदित्य ठाकरे?.
देवेंद्रजी, बात निकलेगी तो दूर तलक जायेगी; अंधारेंचं फडणवीसांना पत्र
देवेंद्रजी, बात निकलेगी तो दूर तलक जायेगी; अंधारेंचं फडणवीसांना पत्र.
मंत्री अदिती तटकरेंच्या जिल्ह्यात 15 हजार महिला अपात्र
मंत्री अदिती तटकरेंच्या जिल्ह्यात 15 हजार महिला अपात्र.
'हो, ते वक्तव्य बरोबर होतं, समजलं?', 'त्या' व्हिडिओवर अजितदादा संतापले
'हो, ते वक्तव्य बरोबर होतं, समजलं?', 'त्या' व्हिडिओवर अजितदादा संतापले.
कोरटकर प्रकरणावरून विरोधक सत्ताधारी भिडले
कोरटकर प्रकरणावरून विरोधक सत्ताधारी भिडले.
अजितदादांच्या 'त्या' व्हिडिओवर गुलाबराव पाटलांची मिश्किल टिपणी
अजितदादांच्या 'त्या' व्हिडिओवर गुलाबराव पाटलांची मिश्किल टिपणी.
'तसा एक नेपाळी महाराष्ट्रात फिरतोय', परबांची राणेंवर नाव न घेता टीका
'तसा एक नेपाळी महाराष्ट्रात फिरतोय', परबांची राणेंवर नाव न घेता टीका.
मराठी असल्याने डायमंड असोसिएशनने नाकारलं सभासदत्व
मराठी असल्याने डायमंड असोसिएशनने नाकारलं सभासदत्व.