AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Mahindra THAR चा जलवा कायम, दिवाळीच्या मुहूर्तावर रेकॉर्डब्रेक विक्री

महिंद्रा अँड महिंद्राने गेल्या महिन्यात लाँच केलेली Mahindra THAR 2020 ही एसयूव्ही भारतीयांच्या पसंतीस उतरल्याचे चित्र सध्या पाहायला मिळत आहे.

Mahindra THAR चा जलवा कायम, दिवाळीच्या मुहूर्तावर रेकॉर्डब्रेक विक्री
Follow us
| Updated on: Nov 13, 2020 | 5:05 PM

मुंबई : महिंद्रा अँड महिंद्राने (Mahindra) गेल्या महिन्यात महात्मा गांधी जयंतीच्या दिवशी त्यांची लोकप्रिय एसयूव्ही महिंद्रा ‘THAR 2020’ भारतात लाँच केली होती. या ‘सेकंड जनरेशन महिंद्रा THAR 2020’ ची किंमत 9.8 लाख रुपयांपासून सुरु होते. तर महिंद्रा थारचे एलएक्स ट्रिम हे टॉप मॉडेल 13 लाख रुपयांपर्यंत बाजारात विक्रीस उपलब्ध आहे. (Mahindra THAR dominating in market, 1000 units ready for delivery in Diwali period)

महिंद्राची सेकंड जनरेशन थार ही एसयूव्ही भारतीयांच्या पसंतीस उतरल्याचे चित्र सध्या पाहायला मिळत आहे. लॉकडाऊनदरम्यान कार कंपन्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. तरिदेखील लॉकडाऊनच्या परिस्थितीत कंपनीने थार लाँच केली. कोरोना महामारीमुळे लोकांची बिघडलेली आर्थिक परिस्थिती आणि लॉकडाऊनमुळे या कारच्या विक्रीबाबत अनेकांनी प्रश्न उपस्थित केले होते. परंतु Mahindra THAR 2020 ने सर्वांचे अंदाज चुकवले आहे. या गाडीची मागणी दिवसेंदिवस वाढत आहे. मागणी वाढल्यामुळे कंपनीने त्यांच्या नाशिक येथील प्लांटला प्रोडक्शन वाढवण्याचे आदेश दिले आहेत.

कंपनीने याबाबत म्हटले आहे की, दिवाळीमध्ये आम्ही नव्या थार एसयूव्हीच्या 1000 युनिट्सची डिलीव्हरी करणार आहोत. ही कार 2 ऑक्टोबर रोजी एएक्स आणि एलएक्स या दोन व्हेरिएंटमध्ये लाँच करण्यात आली आहे. थारची किंमत 9.8 लाख ते 13.75 लाख रुपयांपर्यंत आहे. लोकांनी दिवळीचा मुहुर्त साधून गाड्यांचं बुकिंग केलं आहे. त्यामुळे प्रत्येक ग्राहकापर्यंत त्यांच्या अपेक्षित वेळेत त्यांची कार पोहोचवली जाईल.

कंपनीने गेल्या आठवड्यात केवळ दोन दिवसात थारच्या 500 युनिट्सची डिलीव्हरी केली आहे. कंपनीने कार लाँच करताना यावर्षाच्या अखेरपर्यंत 2000 युनिट्सच्या विक्रीची योजना बनवली होती. परंतु आता मागणी वाढल्याने 2021 पूर्वी 3000 हूनही अधिक युनिट्सची विक्री होईल.

सेकंड जनरेशन महिंद्रा ‘THAR 2020’ची वैशिष्ट्ये

जुन्या महिंद्रा थारच्या तुलनेत नवीन महिंद्रा ‘THAR 2020’मध्ये बऱ्यापैकी कॉस्मेटिक बदल करण्यात आले आहेत. ग्राहक त्यांच्या पसंतीनुसार पेट्रोल आणि डिझेल इंजिन पर्यायांसह नवी महिंद्रा ‘THAR 2020’ खरेदी करू शकतात. या नव्या ‘THAR 2020’मध्ये 4 सीट आणि 6 सीट, असे सीटिंग लेआउट पर्याय देण्यात आले आहेत.

सेकंड जनरेशन महिंद्रा थारमध्ये पेट्रोल आणि डिझेल इंजिन, असे दोन पर्याय देण्यात आले आहेत. ज्यामध्ये 2.0 लीटर 4 सिलिंडर पेट्रोल इंजिन, 150 बीएचपी पॉवर आणि 300 एनएम टॉर्क जनरेट करते. तर, 2.2 लीटर डिझेल इंजिनने 130 बीएचपीची पॉवर आणि 300 एनएम टॉर्क जनरेट केले जाते. या नव्या ‘THAR 2020’मध्ये बीएस 6 इंजिन देण्यात आले असून, 6 स्पीड मॅन्युअल आणि ऑटोमॅटिक गिअरबॉक्सचे पर्याय उपलब्ध करून देण्यात आले आहेत.

सेकंड जनरेशन महिंद्रा थारच्या उर्वरित वैशिष्ट्यांविषयी बोलायचे झाले तर, 9 वेरियंटसह रेड रेज, गॅलेक्सी ग्रे, मिस्टिक कॉपर, रॉकी बेज, नेपोली ब्लॅक आणि अ‍ॅक्वामरीन या वेगवेगळ्या रंगात ‘THAR 2020’ लाँच केली गेली आहे.

महिंद्रा ‘THAR 2020’मध्ये 7 इंचाचा टचस्क्रीन इंफोटेनमेंट, अ‍ॅडजेस्टेबल सीट, रूफ माउंट स्पीकर्स, क्रूझ कंट्रोल, ड्युअल एअरबॅग, स्टीयरिंग माउंटेड कंट्रोल, एबीएस, ईबीडी, हिल कंट्रोल, डिजिटल ओडोमीटर, इलेक्ट्रॉनिक मल्टी ट्रिप मीटर, असे फीचर्स देण्यात आले आहेत. महिंद्रा ‘THAR 2020’मध्ये खास चौकोनी एलईडी टेललाईट्स, स्पोक अ‍ॅलॉय व्हील्स देण्यात आले आहेत.

संबंधित बातम्या

Mahindra Thar 2020 खरेदी करताय? ‘इतके’ महिने वाट पाहावी लागेल

MG Motors च्या ‘या’ SUV ची मार्केटमध्ये धुम, तीन आठवड्यात रेकॉर्डब्रेक विक्री, जाणून घ्या किंमत आणि फिचर्स

अवघ्या नऊ महिन्यात ‘या’ SUV चे सर्व युनिट्स विकले; जाणून घ्या कारची किंमत आणि फिचर्स

(Mahindra THAR dominating in market, 1000 units ready for delivery in Diwali period)

'काश्मीर जन्नत', हल्ल्यानंतर पहलगाम पर्यटकांनी फुललं, सध्या माहौल कसा?
'काश्मीर जन्नत', हल्ल्यानंतर पहलगाम पर्यटकांनी फुललं, सध्या माहौल कसा?.
'शरद पवारांनी मृत्यू झालेल्यांच्या नातेवाईकांकडून घटना ऐकावी, मग...'
'शरद पवारांनी मृत्यू झालेल्यांच्या नातेवाईकांकडून घटना ऐकावी, मग...'.
पहलगामच्या हल्ल्यात आदिलचा मृत्यू, शिंदेंनी घेतला झटक्यात मोठा निर्णय!
पहलगामच्या हल्ल्यात आदिलचा मृत्यू, शिंदेंनी घेतला झटक्यात मोठा निर्णय!.
सिंधु पाणी करारावर आज महत्वाची बैठक
सिंधु पाणी करारावर आज महत्वाची बैठक.
काश्मीरमध्ये अडकलेले महाराष्ट्रातील पर्यटक म्हणताय, 'I Love Kashmir'
काश्मीरमध्ये अडकलेले महाराष्ट्रातील पर्यटक म्हणताय, 'I Love Kashmir'.
पाकिस्तानचे धाबे दणाणले; आंतरराष्ट्रीय सीमेवर देखील सुरक्षा वाढवली
पाकिस्तानचे धाबे दणाणले; आंतरराष्ट्रीय सीमेवर देखील सुरक्षा वाढवली.
पहलगाम हल्ल्याच्या निषेधार्थ स्थानिक रस्त्यावर अन् भारतीयांना आर्त हाक
पहलगाम हल्ल्याच्या निषेधार्थ स्थानिक रस्त्यावर अन् भारतीयांना आर्त हाक.
पर्यटकांच्या तान्ह्या बाळाला वाचवण्यासाठी काश्मिरी चिमुकला सरसावला
पर्यटकांच्या तान्ह्या बाळाला वाचवण्यासाठी काश्मिरी चिमुकला सरसावला.
'मोदी, फक्त 1 तास...', पहलगाम हल्ल्यावरून बांगर भडकले अन् जीभही घसरली
'मोदी, फक्त 1 तास...', पहलगाम हल्ल्यावरून बांगर भडकले अन् जीभही घसरली.
राजस्थानजवळ पाकने जैश-ए-मोहम्मदचे 4 दहशतवादी तळ बांधले
राजस्थानजवळ पाकने जैश-ए-मोहम्मदचे 4 दहशतवादी तळ बांधले.