#HappyBirthdayPM | मोदींच्या आयुष्यावर भन्साळींचा चित्रपट, मुख्य भूमिकेतील या अभिनेत्याला ओळखलंत?
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आयुष्यावर आधारित चित्रपटाची निर्मिती संजय लीला भन्साळी करत असून नवोदित अभिनेता अभय वर्मा मुख्य भूमिकेत दिसणार आहे

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आयुष्यावर आणखी एका चित्रपटाची निर्मिती होत आहे. बॉलिवूडमधील प्रसिद्ध निर्माता-दिग्दर्शक संजय लीला भन्साली हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन येत आहेत. नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने ‘मन बैरागी’ चित्रपटाचा फर्स्ट लूक (Mann Bairagi First Look) सोशल मीडियावर शेअर करण्यात आला आहे.
नवोदित अभिनेता अभय वर्मा या चित्रपटात नरेंद्र मोदींची व्यक्तिरेखा साकारणार आहे. अभयने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊण्टवरुन याविषयी माहिती दिली आहे. अभयने ‘नैना दा क्या कसूर’ या चित्रपटात मुख्य भूमिका साकारली होती. याशिवाय तो ‘डेअर मिल्क’च्या जाहिरातीतही झळकला होता.
नरेंद्र मोदी यांच्या आयुष्यातील न पाहिलेल्या, न ऐकलेल्या अशा घटना या चित्रपटात (Mann Bairagi First Look) दाखवण्यात येणार आहेत. संजय लीला भन्साली आणि महावीर जैन यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे. तर संजय त्रिपाठी सिनेमाचे लेखक आणि दिग्दर्शक आहेत. येत्या हिवाळ्यात सिनेमा प्रदर्शित होणार आहे.
PM Narendra Modi Birthday : नेते मंडळी आणि सेलिब्रिटींकडून शुभेच्छांचा पाऊस
‘मन बैरागी… जब मै मुझसे मिला’ असं या चित्रपटाचं संपूर्ण शीर्षक आहे. चित्रपटाच्या पोस्टरमध्ये एका वैराण वाळवंटात तरुण बसची वाट पाहताना दिसत आहे.
The man you know, the moments you don’t! Presenting the first look of our next production venture with Mahaveer Jain, #MannBairagi, a special feature dedicated to the defining moments of our PM’s life.#HappyBirthdayPMModi pic.twitter.com/4fDCKqnj1b
— BhansaliProductions (@bhansali_produc) September 17, 2019
विशेष म्हणजे येलो, बालक पालक, दबंग, फॅशन यासारख्या चित्रपटांचं छायाचित्रण करणारा मराठमोळा सिनेमॅटोग्राफर महेश लिमये मोदींचं आयुष्य आपल्या कॅमेरातून प्रेक्षकांसमोर आणणार आहे.
‘मन बैरागी’ सिनेमाचा फर्स्ट लूक अभिनेता अक्षयकुमार, सुपरस्टार प्रभास यांनीही आपल्या सोशल मीडिया अकाऊण्टवर शेअर केला आहे. कोणत्याही यशस्वी माणसाच्या आयुष्यात असा टप्पा येतो, जेव्हा तो यशाच्या दिशेने पाऊल टाकतो. ‘मन बैरागी’मध्ये हेच दिसणार असल्याचं निर्मात्यांचं म्हणणं आहे.
PM Narendra Modi Birthday : पंतप्रधान मोदी कोणता स्मार्टफोन, कोणतं सिमकार्ड वापरतात?
कधीही न ऐकलेली एक कहाणी पडद्यावर येणार आहे. हा चित्रपट प्रेक्षकांच्या काळजाला हात घालेल. ही अशा माणसाची कहाणी आहे, जो स्वत:चा शोध घेण्यासाठी निघाला होता आणि मग आपल्या देशाचा सर्वात मोठा नेता बनला” असं दिग्दर्शक संजय त्रिपाठी म्हणतात.
यापूर्वी ‘पीएम नरेंद्र मोदी’ हा चित्रपटही पंतप्रधानांच्या आयुष्यावर तयार करण्यात आला होता. यामध्ये अभिनेता विवेक ओबेरॉयने मुख्य भूमिका साकारली होती. लोकसभा निवडणुकांच्या तोंडावर आलेला हा सिनेमा आचारसंहितेत अडकला होता. तर मोदींच्या आयुष्यावर एक वेब सीरिजही येऊन गेली.
अभिनेता अभय वर्मा