हातात पिशव्या घेऊन अर्धा किमी रांगा, पुण्यात वाईन शॉप्स न उघडल्याने तळीराम हिरमुसले

पुणे शहरातील सर्व वाईन शॉपच्या दुकानांसमोर अर्धा किमीपर्यंत रांगा लागल्याचे चित्र पाहायला (Pune liquor shop Queue) मिळाले. 

हातात पिशव्या घेऊन अर्धा किमी रांगा, पुण्यात वाईन शॉप्स न उघडल्याने तळीराम हिरमुसले
Follow us
| Updated on: May 04, 2020 | 11:40 AM

पुणे : राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये दारु विक्रीला सशर्त परवानगी मिळाली (Pune liquor shop Queue) आहे. त्यामुळे आज ( 4 मे) पासून तिन्ही झोनमध्ये दारुची दुकाने उघडली जातील असे सांगण्यात आले आहेत. त्यामुळे पुण्यात सकाळपासूनच मद्यप्रेमींनी वाईन शॉप बाहेर गर्दी केली. काही जण तर तीन चार तासांपासून रांगेत तात्कळत उभे होते. मात्र पुणे शहरासह जिल्ह्यात दारुची दुकान अद्याप उघडणार पोलिसांनी सांगताच अनेक मद्यप्रेमींनी घरचा रस्ता धरला.

कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे देशात घोषित करण्यात (Pune liquor shop Queue) आलेला लॉकडाऊन 17 मे पर्यंत वाढवण्यात आला आहे. मात्र या काळातही राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये दारु विक्रीला सशर्त परवानगी मिळाली आहे. यानंतर ठिकठिकाणच्या अनेक मद्यप्रेमींनी वाईन शॉपसमोर गर्दी केली.

पुण्यात सकाळी 6  वाजल्यापासूनच काही मद्यप्रेमी वाईन शॉपसमोर जमा झाले  होते. अनेक दिवसांनंतर दारु मिळणार यासाठी अनेक जण तब्बल 3 ते 4 तास रांगेत उभे होते. त्यामुळे पुणे शहरातील सर्व वाईन शॉपच्या दुकानांसमोर अर्धा किमीपर्यंत रांगा लागल्याचे चित्र पाहायला मिळाले.

तोंडाला मास्क, हातात पिशव्या आणि पैसे घेऊन अनेकजण भर उन्हात उभे होते. अनेक दिवसानंतर दारु मिळणार असल्याने त्यांचा आनंद शिगेला पोहोचला होता. रेशन धान्य दुकानासमोर ज्याप्रमाणे कूपन घेण्यासाठी अनेकांनी रांगा लावल्या होत्या, तशीच रांग दारुसाठी लागली होती.

माञ प्रशासनाकडून कोणताही आदेश न आल्यानं वाईन शॉप सुरु झाले नाही. त्यामुळे तीन ते चार तास रांगेत उभे राहिल्यानंतर मद्य प्रेमींची मोठी निराशा झाली. अखेर वाईन शॉप समोरील गर्दी हटवण्यासाठी पोलीस वाईन शॉप समोर दाखल झाले. त्यानंतर संताप व्यक्त करत मद्य प्रेमींनी घराचा रस्ता (Pune liquor shop Queue) धरला.

पुणे जिल्ह्यात दारुची दुकाने बंदच राहणार

दरम्यान पुणे जिल्ह्यातील मद्य विक्रीची दुकाने सुरु करण्यासंदर्भात आतापर्यंत प्रशासनाचा कोणताच निर्णय झालेला नाही. मद्य विक्री दुकानासंदर्भात नव्याने कोणताही आदेश काढलेला नाही, दुकाने बंदच राहतील. असे राज्य उत्पादन शुल्क विभागाने म्हटलं आहे.

यापूर्वी लॉकडाऊनदरम्यान घेतलेला मद्य विक्री संदर्भातील निर्णय पुढील आदेशापर्यंत कायम राहिल. त्यानुसार पुणे शहर, पिंपरी चिंचवड आणि ग्रामीण भागातील मद्य विक्री पुढील आदेशापर्यंत बंद ठेवली जाईल. यासंदर्भात नवीन निर्देश आल्यानंतर दुकाने सुरु करायची की बंद ठेवायची याबाबतचा निर्णय घेतला जाईल.

संबंधित बातम्या : 

पुणे शहरासह जिल्ह्यात दारुची दुकाने बंदच राहणार

मद्यप्रेमींना दिलासा, महाराष्ट्रात ‘रेड झोन’मध्येही दारु विक्रीला सशर्त परवानगी

महाराष्ट्रात दारुची दुकानं उघडणार, पण नियम काय?

गेट वेहून एलिफंटाला जाणारी बोट उलटली, बोटीत 35हून अधिक प्रवासी अन्...
गेट वेहून एलिफंटाला जाणारी बोट उलटली, बोटीत 35हून अधिक प्रवासी अन्....
दादांच्या राष्ट्रवादीला कोणती खाती? खात्यांच्या नावाची यादीच आली समोर
दादांच्या राष्ट्रवादीला कोणती खाती? खात्यांच्या नावाची यादीच आली समोर.
दादांचे दोन नेते भिडले, उन्मतपणा खपवून घेणार.., मिटकरींचा कोणाला इशारा
दादांचे दोन नेते भिडले, उन्मतपणा खपवून घेणार.., मिटकरींचा कोणाला इशारा.
'आजकाल आंबेडकरांचं नाव घेणं म्हणजे...', अमित शाहांचं एक वक्तव्य अन्
'आजकाल आंबेडकरांचं नाव घेणं म्हणजे...', अमित शाहांचं एक वक्तव्य अन्.
मैं पुराना सिक्का, मुझे फेंक न देना... भुजबळांची शायरीतून खदखद व्यक्त
मैं पुराना सिक्का, मुझे फेंक न देना... भुजबळांची शायरीतून खदखद व्यक्त.
'शरद पवार शांत, याचा अर्थ वादळ निर्माण...', शिवसेना नेत्याचं वक्तव्य
'शरद पवार शांत, याचा अर्थ वादळ निर्माण...', शिवसेना नेत्याचं वक्तव्य.
“याला भेट, त्याला भेट अन् दुसऱ्या दिवशी घरी थेट”,शिंदेंचा कोणाला टोला?
“याला भेट, त्याला भेट अन् दुसऱ्या दिवशी घरी थेट”,शिंदेंचा कोणाला टोला?.
लोकसभा-राज्यसभेत अमित शाह माफी मांगो अन् जयभीमच्या विरोधकांच्या घोषणा
लोकसभा-राज्यसभेत अमित शाह माफी मांगो अन् जयभीमच्या विरोधकांच्या घोषणा.
दादा नाराज भुजबळांनी मनधरणी करणार? अजितदादांसह 'हे' दोन नेते भेट घेणार
दादा नाराज भुजबळांनी मनधरणी करणार? अजितदादांसह 'हे' दोन नेते भेट घेणार.
'दादांची तब्येत बिघडते, अधून-मधून आवाज जातो मी त्यांना गोळी...'
'दादांची तब्येत बिघडते, अधून-मधून आवाज जातो मी त्यांना गोळी...'.