आरक्षणावरील स्थगिती उठवा अथवा वणवा भडकणार; मराठा आंदोलक आंदोलनावर ठाम

आरक्षणाच्या मुद्द्यावर अजूनही ठोस निर्णय न घेतल्यामुळे येणाऱ्या काळात राज्यात आंदोलनाचा उद्रेक वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

आरक्षणावरील स्थगिती उठवा अथवा वणवा भडकणार; मराठा आंदोलक आंदोलनावर ठाम
Follow us
| Updated on: Oct 07, 2020 | 3:14 PM

नवी मुंबई : मराठा आरक्षणासंदर्भात पुढील दिशा ठरवण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या बैठक अजूनही सुरू आहे. या बैठकीत मराठा समनव्यक आक्रमक झाल्याचं सांगण्यात येत आहे. आरक्षणाच्या मुद्द्यावर मराठा समन्वयक आणि पदाधिकारी यांनी तीव्र भावना व्यक्त करत येणाऱ्या काळात उग्र आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. आरक्षणाच्या मुद्द्यावर अजूनही ठोस निर्णय न घेतल्यामुळे येणाऱ्या काळात राज्यात आंदोलनाचा उद्रेक वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. (maratha reservation news agitators insist on agitation)

मिळालेल्या माहितीनुसार, या बैठकीत MPSC च्या परिक्षांबाबत चर्चा करण्यात आली. जर परीक्षा रद्द झाली नाही तर उधळून लावणार असल्याचा इशारा मराठा समजाकडून देण्यात आला आहे. तर मुख्यमंत्री यांच्या घरासमोर आणि परीक्षा केंद्रावरसुद्धा आंदोलन करणार असल्याचं म्हटलं आहे. त्यामुळे मराठा आरक्षणाचा मुद्दा पुन्हा एकदा पेटण्याची चिन्हं आहेत.

खरंतर, मराठा आरक्षणाला कोर्टात स्थगिती मिळाल्यानंतर राज्यात संतापाची लाट उसळली आहे. अशात राज्यात पोलीस भरती आणि MPSC च्या परीक्षांचं आयोजन करण्यात आलं. त्यामुळे मराठा समाजाला डावललं जात असल्याची टीका वारंवार होत आहे. यावर उपाय काढण्यासाठी राज्यव्यापी बैठका सुरू असून आता नवी मुंबईतही महत्त्वाच्या बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं.

माथाडी कामगारांचे नेते नरेंद्र पाटील यांनी नवी मुंबईच्या माथाडी भवनमध्ये मराठा आरक्षणाच्या आंदोलनाची पुढील रणनीती ठरवण्यासाठी बैठक आयोजित केली आहे. या बैठकीच्यानिमित्ताने उदयनराजे आणि संभाजी राजे पहिल्यांदाच मराठा आरक्षणच्या मुद्द्यावर एकत्र येणार होते. पण ऐनवेळी खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांनी बैठकीला येणे रद्द केले.

इतर बातम्या – 

Weather Alert: राज्यात परतीच्या पावसाची हजेरी, या भागांत मुसळधार ते मध्यम सरी कोसळणार

कंन्टेनमेंट झोनमध्ये सण साजरे होणार नाहीत, आरोग्य मंत्रालयाचा आदेश

(maratha reservation news agitators insist on agitation)

... अन् एकटी महिला भिडली, छेड काढणाऱ्याला चांगलंच चोपल, बघा व्हिडीओ
... अन् एकटी महिला भिडली, छेड काढणाऱ्याला चांगलंच चोपल, बघा व्हिडीओ.
मुंबईतील काँग्रेस कार्यालयात घुसून आंदोलन करणं 'भाजप युवा'च्या अंगाशी
मुंबईतील काँग्रेस कार्यालयात घुसून आंदोलन करणं 'भाजप युवा'च्या अंगाशी.
'ए अंबादास खाली बस...', शिंदेंनी विरोधकांना फटकारलं, सभागृहात काय झाल?
'ए अंबादास खाली बस...', शिंदेंनी विरोधकांना फटकारलं, सभागृहात काय झाल?.
'.. आता भाजपची वाट', सुषमा अंधारे यांचा नेमका कोणाला खोचक टोला?
'.. आता भाजपची वाट', सुषमा अंधारे यांचा नेमका कोणाला खोचक टोला?.
बीड सरपंच संतोष देशमुखांची हत्या, शवविच्छेदन अहवालातून काय आलं समोर?
बीड सरपंच संतोष देशमुखांची हत्या, शवविच्छेदन अहवालातून काय आलं समोर?.
अचानक संध्याकाळी 17 लाख मतं वाढली? EVMच्या आरोपांवर फडणवीसांचं उत्तर
अचानक संध्याकाळी 17 लाख मतं वाढली? EVMच्या आरोपांवर फडणवीसांचं उत्तर.
'लाडक्या बहिणीं'नो तुमच्यासाठी मोठी बातमी, डिसेंबरचा हफ्ता कधी मिळणार?
'लाडक्या बहिणीं'नो तुमच्यासाठी मोठी बातमी, डिसेंबरचा हफ्ता कधी मिळणार?.
अध्यक्ष महोदय बोट दुर्घटना तुमच्याच मतदारसंघातील, दादा असं का म्हणाले?
अध्यक्ष महोदय बोट दुर्घटना तुमच्याच मतदारसंघातील, दादा असं का म्हणाले?.
'बहुमत मिळाल्यानं गांगरून गेलेत', मनसे नेत्याची महायुतीवर सडकून टीका
'बहुमत मिळाल्यानं गांगरून गेलेत', मनसे नेत्याची महायुतीवर सडकून टीका.
...म्हणून भूजबळांना महायुतीच्या मंत्रिमंडळातून डावललं, कारणं आली समोर
...म्हणून भूजबळांना महायुतीच्या मंत्रिमंडळातून डावललं, कारणं आली समोर.